| A | B | C | D | E | F | G | H | I | |
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
1 | शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) MANICKPUR | ||||||||
2 | मानक निहाय कृती आराखडा तयार करण्यासाठीचे मुद्दे (STANDARDWISE - ACTION PLAN) | ||||||||
3 | क्षेत्र क्रमांक | उप क्षेत्र क्रमांक | मानक क्रमांक | मानके | वर्णन विधाने स्तर -१ | वर्णन विधाने स्तर -२ | वर्णन विधाने स्तर -३ | वर्णन विधाने स्तर -४ | कृती आराखडा (ACTION PLAN POINTS) |
4 | 1 | 1 | मानक क्र.१ | १.१.१ मुख्याध्यापक आणि शिक्षक अभ्यासक्रमाशी निगडीत दस्तऐवज आणि NCERT, SCERT संदर्भ साहित्याशी परिचित आहेत. | १.१ मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना NEP 2020, NCF व SCF च्या मुख्य शिफारशी व अध्ययन निष्पत्ती माहिती आहेत. | २.१ शाळा NEP 2020, SCF आणि NCF वर शिक्षकांसाठी चर्चासत्र व उद्बोधन वर्गांचे आयोजन करते | ३.१ मुख्याध्यापक आणि शिक्षक पाठ नियोजन तयार करताना NEP 2020, NCF आणि SCF च्या शिफारशी, क्षमता विधाने व अध्ययन निष्पत्ती विचारात घेतात. ३.२ विद्यार्थ्यांची संपादणूक आणि त्यांच्या गरजेनुसार पाठ नियोजन आणि अध्यापनासह वर्गातील कृती कार्यक्रमांचेही निरीक्षण नियमितपणे केले जाते. | ४.१ NEP 2020, NCF आणि SCF नुसार विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि विकासाच्या दृष्टीने त्याची परिणामकारकता पाहण्यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षक अध्यापन पद्धतींशी संबंधित नियमित विश्लेषण करतात. | १) शाळेकडे ΝΕΡ 2020, NCF व SCF प्रत उपलब्ध असल्याची खात्री करणे. |
5 | २) शाळेमध्ये NEP 2020, SCF आणि NCF वर शिक्षकांसाठी चर्चासत्र व उद्बोधन वर्गांचे आयोजन करणे | ||||||||
6 | ३) वार्षिक मूल्यांकन आणि विविध परीक्षांचे नियोजन, समग्र प्रगतिपत्रक, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पाहणे. | ||||||||
7 | ४) शिक्षक निरीक्षण /वर्गातील सहभाग अभिलेखे, प्रगतिपुस्तके, संचिका, विद्यार्थिनिहाय अध्ययन स्तर विश्लेषण असल्याची खात्री करणे. | ||||||||
8 | 1 | 1 | मानक क्र.२ | १.१.२ नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्रावर आधारित एकात्मिक वार्षिक अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय योजना आहेत. | १.१ शाळेत एकात्मिक वार्षिक अभ्यासक्रम आणि अध्यापन नियोजन उपलब्ध आहे. | २.१ विद्यार्थी आणि पालक यांच्यासोबत एकात्मिक वार्षिक अभ्यासक्रम आणि अध्यापन योजना याबद्दल चर्चा करण्यासाठी बैठकांचे आयोजन केले जाते. | ३.१ शिक्षक स्वतः नाविन्यपूर्ण अध्ययन-अध्यापन पद्धतींचा अवलंब करतात आणि विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार, कुतूहल आणि सर्जनशीलता, समस्या सोडवणे, सहयोग इ.विकसित करण्यासाठी स्थानिक संदर्भ लक्षात घेऊन अनुकूल अशी अध्यापन पद्धत विकसित करतात. | ४.१ शिक्षक- पालक सभांमध्ये अध्यापन नियोजनावर चर्चा केली जाते व त्याची अंमलबजावणी सर्व वर्गामध्ये केली जाते. | १) शाळेकडे एकात्मिक अध्ययन सुलभ पद्धती दर्शविणारे नमुना पाठ नियोजन पाहणे. |
9 | २) विद्यार्थी आणि पालक यांच्यासोबत एकात्मिक वार्षिक अभ्यासक्रम आणि अध्यापन योजना याबद्दल चर्चा करण्यासाठी बैठकांचे आयोजन करणे | ||||||||
10 | ३) चिकित्सक व सर्जनात्मक विचारांना समृद्ध करणारे नमुना पाठ नियोजन, कौशल्ये आणि एकविसाव्या शतकातील क्षमतांना वृद्धिंगत करणारे पाठ नियोजन करणे. | ||||||||
11 | ४) आपल्या पाल्यांचे अध्ययन आनंददायी होते हे दर्शविणारे पालकांचे अभिप्राय, नमुना पाठ नियोजन शाळेत उपलब्ध करणे. | ||||||||
12 | 1 | 1 | मानक क्र.३ | १.१.३ शाळा सक्रियपणे आपल्या शिक्षकांसाठी नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र अध्यापनात वापरण्याची क्षमता निर्माण करते तसेच केंद्र परिषदांमध्ये इतर शाळेतील शिक्षकांनीही त्या पद्धती अध्यापनासाठी उपयोगात आणाव्यात असे सुचविते. | १.१ मुख्याध्यापक व शिक्षकांचे क्षमताधिष्ठीत शिक्षणाचे व नाविन्यपूर्ण अध्यापनाचे प्रशिक्षण झाले आहे. | २.१ मुख्याध्यापक व शिक्षक आपापासात समावेशित शिक्षण,एकात्मिक शिक्षण,क्षमताधिष्टीत अध्ययन तसेच अध्ययन निष्पत्तीच्या संपादनासाठी नवीन अध्यापनशास्त्रा विषयी वैचारिक देवाणघेवाण करतात. २.२ शाळेने काही नावीन्यपूर्ण अध्यापन शास्त्र आधारित नियोजन तयार केले आहेत. | ३.१ प्रत्येक शिक्षक आठवड्यातून किमान एकदा तरी नवीन अध्यापन पद्धती वापरण्याचा प्रयत्न करीत आहेत. ३.२ शिक्षकांच्या पाठ नियोजनात, वार्षिक नियोजनात आणि वर्गातील आंतरक्रियेतील नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र दिसून येते. | ४.१ नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र आणि त्यांचे फायदे आणि अध्ययन निष्पत्ती यावर केंद्र परिषदांमध्ये इतर शाळांसोबत परस्पर संवाद साधणारी सत्रे आयोजित केली जातात. ४.२ सर्व इयत्तांमध्ये नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र वापरून सर्व विषय शिकवले जातील याची खात्री करण्यासाठी शाळेने तिच्या सर्व पाठ नियोजनांचे पुनरावलोकन केले आहे. | १) प्रशिक्षण आणि जागरूकता कार्यक्रम, वेळापत्रक आणि उपस्थिती यासह नमुना पाठ नियोजन असल्याची खात्री करणे. |
13 | २) मुख्याध्यापक व शिक्षकांचे क्षमताधिष्ठीत शिक्षणाचे व नाविन्यपूर्ण अध्यापनाचे प्रशिक्षण पूर्ण करणे | ||||||||
14 | ३) शिक्षकांनी विकसित केलेल्या, नावीन्यपूर्ण अध्यापनशास्त्रानुसार केलेले नमुना पाठ नियोजन पाहणे. | ||||||||
15 | ४) नावीन्यपूर्ण अध्यापनशास्त्र सामायिक करण्याबाबत, शेजारच्या शाळांसोबत कार्यशाळा/सेमिनार /परस्परसंवादी सत्रांचे आयोजन केल्याचा पुरावा, विद्या अमृत पोर्टलवरील प्रविष्ट नोंदी-लिंक, सातत्यपूर्ण नावीन्यपूर्ण अध्यापन शास्त्राचा वापर केला जातो, याबाबत CRC/BRC चा अभिप्राय पाहणे. | ||||||||
16 | 1 | 1 | मानक क्र.४ | १.१.४ शाळा माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी विषयांच्या निवडीचे स्वातंत्र्य देते. | १.१ माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी विषयांच्या निवडीचे स्वातंत्र्य आहे | २.१ शाळेतील किमान 25% विद्यार्थी शाळेत उपलब्ध असलेल्या लवचिक अभ्यासक्रमातून आपल्या आवडीचा अभ्यासक्रमातून निवडतात. | ३.१ शाळेतील किमान ५०% विद्यार्थी शाळेत उपलब्ध असलेल्या लवचिक अभ्यासक्रमातून आपल्या आवडीचा अभ्यासक्रम निवडतात. ३.२ शाळा विद्यार्थ्यांना ऑफलाइन, ऑनलाइन आणि मिश्रित पद्धतींद्वारे शिकण्याची संधी उपलब्ध करून देते. | ४.१ शाळेतील 100% विद्यार्थी शाळेत उपलब्ध असलेल्या लवचिक अभ्यासक्रमातून आपल्या आवडीचा अभ्यासक्रम निवडतात. ४.२ माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांना अत्याधुनिक कौशल्ये विषय म्हणून दिली जातात. | १) UDISE + वर भरलेली माहिती, शालेय अभिलेखे नोंदी पाहणे. |
17 | २) विविध उपक्रमांसाठी ठरविलेला कालावधी दर्शवणारे शाळेतील सर्व वर्गांचे एकत्रित वेळापत्रक, विषयनिहाय विद्यार्थ्यांची यादी पाहणे. | ||||||||
18 | ३) एकात्मता दर्शवणाऱ्या विविध विषयांचे पाठ नियोजन, विद्यार्थ्यांना विविध विषयांचा पाठपुरावा करता यावा म्हणून विषयनिहाय उपलब्ध करून दिलेल्या ई-सामग्रीच्या लिंक्स पाहणे. | ||||||||
19 | ४) ऑफलाइन, ऑनलाइन आणि मिश्र अशा तिन्ही पद्धतींनी उपलब्ध करून दिलेल्या अभ्यासक्रमांची विषयनिहाय यादी, प्रस्तावित केलेल्या अभ्यासक्रमांची आणि इंटर्नशिपची यादी, कृत्रिम बुद्धिमत्ता, पर्यावरणपूरक जीवनशैली इत्यादी पाहणे. | ||||||||
20 | 1 | 2 | मानक क्र.५ | १.२.१ शिक्षकांना विविध विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन विविध अध्यापन-शिक्षण पद्धती/शिक्षणशास्त्र अवलंबण्यास सक्षम बनवणे. | १.१ शिक्षकांचे विविध अध्यापन पद्धती विषयी प्रशिक्षण झाले आहे. १.२ विविध चर्चासत्रातून अध्यापन पद्धती विषयी माहिती दिली | २.१ शिक्षक विविध गटांच्या गरजा लक्षात घेऊन एकात्मिक पाठ नियोजन करतात | ३.१ शिक्षक त्यांच्या वर्गात विविध अध्यापन- पद्धती जसे अनुभवात्मक शिक्षण पद्धती, कथाकथन, कला-एकात्मिक आणि क्रीडा-एकात्मिक शिक्षणाचा वापर करतात. | ४.१ शिक्षकांचे अध्यापन विद्यार्थ्यांना चांगले समजते. ४.२ विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर उंचावला आहे. | १) प्रशिक्षण कार्यक्रमांना उपस्थित असणाऱ्या शिक्षकांची यादी आणि प्रमाणपत्रे पाहणे. |
21 | २) प्रायोगिक अध्ययन, सहकारी अध्ययन, पृच्छा-आधारित अध्ययन, सर्व समावेशक अध्ययन, ICT साधनांचा वापर, प्रकल्पाधारित अध्ययन, चिकित्सक आणि सर्जनशील विचार आणि एकविसाव्या शतकातील कौशल्ये इ. वर आधारित चर्चा सत्राचे आयोजन पाहणे. | ||||||||
22 | ३) विविध अध्यापन- पद्धतीनुसार नमुना पाठ नियोजन पाहणे. | ||||||||
23 | ४) विद्यार्थी प्रतिक्रिया, विद्यार्थी संचिका, समग्र प्रगतिपत्रक पाहणे. | ||||||||
24 | 1 | 2 | मानक क्र.६ | १.२.२ शाळा सर्व वर्गांसाठी निर्धारित केलेल्या क्षमता आणि अध्ययन निष्पत्तींचा अवलंब करीत आहे. | १.१ सर्व वर्गांसाठी निर्धारित केलेल्या क्षमता आणि अध्ययन निष्पत्तीं वर्गात प्रदर्शित केल्या आहेत. | २.१ सर्व शिक्षक सर्व वर्गांसाठी निर्धारित केलेल्या क्षमता आणि अध्ययन निष्पत्तींशी परिचित आहेत. | ३.१ प्रत्येक शिक्षकाला अध्ययन निष्पत्ती नुसार पाठ नियोजन करण्यास आणि अंमलबजावणी साठी मार्गदर्शन मिळते. | ४.१ शाळा अध्ययन निष्पत्तीमधील प्रगतीचा वेळोवेळी आढावा घेऊन मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कृती कार्यक्रमाची आखणी करते. | १) अध्ययन स्तर निष्पत्तींची यादी पाहणे. सर्व वर्गांसाठी निर्धारित केलेल्या क्षमता आणि अध्ययन निष्पत्तीं वर्गात प्रदर्शित करणे. |
25 | २) सर्व शिक्षकांना वर्गांसाठी निर्धारित केलेल्या क्षमता आणि अध्ययन निष्पत्तीं परिचित करून देणे. | ||||||||
26 | ३) अध्ययन निष्पत्ती नुसार पाठ नियोजन करण्यास मार्गदर्शन करणे. मुख्याध्यापकांनी शिक्षकांच्या पाठ निरीक्षण करणे. | ||||||||
27 | ४) अध्ययन निष्पत्तीमधील प्रगतीचा आढावा घेऊन मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कृती कार्यक्रमाची आखणी करणे | ||||||||
28 | 1 | 2 | मानक क्र.७ | १.२.३ शाळा अध्ययन अध्यापन अनुभूतीची गुणवत्ता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करते. | १.१ शाळा अध्ययन अध्यापन अनुभूतीची गुणवत्ता वाढवण्यासाठी आठवड्यातून एकदा तंत्रज्ञानाचा वापर करते. | २.१ शाळा ऑनलाइन संसाधनाच्या साह्याने अध्ययन अध्यापन अनुभव समृद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे असणाऱ्या स्मार्ट क्लासरूम्समध्ये डिजिटल अध्यापन उपयोग दररोज करते | ३.१ विद्यार्थी ई- कंटेंटच्या माध्यमातून संकल्पना शिकतात. ३.२ शाळा विद्यार्थ्यांना ऑनलाइन कंटेंट ब्राऊज करण्यासाठी आणि ऑनलाइन संसाधनाच्या साहाय्याने सादरीकरण करणे, पेपर सोडवणे तसेच गृहपाठ पूर्ण करणे इत्यादींसाठी प्रोत्साहन देते. | ४.१ विद्यार्थी त्यांच्या अध्ययन कक्षा वृद्धीसाठी आणि आकलनात्मक संकल्पनांचे सादरीकरण करण्यासाठी, माहितीपत्रके, पोर्टफोलिओ, दस्तऐवज, पेपर, लेख, जर्नल्स, चित्रपट, ग्राफिक्स इत्यादी स्वरूपात अध्ययन क्षमता वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करतात. | १) अध्ययन अध्यापन अनुभूतीची गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांनी आठवड्यातून किमान एकदा तंत्रज्ञानाचावापर करून पाठ नियोजन करणे. |
29 | २) स्मार्ट क्लासरूम असल्याची खात्री करणे. शिक्षकांनी स्मार्ट क्लासरूम्स मध्ये डिजिटल अध्यापन पद्धतीचा उपयोग दररोज करणे. | ||||||||
30 | ३)विद्यार्थीना ई- कंटेंटच्या माध्यमातून संकल्पना शिकताण्यास मदत करणे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ICT - आधारित कामाचा नमुना शाळेत उपलब्ध करणे. (उदाहरणार्थ पेपर सादरीकरण, असाइनमेंट, व्हिडिओ, माईंड मॅप्स इत्यादी.) पाहणे. | ||||||||
31 | ४) अध्ययन कक्षा वृद्धीसाठी आणि आकलनात्मक संकल्पनांचे सादरीकरण करण्यासाठी, माहितीपत्रके, पोर्टफोलिओ, दस्तऐवज, पेपर, लेख, जर्नल्स, चित्रपट, ग्राफिक्स इत्यादी स्वरूपात अध्ययन क्षमता वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे. | ||||||||
32 | 1 | 2 | मानक क्र.८ | १.२.४ शाळेत संस्थात्मक सहाध्यायी अध्ययन पद्धतीचा अवलंब केला जातो. | १.१ प्रशिक्षित शिक्षकांच्या देखरेखीखाली आणि सुरक्षिततेच्या पैलूंची योग्य काळजी घेऊन सहकारी विद्यार्थ्यांसाठी सहाध्यायी अध्ययन हा ऐच्छिक आणि आनंददायक कृती कार्यक्रम घेतला जातो. | २.१ शाळा सहाध्यायी अध्ययनाला आणि स्वयंप्रेरणेने केलेल्या कृती कार्यक्रमांना चालना देऊन विद्यार्थ्यांना सहाय्यता करण्यासाठी नावीन्यपूर्ण सहाध्यायी अध्ययनाचे नमुना तयार करते. | ३.१ शाळा सहाध्यायी मूल्यमापन करते व त्याची नोंद समग्र प्रगती पत्रकात पुरावा म्हणून करते. | ४.१ शाळा शिक्षकांच्या मूल्यांकनासह स्वयं-मूल्यांकन आणि सहाध्यायी मूल्यांकन करून प्रकल्प-आधारित आणि पृच्छा -आधारित अध्ययन, प्रश्नमंजुषा, भूमिका, गटकार्य, पोर्टफोलिओ इत्यादी द्वारे मुलांच्या प्रगतीचा आढावा घेते. | १) सहाध्ययन कृती कार्य दर्शवणारे वार्षिक नियोजन, सहाध्यायी कृतींची यादी, सहाध्ययनाच्या मूल्यमापनाच्या विविध पद्धती व तंत्रांची यादी पाहणे. |
33 | २) सहाध्यायी अध्ययनाचा नमुना पाठ करणे बाबत मार्गदर्शन करणे . | ||||||||
34 | ३) समग्र प्रगती पत्रक भरणे बाबत मार्गदर्शन करणे , सहाध्यायी मूल्यांकनाचे पुरावे पाहणे. | ||||||||
35 | ४) सहाध्यायी मूल्यांकन दर्शवणारा समग्र प्रगतिपत्रकाचा नमुना असल्याची खात्री करणे. सहाध्यायी मूल्यांकन करून प्रकल्प-आधारित आणि पृच्छा -आधारित अध्ययन, प्रश्नमंजुषा, भूमिका, गटकार्य, पोर्टफोलिओ इत्यादी द्वारे मुलांच्या प्रगतीचा आढावा घेणे | ||||||||
36 | 1 | 2 | मानक क्र.९ | १.२.५ शाळेने पर्यावरणपूरक वृत्ती व जीवनशैलीचा अवलंब करणे यावर लक्ष केंद्रित केले आहे. | १.१ प्रत्येक विद्यार्थ्याला पर्यावरण संवर्धन आणि हवामान बदलाविषयी पुरेशी जागरूकता संपादन करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. | २.१ शाळा दरवर्षी पर्यावरण शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी किमान दोन कार्यशाळा किंवा उद्बोधन वर्ग आयोजित करते. २.२ पर्यावरण/इको क्लब सक्रिय आहेत | ३.१ शाळा किमान तीन-चार पर्यावरण संवर्धन विषयक कार्यशाळा व उद्बोधन वर्गाचे आयोजन करते. | ४.१ शाळा विद्यार्थ्यांच्या मनोवृत्तीत परिवर्तन करते आणि पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारते. | १) विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन आणि हवामान बदलाविषयी पुरेशी जागरूकता संपादन करण्यासाठी उपक्रमांचे आयोजन करणे. उपक्रमांची यादी, उदा. प्रश्नमंजूषा, वादविवाद स्पर्धा, भाषणे, भूमिका अभिनय इत्यादी पाहणे. |
37 | २) पर्यावरण/इको क्लब सक्रिय करणे | ||||||||
38 | ३) पर्यावरण संवर्धन विषयक कार्यशाळा व उद्बोधन वर्गाचे आयोजन करणे. | ||||||||
39 | ४) जलसंधारण, मृदासंवर्धन, कचराव्यवस्थापन संबंधित उपक्रमांची अंमलबजावणी करणे. | ||||||||
40 | 1 | 3 | मानक क्र.१० | १.३.१ शाळा विद्यार्थ्यांमध्ये रोजगार क्षमता आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करते. | १.१ शाळा पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक स्तरावर व्यावसायिक अभ्यासक्रम राबविण्यासाठी आवश्यक ती पूर्तता करते. | २.१ विद्यार्थ्यांनी घेतलेल्या अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी शाळा स्थानिक उद्योगाशी सहसंबंध प्रस्थापित करते. | ३.१ अभ्यासक्रमांच्या व्यतिरिक्त, शाळा आनंददायी कृती कार्यक्रमांद्वारे स्थानिक व्यावसायिक हस्तकलेचा अनुभव प्रदान करते. | ४.१ इयत्ता 6 वी ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पूर्वव्यावसायिक कौशल्यांची संधी विकासनासाठी स्थानिक व्यावसायिक व हस्त कलाकार यांचे सहकार्य घेतले जाते. ४.२ इयत्ता 9 वी पासूनच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य आधारित अभियोग्यता चाचणी घेऊन विद्यार्थ्यांना करिअरची निवड करण्या साठी समुपदेशन केले जाते. ४.३ इयत्ता 12 मधून उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक मुलाने किमान एक व्यवसाय शिकलेला आहे. विद्यार्थ्यांना इंटर्नशिप, अप्रेंटिसची संधी दिली जाते. | १) शालेय व्यावसायिक शिक्षण कार्यक्रम आयोजन करणे. |
41 | २) प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी शाळा स्थानिक उद्योगाशी सहसंबंध प्रस्थापित करते. कौशल्य अभ्यासक्रमाच्या तासिका दर्शवणारे शाळेचे वेळापत्रक, स्थानिक उद्योगांशी केलेला पत्रव्यवहार पाहणे. | ||||||||
42 | ३) व्यावसायिक तज्ज्ञ व विद्यार्थी यांचा सुसंवाद कार्यक्रम, स्थानिक उद्योगांना भेटी देणेबाबत नियोजन करणे. | ||||||||
43 | ४) स्थानिक व्यावसायिक व हस्त-कलाकार यांची यादी, बारावीमध्ये व्यावसायिक कौशल्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांची यादी, इंटर्नशिप /अप्रेंटिसशिपसाठी संधी प्रदान केलेल्या विद्यार्थ्यांची यादी, शाळेद्वारे आयोजित केलेल्या करिअर मेळाव्यात सहभागाची नोंद असल्याची खात्री करणे. | ||||||||
44 | 1 | 3 | मानक क्र.११ | १.३.२ शाळा सर्व विद्यार्थ्यांमध्ये स्तरनिहाय डिजिटल, आर्थिक, संप्रेषण, लिंग समभाव आणि आरोग्य साक्षरता याविषयी जाणीव जागृती निर्माण करते. | १.१ महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने निर्धारित करून विकसित केलेली डिजिटल, आर्थिक, पर्यावरणीय, माहिती आणि माध्यमे, लिंग आणि आरोग्य साक्षरता नियमावली/मार्गदर्शक तत्त्वे/SOPs, शाळेच्या ग्रंथालयात उपलब्ध आहेत. | २.१ विद्यार्थ्यांमध्ये ही कौशल्ये विकसित करण्यासाठी शाळा प्रकल्प-आधारित शिक्षण/रोल प्ले/क्विझ/केस स्टडी/हँड-ऑन सेशन्स/कृती आधारित शिक्षण वापरते. | ३.१ विद्यार्थी हे उत्तमरित्या संवाद साधतात. विद्यार्थी हे आर्थिक साक्षरता शिकतात. ३.२ फिट इंडिया योजनेअंतर्गत शाळा कृती कार्यक्रमांमध्ये क्रीडा-एकात्मिक शिक्षण पद्धतीचे अवलंबन करते. ३.३ विद्यार्थी डिजिटल साधनांचा वापर करतात. ३.४ शाळा विविध उपक्रमांमध्ये सहभागी मुलामुलींना समान संधी देते | ४.१ विद्यार्थी समाजाशी सुसंवाद साधण्यासाठी आयोजित उपक्रमांमध्ये सहभागी होऊन त्यांची कौशल्य दाखवितात. | १) महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने निर्धारित करून विकसित केलेली डिजिटल, आर्थिक, पर्यावरणीय, माहिती आणि माध्यमे, लिंग आणि आरोग्य साक्षरता नियमावली/मार्गदर्शक तत्त्वे/SOPs, शाळेच्या ग्रंथालयात उपलब्ध करणे. |
45 | २) शाळा प्रकल्प-आधारित शिक्षण/रोल प्ले/क्विझ/केस स्टडी/हँड-ऑन सेशन्स/कृती आधारित शिक्षण यावर भर देणे. | ||||||||
46 | ३) शाळा फिट इंडिया योजनेअंतर्गत शाळा कृती कार्यक्रमांमध्ये क्रीडा-एकात्मिक शिक्षण पद्धतीचे अवलंबन करते. | ||||||||
47 | ४) विद्यार्थीनी डिजिटल साधनांचा वापर करण्यावर भर देणे. विविध बाबींचे प्रक्रिया अहवाल असल्याची खात्री करणे. | ||||||||
48 | 1 | 3 | मानक क्र.१२ | १.३.३ शाळा त्यांच्या इंटर्नशिप योजनेअंतर्गत स्थानिक उद्योगांच्या माध्यमाने इंटर्नशिप / क्षेत्रभेट / दप्तरविना शाळा व उद्योजकतेच्या संधी प्रदान करते. | १.१ शालेय कामाचे दहा दिवस हे इंटर्नशिप / क्षेत्रभेट / दप्तरविना शाळा म्हणून निर्धारित केले जातात व या दिवसांमध्ये शाळेत सर्व प्रकारच्या आनंददायी उपक्रमांचे आयोजन केले जाते. | २.१ शाळा पारंपारिक स्थानिक कला, व्यावसायिक हस्तकला, उद्योजकता, कृषी किंवा इतर कोणत्याही विषयात जेथे स्थानिक कौशल्य अस्तित्वात आहे अशा विविध विषयांमध्ये स्थानिक प्रतिष्ठित व्यक्ती किंवा तज्ञांना 'तज्ञ मार्गदर्शक' म्हणून नियुक्त करण्यास प्राधान्य देते. | ३.१ शाळेचे सर्व विद्यार्थी इंटर्नशिप / क्षेत्रभेट / दहा दिवसांच्या दप्तर विना शाळा या उपक्रमात सहभागी होतात आणि शाळेने व्यवस्था केल्यानुसार शाळेच्या आवारात किंवा बाहेर स्थानिक तज्ञ व्यवसायिकांसोबत राहून प्रशिक्षण घेतात. . | ४.१ विविध व्यवसायातील पालकांशी नियमित संवाद साधून शाळा विद्यार्थ्यांना विविध व्यापार, व्यवसाय आणि उद्योग यांविषयी माहिती देते. | १)शालेय कामाचे दहा दिवस हे इंटर्नशिप / क्षेत्रभेट / दप्तरविना शाळा म्हणून निर्धारित केले जातात व या दिवसांमध्ये शाळेत सर्व प्रकारच्या आनंददायी उपक्रमांचे आयोजन करणे. दप्तराविना शाळा वेळापत्रक असल्याची खात्री करणे. |
49 | २) स्थानिक प्रतिष्ठित व्यक्ती किंवा तज्ञांना 'तज्ञ मार्गदर्शक' म्हणून नियुक्त करण्यास प्राधान्य देणे. | ||||||||
50 | ३) दप्तराविना शाळा कार्यक्रमाची नोंदवही, इतिवृत्त वही, दहा दिवस दप्तराविना शाळा व स्थानिक उद्योग, स्थानिक कारागीर, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटन ठिकाणे, स्मारके इ. ठिकाणी भेट दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणे बाबत अहवाल तयार करणे. | ||||||||
51 | ४) विविध कला व हस्तकलेतील विद्यार्थ्यांच्या उपक्रमांचे प्रदर्शन आणि त्यासंबंधीचे फोटो, व्हिडिओ, विद्यार्थ्यांनी लिहिलेले अहवाल, लेख, विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या आणि अभिनय केलेल्या नाट्यनिर्मितीवरील लेख पाहणे. | ||||||||
52 | 1 | 3 | मानक क्र.१३ | १.३.४ शाळा वैचारिक, सामाजिक आणि भावनिक कौशल्यावर लक्ष केंद्रित करणारा जीवन कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित करते. | १.१ शाळेमध्ये वैचारिक, सामाजिक आणि भावनिक कौशल्यांवर लक्ष केंद्रित करणारा इयत्ता आणि वय,जीवन कौशल्य विकास कार्यक्रम राबविला जातो | २.१ सर्व शिक्षकांना एकात्मिक पद्धतीने जीवनकौशल्ये देण्याचे प्रशिक्षण दिले आहे. | ३.१ विशेषतः शाळेत किशोरवयीन विद्यार्थ्यांना समुपदेशन उपलब्ध करून दिले जाते. ३.२ शाळेचे समुपदेशक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात शिक्षकांसोबत सक्रियपणे सहभागी होतात. | ४.१ दैनंदिन जीवन हाताळण्याच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी अपेक्षित जीवन कौशल्ये आत्मसात केली आहेत. | १) जीवन कौशल्ये विषयक उपक्रम अंमलबजावणी करणे. अहवाल असल्याची खात्री करणे. |
53 | २) शिक्षकांना एकात्मिक पद्धतीने जीवनकौशल्ये देण्याचे प्रशिक्षण देणे. शिक्षक-प्रशिक्षण पुरावा पाहणे. | ||||||||
54 | ३) शाळेत किशोरवयीन विद्यार्थ्यांना समुपदेशन उपलब्ध करून देणे. समुपदेशकाने केलेल्या समुपदेशनाचा पुरावा पाहणे. | ||||||||
55 | ४) दैनंदिन जीवन हाताळण्याच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी उपक्रमांचे आयोजन करणे. शालेय अभिलेखे असल्याची खात्री करणे. | ||||||||
56 | 1 | 3 | मानक क्र.१४ | १.३.५ शाळा अत्याधुनिक ज्ञान आणि भविष्यातील तंत्रज्ञानाच्या विकासाशी संबंधित संधी प्रदान करते.उदा.आयटी,अटल टिंकरिंग लॅब, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग, 3-डी प्रिंटिंग, आयओटी, तंत्रज्ञान, डेटा अनॅलिटिक्स, स्पेस टेक्नॉलॉजी, कृत्रिम बुद्धिमत्ता, व्यवसायिक बुद्धिमत्ता, ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी, सायबर सिक्युरिटी, डेटा सायन्स, रोबोटिक्स इत्यादी. | १.१ शाळेकडे तंत्रज्ञान वापराच्या योजना आहेत. | २.१ शाळा शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानासाठी योग्य प्रशिक्षण आणि अभिमुखता प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देते. | ३.१ शाळा आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देऊन सुनियोजित पद्धतीने नवीन तंत्रज्ञान शिकण्याच्या संधी निर्माण करते | ४.१ शाळा भविष्यकालीन तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना प्रकल्प-कार्य, समस्या सोडवणे, हॅकाथॉन सहभाग इत्यादी द्वारे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतात. | १) कला, ज्ञान, आणि भविष्यवादी तंत्रज्ञानाच्या समाविष्ट असणारे वार्षिक अभ्यासक्रम आणि अध्यापन नियोजन याबाबत मार्गदर्शन करणे. |
57 | २) निवडक शिक्षकांसाठी कला, ज्ञान आणि भविष्यवादी तंत्रज्ञानाबाबत शिक्षक प्रशिक्षण देणे. | ||||||||
58 | ३)शाळा आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देऊन सुनियोजित पद्धतीने नवीन तंत्रज्ञान शिकण्याच्या संधी निर्माण करते. कला, ज्ञान, आणि भविष्यातील तंत्रज्ञानाबाबत कार्यशाळा/चर्चासत्रे, नमुना पाठ नियोजन पाहणे. | ||||||||
59 | ४)शाळा विद्यार्थ्यांना प्रकल्प-कार्य, समस्या सोडवणे, हॅकाथॉन सहभाग इत्यादी द्वारे नवीन तंत्रज्ञानाचा वापर यावर भर देणे. | ||||||||
60 | 1 | 3 | मानक क्र.१५ | १.३.६ शाळा स्थानिक 'लोकविद्ये' चा प्रचार करते आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यावहारिक आणि सैद्धांतिक बाबींबद्दल परिचय करून देते. | १.१ शाळा स्थानिक लोक-विद्या / व्यापार / उद्योग / शेतीविषयक उपक्रमांचे सर्वेक्षण करून माहिती संकलित केलेली माहिती करते. | २.१ शाळा परिचित असणाऱ्या व्यापार/ उद्योग / शेती क्षेत्रातील तज्ञांना शालेय उपक्रमात सहभागी करून घेते व त्यांचे ज्ञान, कौशल्य आणि कुशलता विद्यार्थ्यांसोबत सामायिक करण्यास प्रोत्साहन देते. | ३.१ शाळा विद्यार्थ्यांना व्यापार / उद्योग / शेतीविषयक तज्ञांकडून लोकविद्या, व्यावसायिक कौशल्य तसेच शेतीविषयक माहिती जाणून घेण्याच्या संधी उपलब्ध करून देते | ४.१ शाळा विद्यार्थ्यांना व्यापार / उद्योग / शेतीविषयक तज्ञांकडून लोकविद्या, व्यावसायिक कौशल्य तसेच शेतीविषयक माहितीचा दैनदिन जीवनात उपयोग करतात. | १) शाळांना स्थानिक लोक-विद्या / व्यापार / उद्योग / शेतीविषयक उपक्रमांचे सर्वेक्षण करून माहिती संकलित करणेबाबत कळविणे. |
61 | २) आपल्या परिचित असणाऱ्या व्यापार/ उद्योग / शेती क्षेत्रातील तज्ञांना शालेय उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी यादी तयार करणे. व त्यांचे ज्ञान, कौशल्य आणि कुशलता विद्यार्थ्यांच्या सोबत सामायिक करणे | ||||||||
62 | ३) विद्यार्थांना लोकविद्या, व्यावसायिक कौशल्य तसेच शेतीविषयक माहिती जाणून घेण्याच्या संधी उपलब्ध करून देणे. | ||||||||
63 | ४) विद्यार्थ्यांना व्यापार / उद्योग / शेतीविषयक तज्ञांकडून लोकविद्या, व्यावसायिक कौशल्य तसेच शेतीविषयक माहितीचा दैनदिन जीवनात उपयोग करण्यासाठी उपक्रमांची अंमलबजावणी करणे. उपक्रमाबाबत अभिलेखे उपलब्ध करून ठेवणे | ||||||||
64 | 1 | 3 | मानक क्र.१६ | १.३.७ शाळा प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षक/स्थानिक कलाकार/पालक/संयुक्त विषय मंडळे किंवा शेजारच्या शाळा/ऑनलाईन क्लासेससह क्लब यांच्या मदतीने कोणत्याही एका कला क्षेत्रात किंवा क्षेत्रांच्या संयोजनात प्रत्येक विद्यार्थ्याला कला शिक्षणासाठी भरपूर संधी उपलब्ध करून देते. (उदा – लोककला, रेखाचित्र आणि चित्रकला, नृत्य, संगीत, साहित्य आणि कविता, थिएटर, ग्राफिक डिझायनिंग, ॲनिमेशन इ.) | १.१ शाळा वेळापत्रकात कला, संगीत आणि नृत्य नाट्य इ. तासिकांचा कालावधी समावेश करते. | २.१. शाळा विद्यार्थ्यांना विविध कला प्रदर्शनामध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देते. शाळा स्थानिक लोककला आणि हस्तकला यांना प्रोत्साहन देते. | ३.१ कला शिक्षणाचे महत्त्व पालक/पालक आणि शाळा व्यवस्थापन यांच्या निदर्शनास आणून देऊन त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी अभिमुखता कार्यक्रम आयोजित केले जातात. | ४.१ विद्यार्थी विभागीय/राज्य/राष्ट्रीय स्तरावरील संबंधित स्पर्धा/इव्हेंट/क्रियाकलाप/विषय मंडळे/क्लब इत्यादींमध्ये भाग घेतात. | १) शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना कला, संगीत आणि नृत्य नाट्य इ. शिक्षणाच्या कृतींसाठी समाविष्ट केलेली तासिका दर्शवणारी शाळेची दिनदर्शिका तयार करणेबाबत मार्गदर्शन करणे. |
65 | २)विविध कला प्रदर्शने आयोजित करणे .स्थानिक लोककला आणि हस्तकला यांना प्रोत्साहन देणे. उदा. 'एक भारत श्रेष्ठ भारत' या कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेला कला शिक्षण उपक्रम | ||||||||
66 | ३) कला शिक्षणाचे महत्त्व पालक/पालक आणि शाळा व्यवस्थापन यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी अभिमुखता कार्यक्रमाचे आयोजन करणे. | ||||||||
67 | ४) विद्यार्थीना विभागीय/राज्य/राष्ट्रीय स्तरावरील संबंधित स्पर्धा/इव्हेंट/क्रियाकलाप/विषय मंडळे/क्लब इत्यादींमध्ये भाग घेण्यासाठी प्रवृत्त करणे. | ||||||||
68 | 1 | 4 | मानक क्र.१७ | १.४.१ विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य, खेळ आणि तंदुरुस्त राहण्याची आजीवन सवय आणि संस्कृती रुजवण्यासाठी शाळेचे धोरण आहे. | १.१ शाळेमध्ये बैठे खेळ,मैदानी खेळ व योगाभ्यास घेतला जातो. या मध्ये दिव्यागाना सहभागी केले जाते. शाळेमध्ये दिव्यांगासह प्राथमिक खेळाची सुविधा उपलब्ध आहे. | २.१ शाळेत नियमित शारीरिक शिक्षण देणारे क्रीडा शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांना नियमितपणे योग- प्राणायाम, ध्यान, संतुलित आहार, व्यायाम यासारख्या निरोगी जीवनशैलीतील महत्त्वाच्या घटकांची माहिती दिली जाते. | ३.१ भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या फिट इंडिया ॲपच्या मदतीने शाळा दिव्यांगासह विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि तंदुरुस्तीचे मूल्यांकन करते. | ४.१ शालेय विकास आराखड्यात शारीरिक शिक्षण आणि खेळ यांचा समावेश करण्यात आला आहे. ४.२ शालेय क्रीडा संघ/ वैयक्तिक विद्यार्थी\ दिव्यांगासह स्थानिक ते राष्ट्री य स्तारापर्यंतच्या क्रीडास्पपर्धामध्येह सक्रीय सहभागी होतात. ४.३ विद्यार्थ्यांना निरोगी जीवनशैलीचा पाठपुरावा करता यावा म्हणून प्रोत्साहित करण्यासाठी प्रतिभावान, व्यावसायिक आणि उत्साही क्रीडा व्यक्तींशी संपर्क साधला जातो. ४.४ खेलो इंडियामध्ये दिव्यांगासह सर्व विद्यार्थी सहभागी होतात. | १. शाळेमध्ये बैठे खेळ,मैदानी खेळ व योगाभ्यास यासह दिव्यांगासाठी प्राथमिक खेळाची सुविधा उपलब्ध करणे. |
69 | २. विद्यार्थ्यांना नियमितपणे योग- प्राणायाम, ध्यान, संतुलित आहार, व्यायाम यासारख्या निरोगी जीवनशैलीतील महत्त्वाच्या घटकांची माहिती देण्यासाठी कार्यशाळा आयोजित करणे . शाळेत नियमित शारीरिक शिक्षण देणारे पात्र क्रीडा शिक्षक नियमानुसार नियुक्त करणे. | ||||||||
70 | ३. फिट इंडिया ॲपच्या मदतीने शाळा दिव्यांगासह सर्व विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि तंदुरुस्तीचे मूल्यांकन करते. उपलब्ध मोकळी जागा नसेल तर जवळच्या जागेबाबत / क्रीडांगण मिळण्यासाठी करार करणे. | ||||||||
71 | ४.विद्यार्थ्यांसाठी मूलभूत क्रीडा साहित्य (चेंडू, बॅट, दोरी, योगा मॅट इ.) उपलब्ध करण्यासाठी आदेशित करणे किंवा शाळास्तरावर साहित्य नियोजन करण्यास आदेशित करणे. | ||||||||
72 | ५.आरोग्य व तंदुरुस्ती विषयक सूचना फलक / माहिती पत्रके लावणे . | ||||||||
73 | ६. शाळेतील वार्षिक क्रीडा कृती आराखडा (Annual Sports Plan) तपासणे / तयार करणे. | ||||||||
74 | ७.आरोग्य तपासणी शिबिरे आहार, स्वच्छता व जीवनशैली यावर तज्ज्ञांचे विद्यार्थी व शिक्षकांसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित करणे. | ||||||||
75 | ८.शालेय स्तरावर क्रीडा स्पर्धा व उपक्रम नियमित होतात का ते पाहणे. | ||||||||
76 | ९.वार्षिक क्रीडा महोत्सव, योग दिन, आरोग्य सप्ताह यांसारखे उपक्रम धोरणात्मक पातळीवर राबवण्यासाठी आदेशित करणे. | ||||||||
77 | १०. स्थानिक स्वराज्य संस्था, क्रीडा क्लब, NGO यांच्याशी दीर्घकालीन भागीदारी करिता संपर्क करणे | ||||||||
78 | ११.विशेष गरजांच्या विद्यार्थ्यांसाठी अनुकूल खेळ, विद्यार्थ्यांमध्ये स्वयंप्रेरणा, नेतृत्व, संघभावना विकसित करणारे उपक्रम या बाबत माहिती घेणे. | ||||||||
79 | 1 | 4 | मानक क्र.१८ | १.४.२ शाळेतील सर्व मुलांची वार्षिक आरोग्य तपासणी केली जाते. | १.१ शाळेतील सर्व मुलांची वार्षिक आरोग्य तपासणी केली जाते. | २.१ शाळेतील 100% मुलांची नियमित आरोग्य तपासणी केली जाते २.२ 100% मुलांच्या लसीकरणाची पडताळणी केली जाते. २.३ आरोग्य तपासणी संदर्भातील संनियंत्रणासाठी हेल्थ कार्ड दिले जातात. | ३.१ सर्व मुलांकडे ABHA -ID (आयुष्यमान भारत ओळखपत्र ) आहे. ABHA – ID आयुष्यमान भारत ओळखपत्रानुसार आरोग्य विषयक नोंदी डिजिटल पद्धतीने ठेवल्या जातात. | ४.१ आरोग्य तपासणीच्या आधारे पालकांचे समुपदेशन केले जाते. ४.२ फिट इंडिया ॲप आणि त्यांच्या शिक्षकांनी परीक्षण करून निर्देशित केलेले व साध्य करता येण्यायोग्य आरोग्य विषयक उद्दिष्ट निश्चित करून त्यांच्या आरोग्याची जबाबदारी विद्यार्थी स्वतः घेतात. | १. शाळेत सर्व मुलींची वार्षिक आरोग्य तपासणीचे निश्चित वेळापत्रक तयार करणे . |
80 | २. आरोग्य तपासणीची माहिती शालेय नोंदीत व्यवस्थित जतन करणे. | ||||||||
81 | ३. ABHA-ID (आयुष्मान भारत डिजिटल हेल्थ आयडी) सर्व विद्यार्थांचे काढणे. | ||||||||
82 | ४. आरोग्य विभागाशी समन्वय करण्यासाठी पत्रव्यवहार करणे. | ||||||||
83 | ५. आरोग्य तपासणी अहवाल डिजिटल स्वरूपात नोंदवणे बाबत मार्गदर्शन करणे. | ||||||||
84 | ६. आरोग्य तपासणीच्या आधारे समुपदेशन सत्रांचे आयोजन करणे. | ||||||||
85 | ७. फिट इंडिया अॅप व इतर शासकीय आरोग्य अॅप्सबाबत शिक्षकांचे प्रशिक्षण आयोजन करणे. | ||||||||
86 | ८. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ,पालकांना आरोग्य अहवालाची माहिती देणे व उपचारासाठी मार्गदर्शन करणे . | ||||||||
87 | 1 | 4 | मानक क्र.१९ | १.४.३ शाळेतील सर्व मुलांची तपासणी (screening) प्रशस्थ ॲपवर (PRASHASHT App) केली जाते (PRASHASHT App अपंगत्व तपासण्यासाठी NCERT ने विकसित केले आहे.) | १.१ शाळा संबंधित यंत्रणेकडून शिक्षकांना (PRASHAST) प्रशस्त ॲपचा वापर करण्याबाबतचे व विद्यार्थ्यांच्या प्राथमिक आरोग्य तपासणीचे (screening) प्रशिक्षण आयोजन करते. | २.१ शाळा सर्व मुलांचे PASHASHT प्रशस्त अँप द्वारे प्राथमिक तपासणी (screening) केल्याची खात्री करते. शिक्षक त्यांचे PRASHAST वर आधारित निरीक्षण पालकांच्या निदर्शनास आणून देतात | ३.१ शाळा सर्व मुलांचे PASHASHT प्रशस्त ॲपवर तपासणी (screening) करते. तपासणी (स्क्रीनिंग) आणि तज्ञांच्या मूल्यांकनानंतर ओळखल्या जाणार्या स्पेसिफिक लर्निंग डिसॅबिलिटीज आणि ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असलेल्या विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी विशेष शिक्षकांकडे पाठविले जाते. | ४.१ सर्व शिक्षकांना त्यांच्या वर्गातील दिव्यांग असणाऱ्या विद्यार्थ्यांना हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जाते. ४.२ दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा नियमित पालकांचे समुपदेशन करते. | १. PRASHAST App चा वापर करण्याबाबत अधिकृत आदेश करणे. |
88 | २. सर्व वर्गशिक्षकांसाठी PRASHAST App वापराचे प्रशिक्षण आयोजित करणे | ||||||||
89 | ३.प्राथमिक तपासणी (Screening) म्हणजे काय, उद्देश काय आहे याबाबत शिक्षकांना स्पष्ट मार्गदर्शन करणे. | ||||||||
90 | ४.शाळेतील सर्व मुलांचे PRASHAST App द्वारे Screening पूर्ण करणे बाबत आदेशित करणे . | ||||||||
91 | ५.Screening अहवालावर आधारित वर्गनिहाय व विद्यार्थी-निहाय नोंदी ठेवणे . | ||||||||
92 | ६.विशेष शिक्षक उपलब्ध करून देणे. | ||||||||
93 | ७.शाळेत विशेष गरज असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अनुकूल अध्यापन योजना राबवणे. | ||||||||
94 | ८.शिक्षकांना समावेशक शिक्षण (Inclusive Education) विषयक प्रगत प्रशिक्षण आयोजन करणे. | ||||||||
95 | ९.PRASHAST Screening चा नियमित आढावा, अद्ययावत नोंदी व दस्तऐवजीकरण करणे बाबत आदेशित करणे. | ||||||||
96 | 1 | 5 | मानक क्र.२० | १.५.१ शाळा काळजी, करुणा आणि आदरार्थी वातावरणात मूल्ये वृद्धिंगत करते. विविधतेचे स्वागत करते आणि सर्व शालेय भागधारकांत सांस्कृतिक मूल्यांची रुजवणूक करते. | १.१ मूल्यशिक्षणाचा समावेश असलेला अभ्यासक्रम आराखडा SCERT ने तयार केलला उपलब्ध असून शिक्षक तो वापरतात. १.२ अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मूल्यांचा अंतर्भाव केला जातो. १.३ शाळा संबंधित मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी उपक्रमांची आखणी करते | २.१एकात्मिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून मूल्ये प्रदर्शित केली जातात. २.२शाळा समाजातील अनादर, असमानता आणि भेदभाव कमी करून आपसात समभाव प्रस्थापित करते | ३.१ पारंपारिक भारतीय मूल्ये, (ज्येष्ठांचा, पर्यावरणाचा, अन्न, प्राणी, वनस्पती) इत्यादींचा आदर करणेबाबत शाळा विद्यार्थ्यांना मदत करते. ३.२ शाळा विविध पार्श्वभूमी आणि दृष्टिकोनाचे विदयार्थी आणि शिक्षकांचे स्वागत करते आणि त्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम/प्रसंग साजरे करते. | ४.१ शालेय धोरण, अभ्यासक्रम, वर्तणूक आणि शाळेतील नातेसंबंध हे सर्व- समावेशक, नैतिक आणि आदरपूर्ण असून प्रभावीपणे अंमलात आणले जातात आणि त्याचे नियमितपणे पुनरावलोकन केले जाते. ४.२ सर्व भागधारकांद्वारे माहितीच्या आधारे व एकमेकांच्या सहकार्याने घेतले गेलेले निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी असतात. व ते नैतिकता, समानता आणि प्रतिष्ठेची संहिता प्रतिबिंबित करतात. ४.३ विद्यार्थी अध्ययन निष्पत्ती साध्यता या शालेय नोंदी, विद्यार्थी संचयी नोंदपत्रक, दैनंदिन निरीक्षण आणि परस्पर आंतरक्रिया यामधून प्रतिबिंबित होतात. | १. सर्व शिक्षकांना मूल्यशिक्षण व करुणाधारित अध्यापन यावर प्रशिक्षण देणे. मूल्यशिक्षणाचा समावेश असलेला SCERT ने तयार केलला अभ्यासक्रम आराखडा शाळेत उपलब्ध करून अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मूल्यांचा अंतर्भाव करून शिक्षकांना वापरण्यास आदेशित करावे. मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी उपक्रमांची आखणी करणे. |
97 | २.वर्गात मूल्यांवर आधारित चर्चा, कथा, उदाहरणे वापरण्याबाबत मार्गदर्शन करणे . | ||||||||
98 | ३.शाळेतील नियमावलीत आदर्श वर्तन संहिता (Code of Conduct) समाविष्ट करणे बाबत आदेशित करणे. | ||||||||
99 | ४.SCERT / राज्य अभ्यासक्रमानुसार मूल्याधारित साहित्य उपलब्ध करून देणे | ||||||||
100 | ५. समाजातील अनादर, असमानता व भेदभाव यावर प्रकल्प व चर्चा आयोजित करणे. | ||||||||