1 of 19

����Garde :IX & X��मराठी व्याकरण : काळ व त्याचे प्रकार

PODAR INTERNATIONAL SCHOOL,

Osmanabad

2 of 19

वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो, तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचाही बोध होतो त्याला ‘काळ’ असे म्हणतात.

  • काळ म्हणजे काय?
  • काळाचे प्रमुख 3 प्रकार पडतात.
  • वर्तमान काळ
  • भूतकाळ
  • भविष्यकाळ

3 of 19

1) वर्तमानकाळ :

क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ ‘वर्तमानकाळ’ असतो.

उदा.

मी आंबा खातो.

मी क्रिकेट खेळतो.

ती गाणे गाते.

आम्ही अभ्यास करतो.

4 of 19

  • वर्तमानकाळाचे 4 उपप्रकार पडतात.

i) साधा वर्तमान काळ

ii) अपूर्ण वर्तमान काळ / चालू वर्तमानकाळ

iii) पूर्ण वर्तमान काळ

iv) रीती वर्तमानकाळ / चालू पूर्ण वर्तमानकाळ

5 of 19

i) साधा वर्तमान काळ

जेंव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते असे समजते तेव्हा त्या वाक्याचा काळ साधा वर्तमानकाळ असतो.

उदा. 

  • मी आंबा खातो.
  • कृष्णा क्रिकेट खेळतो.
  • प्रिया चहा पिते.

6 of 19

ii) अपूर्ण वर्तमान काळ / चालू वर्तमानकाळ

जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरुन क्रिया वर्तमानामध्ये चालू किंवा सुरू असल्याचा बोध होतो. तेव्हा वाक्याचा काळ अपूर्ण वर्तमान असतो.

उदा. 

  • सुरेश पत्र लिहीत आहे.
  • दिपा अभ्यास करीत आहे.
  • आम्ही जेवण करीत आहोत.

7 of 19

iii) पूर्ण वर्तमान काळ

जेव्हा क्रिया ही वर्तमानकाळातील असून ती नुकतीच पूर्ण झालेली असेल तेव्हा त्याला ‘पूर्ण वर्तमानकाळ’ असे म्हणतात.

उदा.

  • मी आंबा खाल्ला आहे.
  • आम्ही पेपर सोडविला आहे.
  • विधार्थ्यांनी अभ्यास केला आहे.

8 of 19

iv) रीती वर्तमानकाळ / चालू पूर्ण वर्तमानकाळ

वर्तमानकाळात एखादी क्रिया सतत घडत असल्याची रीत दाखविली तर त्याला ‘रीती वर्तमानकाळ’ असे म्हणतात.

उदा.    

  • मी रोज फिरायला जात असतो.
  • प्रदीप रोज व्यायाम करत असतो.
  • कृष्णा दररोज अभ्यास करत असतो.
  • राघव देवपूजेला फुले आणत असतो.

9 of 19

2)  भूतकाळ :

जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते. असा बोध होतो तेव्हा त्या काळाला ‘भूतकाळ’ असे म्हणतात.

उदा.

राम शाळेत गेला.

मी अभ्यास केला.

तिने जेवण केले.

भूतकाळचे 4 उपप्रकार पडतात.

10 of 19

i) साधा भूतकाळ

भूतकाळचे 4 उपप्रकार पडतात.

एखादी क्रिया ही अगोदर घडून गेलेली असते तेव्हा त्या काळास ‘साधा भूतकाळ’ असे म्हणतात.

उदा.

  • रामने अभ्यास केला
  • मी पुस्तक वाचले.
  • सिताने नाटक पाहिले.

11 of 19

ii) अपूर्ण/चालू भूतकाळ

एखादी क्रिया मागील काळात चालू होती किंवा घडत होती म्हणजेच त्यावेळेस ती क्रिया अपूर्ण होती तेव्हा क्रियेच्या त्या अवस्थेला ‘अपूर्ण भूतकाळ/चालू भूतकाळ’ असे म्हणतात.

उदा. 

  • मी आंबा खात होतो.
  • दीपक गाणे गात होता.
  • ती सायकल चालवत होती.

12 of 19

iii) पूर्ण भूतकाळ

एखादी क्रिया मागील काळात पूर्ण झालेली असते किंवा ती क्रिया पुर्णपणे संपलेली असते, असा जेव्हा अंदाज येतो तेव्हा त्याला ‘पूर्ण भूतकाळ’ असे म्हणतात.

उदा.

  • सिद्धीने गाणे गाईले होते.
  • मी अभ्यास केला होता.
  • त्यांनी पेपर लिहिला होता.
  • राम वनात गेला होता.

13 of 19

iv) रीती भूतकाळ / चालू पूर्ण भूतकाळ

भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडत आलेली असून ती क्रिया पूर्ण देखील झालेली असते. अशा काळाला ‘चालू-पूर्ण भूतकाळ’ किंवा ‘रीती भूतकाळ’ असे म्हणतात.

उदा.

  • मी रोज व्यायाम करीत असे.
  • ती दररोज मंदिरात जातअसे.
  • प्रसाद नियमित शाळेत जात असे.

14 of 19

3)  भविष्यकाळ :

क्रियापदाच्या रूपावरुन जेव्हा एखादी क्रिया ही पुढे घडणार आहे, याची जाणीव होते, तेव्हा त्या काळाला ‘भविष्यकाळ’ असे म्हणतात.

उदा.

  • मी सिनेमाला जाईन.
  • मी शिक्षक बनेल.
  • मी तुझ्याकडे येईन.

15 of 19

  1. साधा भविष्यकाळ

जेव्हा एखादी क्रिया पुढे घडणार असेल असा बोध होतो अशा वेळी ‘साधा भविष्यकाळ’ असतो.

उदा.

  • उद्या पाऊस पडेल.
  • उद्या परीक्षा संपेल.
  • मी सिनेमाला जाईन.

16 of 19

ii) अपूर्ण / चालू भविष्यकाळ

जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळामध्ये चालू असेल किंवा पूर्ण झाली नसेल तेव्हा त्याला ‘अपूर्ण भविष्यकाळ’ असे म्हणतात.

उदा. 

  • मी आंबा खात असे.
  • मी गावाला जात असे.
  • पूर्वी अभ्यास करत असेल.
  • दिप्ती गाणे गात असेल.

17 of 19

iii) पूर्ण भविष्यकाळ

जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळातील असून ती पूर्ण झाल्याची जाणीव झालेली असते तेव्हा त्याला ‘पूर्ण भविष्यकाळ’ असे म्हणतात.

उदा. 

  • मी आंबा खाल्ला असे.
  • मी गावाला गेलो असे.
  • पूर्वाने अभ्यास केला असेल.
  • दिप्तीने गाणे गायले असेल.

18 of 19

iv) रीती भविष्यकाळ / चालू पूर्ण भविष्यकाळ

जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यात नेहमी घडणारी असेल, तर त्याला ‘रीती/ चालू पूर्ण भविष्यकाळ’ असे म्हणतात.

उदा.

  • मी रोज व्यायाम करत असेन .
  • पूर्वी रोज अभ्यास करत असेल.
  • सुनील नियमित शाळेत जात असेल.

19 of 19