1 of 4

प्रा. शामल कुलदीप पाटील अर्थशास्त्र विभाग पद्मभूषण डॉ वसंतराव दादा पाटील महाविद्यालय तासगाव

2 of 4

पैशाची ओळख

  • प्रस्तावना- पैशाचे अर्थव्यवस्थेतील काम हे मानवी शरीरातील रक्ताप्रमाणे असते. मानवी शरीरामध्ये ज्याप्रमाणे रक्त प्रवाह हा सातत्याने होत राहणे हे विविध अवयवांच्या सुरळीत कामकाजासाठी गरजेचे असते. त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांचे व घटकांचे काम सुरळीतपणे चालू राहण्यासाठी पैसा सतत पणे फिरत राहिला पाहिजे.

3 of 4

पैशाची व्याख्या

  • जी.डी.एच.कोल – पैशाच्या बाबतीतील अत्यावश्यक बाब म्हणजे त्याचे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सातत्याने संक्रमण करता येते.
  • हार्टले विदर्स – पैसा म्हणजे अशी बाब आहे की जिच्या आधारे आपण वस्तूंची खरेदी विक्री करू शकतो.
  • सेलिंगमन – पैसा म्हणजे अशी गोष्ट असते की जिला सार्वत्रिक मान्यता प्राप्त असते.

4 of 4

पैशाची कार्ये

प्राथमिक कार्ये १.विनिमयाचे साधन

२.मूल्य मापनाचे साधन

दुय्यम कार्ये – १.भविष्यातील देणी देण्याचे साधन

२.मूल्य संग्रहाचे साधन

३.मूल्य हस्तांतरणाचे साधन

आकस्मित कार्ये – १.राष्ट्रीय उत्पनाचे विभाजन

२.सीमांत उपायोगीतेचे समानीकरण

३.पतव्यवस्थेचा आधार

४.मालमत्तेस रोखता