१९६८ चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण�
डॉ. श्रीकांत मगर
सहाय्यक प्राध्यापक, लोकप्रशासन विभाग,
श्रीमती एस.के.गांधी महाविद्यालय, कडा.
१९६८ चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण
१९६८ च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे
३) मोफत व सक्तीचे शिक्षण या कार्यक्रमासाठी अधिक परिश्रम घेण्यासाठी धरलेला आग्रह योग्यच होता. विशेषत: नापासी आणि गळतीवर भर देऊन या धोरणाने नेमक्या समस्येकडे लक्ष वेधले.
४) कृषी व उद्योग शिक्षण विकासावर द्यावा प्रत्येक राज्यात एक कृषी विद्यापीठ असावे. त्यात संलग्न विद्यालये असावीत. उद्योगांतील कार्यात्मक प्रशिक्षण असावे, रोजगाराच्या संधीत संतुलन राखण्याचा प्रयत्न करावा.
५) विद्यापीठ स्तरावर पदव्युत्तर अभ्यासक्रम, संशोधन व अभ्यासाची नवीन केंद्रे स्थापण्यावर भर द्यावा.
६) विद्यापीठीय शिक्षणात प्रयोगशाळा, ग्रंथालय, इतर सुविधांनुसार विद्यापीठ, महाविद्यालय विद्यार्थी संख्या निश्चित ठरवावी.
७) सर्व देशभरात १० + २ + ३ या शैक्षणिक आकृतिबंधाचा स्वीकार करावा.