ग्रामीण (कला,वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय,वसंतनगर मुखेड जि . नांदेड
मराठी विभाग
सत्र पहिले
बी.ए.प्रथम वर्ष
अभ्यासक्रम मराठी(ऐच्छिक)
अभ्यासपत्रिका पहिली
आधुनिक मराठी कथा वाङ्मय
डॉ.कविता लोहाळे
सत्र पहिले �बी.ए.प्रथम वर्ष मराठी (ऐच्छिक) �अभ्यासपत्रिका पहिली- आधुनिक मराठी कथा वाङ्मय
अभ्यासपत्रिकेची उद्दिष्टे
१)कथा वाङ्मय प्रकार समजून घेणे.
२)मराठी कथा वाङ्मयाचे कालानुक्रमे स्वरूप समजून घेणे.
३) कथा वाङ्मयाच्या विविध प्रकाराची ओळख करून घेणे.
४)कथा वाङ्मयाची अभिरूची निर्माण करणे.
अभ्यासघटक
१)अतिथी देवो भव ! – वामन चोरघडे
२) मोत्याचे पीक – वि .स. खांडेकर
३) किडलेली माणसं – गंगाधर गाडगीळ
४) विलायती पीक – शंकर पाटील
५) वाळवण - रा.रं.बोराडे
६) निर्वासित – अविनाश डोळस
७) कुऱ्हाडीचे दांडे – श्रीराम गुंदेकर
८) वारसा - सानिया
९) शुद्ध बीजापोटी - रेखा बैजल
१०)बरकत – साहिल शेख
अतिथी देवो भव! लेखक – वामन चोरघडे
लेखक परिचय- वामन कृष्ण चोरघडे (१९१४-१९९५)लघूकथा लेखक म्हणून प्रसिध्द.कथा बालसाहित्य, लोककथा,चरित्र आणि विपुल अनुवादित साहित्य.१९३२ मध्ये त्यांची ‘अम्मा’ ही पहिली कथा प्रकाशित झाली.
कथासंग्रह -‘सुषमा’, ‘हवन’, ‘यौवन’, ‘प्रस्थान’, ‘पाथेय’, ‘संस्कार’, ‘प्रदिप’, ‘ओंजळ’, ‘नागवेल’, ‘मजल’, ‘ख्याल’, ‘साद’, ‘प्रेरणा’ इ.कथासंग्रह प्रकाशित आहेत. त्यांच्या निवडक कथांचे दोन खंड प्रसिध्द आहेत.
लेखक परिचय
आत्मचरित्र -‘जडण-घडण’
इतर ग्रंथसंपदा – ‘साहित्याचे मूलधन’, ‘रंजन आणि बोध’, ‘वाङ्मय व वाङ्मय सेवक’, ‘सुंदरजीवन’ ‘लोककथा आणि समाजजीवन’
अनेक कथासंग्रहाला महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश शासनाचे पुरस्कार मिळाले आहेत.
अतिथी देवो भव
शेती व्यवसायात बैल हा अत्यंत महत्वाचा घटक. तो शेतकऱ्याचा सखा,सोबती,आधारवड असतो.
म्हणून बैलाप्रती शेतकऱ्यांमध्ये अमाप जिव्हाळा आणि लळा आढळतो.त्याच्या कृतज्ञतेचा सोहळा म्हणजे ‘बैलपोळा’. पैकू आणि बायजा आपल्या बैलांवर मुलाबाळाप्रमाणे प्रेम करतात.
पैकूच्या बैलांचा डॉक्टरांची बायको पोळयाच्या दिवशी अपमान करते. बायजा व पैकूला हे सहन होत नाही कारण पैकू व बायजाच्या लेखी बैल म्हणजे केवळ मुकी जनावरे नसून आज ते ‘अतिथी देवो भव!’ आहेत. ही बैलाप्रतीची प्रेमभावना या कथेतून व्यक्त झाली आहे.
पैकू व बायजा हे शेतकरी जोडपे.आठ –दहा एकराच्या शेतीचे मालक.त्याच जमिनीची मशागत बायजा आणि पैकूने गेले आठ दहा महिने केली होती.त्यांच्याजवळ लाल्या व ढवळया ही बैलजोडी होती. उद्या पोळयाचा सण.पैकू आपल्या बैलजोडी घेऊन नदीवर गेला. डोहामध्ये त्याने बैल सोडले आणि स्वत: पाण्यात उडी मारली. बैलांना स्वच्छ केले.
पैकू घरी आला. त्याने बैल अंगणात उभे केले.मुलगा गेरूचे भांडे घेऊन बाहेर आला. आपल्या चिमुकल्या हाताने बैंलांच्या पाठीवर पंजे मारले.नंतर त्याने बैलांची शिंगे लाल करून त्यावर निळया , चंदेरी बेगडाच्या गोल गोल पट्टया चिकटविल्या.सोनतागाच्या फुलमाळा कपाळावर सोडल्या.कवडयांचे पट्टे गळयांत घातले,रानफुलांच्या रंगीबेरंगी माळा,गुलबक्षीचे गजरे गळयांत चढविले.पायात पैंजने बांधली. अशा तऱ्हेने आपल्या बैंलाना सजविले.
तिसरा प्रहर टळला,वडयापुरणाने भरलेल्या पत्रावळी टोपल्यात भरून त्याने लाल्या व ढवळयाला जेवू घातले.बायजा हवे नको ते विचारायला दारात उभी होती. अतिथी तृप्त झाल्याचा आनंद सर्वांनी घेतला.पैकू आपल्या बैलजोडीला घेऊन पोळयाच्या तोरणात उभे करायला व पोळयाच्या सोहळयात सहभागी होण्यासाठी निघाला.
सोहळयातून पैकू घरी आला.बैलांची बायजाने पुजा केली.दिवसभराचा उपवास त्या तीन माणसांच्या कुटूंबाने एका पात्रात जेवून सोडला आणि दोन पानांचा विडा खाऊन पैकू जोडी घेऊन मिरवायला ओळखीच्या घराकडे निघाला.पाटील,मानकरी सर्व आटोपले होते. प्रत्येकाच्या घरी बैंलाच्या कपाळी कुकवाचा टिळाआणि पायावर फुले पडली.पैकूच्या हातावर गुळाचा खडा आणि मुलाच्या हातावर अनुकूल द्रव्य पडले.नंतर ते डॉक्टरांच्या घरी गेले. तिथे डॉक्टर घरी नव्हते. डॉक्टरांच्या पत्नीने पैकूचा अपमान केला व बैलांची पुजा करायची नाकारली आणि रागानेच एक रूपया हातावर ठेवला.पैकू खूप नाराज झाला. घरी परतल्यावर बायजाने नाराजीचे कारण वि चारले असता त्याने घडलेली हकीकत सांगितली. बायजालाही या गोष्टीचा खूप राग आला . तिने डॉक्टरीनबाईची दिलेली नोट तेलवातीवर धरली.तिने म्हटले, लाल्या ढवळया आज आपल्या घरचे पाव्हणे.ती काही आज जनावरे नव्हत. शेतकऱ्यांचे आपल्या बैलांवरचे असलेले जिवापाड प्रेम या कथेतून आले आहे.
गृहपाठ
१) ‘अतिथी देवो भव!’ या कथेतून शेतकऱ्यांचे आपल्या बैलांवर असलेले प्रेम कसे व्यक्त झाले आहे ते तुमच्या शब्दात लिहा?