�����Garde :III�Marathi Project :�मराठी व्याकरण : निबंध लेखन
PODAR INTERNATIONAL SCHOOL,
Osmanabad
निबंध लेखन
माझे आवडते फुल – गुलाब
मला फुले खूप आवडतात; पण गुलाब माझे आवडते फुल आहे .��गुलाबाचे फुल फारच मनमोहक असते . गुलाबाच्या पाकळ्यांची रचना खूप आकर्षक असते . निळे, पांढरे , लाल , पिवळे असे व वेगवेगळ्य़ा रंगाचे गुलाब पहायला मिळतात . गुलाबाला 'फुलांचा राजा' मानतात .��गुलाबाचे रोपटे कुठेही लावता येते . सर्व ऋतूत गुलाबाची फुले फुलतात . त्याच्या रोपट्याला काटे असतात . गुलाब फुललेले रोपटे फारच सुंदर दिसते .��
गुलाबाची फुले देवाला वाहतात . समारंभात गुलाबाच्या फुलांचा वापर करतात . कोणाचेही स्वागत करताना आपण गुलाबाचे फुल देतो. गुलाबापासून गुलकंद तयार करतात. गुलाबापासून सरबतही तयार करतात .