ई-चावडी आज्ञावली
(सरिता नरके)
अपर जिल्हाधिकारी तथा राज्य संचालक,ई-फेरफार प्रकल्प
जमाबंदी आयुक्त कार्यालय,पुणे.
डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम
ई-चावडी प्रकल्पाचा एक उद्देश हा तलाठी दप्तरातील गाव नमुने एक ते एकवीस ऑनलाईन करून सर्वसामान्य नागरिकांना महसुलाची आकारणीची रक्कम वेब पोर्टल वर उपलब्ध करून देणे व तेथून सदर रक्कम शासनाच्या तिजोरीत भरणे हे आहे. ही कार्यवाही आपोआप संगणकाच्या माध्यमातून होणे आवश्यक आहे.�यासाठी आवश्यक पेमेंट गेटवे, ज्याद्वारे नागरिकांना ऑनलाईन रक्कम जमा करता येईल व त्याची पावती मिळेल. तसेच अशा जमा रक्कमा तलाठ्याच्या नावे ग्रास प्रणालीचा वापर करून याच पेमेंट गेटवे सिस्टीम द्वारे सरकारच्या तिजोरीत भरणा करणेत येतील. अशी प्रणाली विकसित करणेचे काम चालू आहे. या कामकाजानुसार उपलब्ध पेमेंट गेटवे सर्व्हिस देणाऱ्या संस्थेस शासन (वित्त विभाग) मान्यतेने ई-चावडी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी वापरण्यात येईल.
ई-चावडी बाबत माहिती
१. ई-चावडी प्रकल्पामध्ये तलाठी दप्तरातील गाव नमुने एक ते एकवीस मधील नमुने ऑनलाईन अद्यायावत � करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. �२. गाव नमुना ७/१२,आठ-अ,सहा,सहा-अ,सह-क, ई-फेरफार आज्ञावली मध्ये यापूर्वी ऑनलाईन करण्यात � आल्याने ई-चावडी प्रकल्पामधून वगळण्यात आले आहे.�३.ई-पिक पाहणी मधून गाव नमुना ११ (पिकांची आकडेवारी) आणि गाव नमुना १४ मधील शेतीचे� पाणीपुरवठ्याची माहिती स्वंयअदययावत होईल.�४. गाव नमुना तेरा, गाव नमुना अठरा, गाव नमुना वीस , गाव नमुना एकवीस हे चार नमुने रद्द करण्याचा � प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे. �५. गाव नमुना १६ हा विविध शासन परिपत्रक, आदेश यांच्या बाबत असून यामध्ये तलाठी यांना सर्व प्रकारची � परिपत्रके, शासन आदेश उपलब्ध होण्यासाठी सर्च इंजिन विकसित करून देण्यात येईल. � ६.ई-चावडी प्रकल्पामध्ये गाव नमुना ७ ब विकसित करणे आवश्यक आहे. सदर नमुना हा अर्धन्यायीक कामकाजाचा असून � त्याबाबत शासनाकडे नमुना विकसित करण्याच्या मागणीचा प्रस्ताव सादर करण्यात येत आहे. सद्यस्थितीत गाव नमुना ७ ब � हा उपलब्ध नोंदी करणेसाठी (OFFLINE कामकाज) ई-चावडी प्रणालीत दाखवण्यात आला आहे.
ई-चावडी आज्ञावली मध्ये लॉगिन करण्याकरीता खालील लिंक चा वापर करण्यात यावा.
HTTPS://ECHAWADI.MAHABHUMI.GOV.IN/#/USER/LOGIN
ई-फेरफार आज्ञावली मधील सेवार्थ ID आणि PW टाकून लॉगिन करा....
ई-चावडी लॉगीन केल्यावर भाषा बदला.
मराठी करीता येथे क्लिक करा.
मुख्यपृष्ठ वर १. महसूल मागणी निश्चिती २.व्यवहाराचा तपशील ३.गाव नमुना माहिती भरा ४.अहवाल चार आहे
१. थकबाकीचा तपशील��२. कजाप न झालेल्या बिनशेती जमिनी��३. वाढीव जमीन महसूल��४. खाता एकत्रीकरण��५. मागणी निश्चिती ��६. मागणी दुरुस्ती �
1.महसूल मागणी निश्चिती
मागील वर्षात थकीत राहिलेले थकबाकीचे खातेदार निहाय माहिती भरण्याकरीता हि सुविधा देण्यात आलेली आहे. ��१. सन २०२१-२२ अखेर थकीत असलेल्या खातेदार यांची माहिती भरण्यात यावी.��२. थकबाकीचा तपशील मध्ये जमीन महसूल,वाढीव सारा ,रो.हमी कर ,शिक्षण कर, एकाच वेळी भरावा.��3. एकदा थकबाकीची मागणी भरल्यानंतर पुढील मागणी AUTO GENERATE होईल. आणि पुढील वर्षाची � मागणी निश्चित होईल. � ����
१.थकबाकीचा तपशील
महसूल मागणी निश्चिती मधील > थकबाकीचा तपशील भरणे .
नवीन नोंदणी या बटणावर क्लिक करा.
नवीन नोंदणी या बटणावर क्लिक केल्यावर खाते क्रमांक शोधून थकबाकीचा तपशील भरा.
जतन या बटनावर क्लिक केल्यावर खालीलप्रमाणे खातेदारांची माहिती दिसेल.
कजाप न झालेल्या बिनशेती जमिनीची माहिती भरण्यासाठी साठी ई-चावडी आज्ञावली मध्ये हि नवीन सुविधा देण्यात आलेली आहे.��१.ज्या जमिनीचे कजाप झालेले नाही.आणि सात/बारा वर कृषक अशीच नोंद आहे. अश्या खातेदाराची माहिती � भरण्यात यावी. �२.एकाच सात/बारा मध्ये मिक्स खातेदार आहेत अश्या अकृषक खातेदार यांची मागणी निश्चिती करावे. �३.एखाद्या खातेदार यांचे कृषक क्षेत्रातील अंशात अकृषक वापरात बदल झाला असेल अश्या नोंदी येथे � घेता येईल.�४. कजाप न झालेल्या बिनशेती जमिनीची माहिती फक्त जमीन महसूल वसुली करीताच भारता येईल.�
२.कजाप न झालेल्या बिनशेती जमीनी
महसूल मागणी निश्चिती मधील > कजाप न झालेल्या बिनशेती जमिनी
कजाप न झालेल्या बिनशेती जमिनींच्या सारा निश्चितीसाठी नवीन नोंदणी बटनावर क्लिक करा.
खाते क्रमांक शोधून कजाप न झालेल्या बिनशेती जमिनीची माहिती भरा.
जतन या बटनावर क्लिक केल्यावर खालीलप्रमाणे खातेदारांची माहिती दिसेल.
वाढीव जमीन महसुलाची नोंद घेण्याकरीता सदर सुवीधाचा वापर करावा.��१. जर एखाद्या खातेदाराचे जमीनीचे क्षेत्र आठ हेक्टर पेक्षा जास्त परंतु बारा हेक्टर पेक्षा कमी � असेल तर अश्या खातेदाराला वाढीव जमीन महसूल आकारणी च्या ५०% दर्शवावे.� २.जर एखाद्या खातेदाराचे जमीनीचे क्षेत्र बारा हेक्टर पेक्षा जास्त असेल तर अश्या खातेदाराला � वाढीव जमीन महसूल आकारणी च्या १००% दर्शवावे.�३. वाढीव जमीन महसुलाची गणना महाराष्ट्र स्तरावरील खातेदार यांची करावी.�४. विद्यत मंडळ,ST महामंडळ,व इतर यांना वाढीव जमीन महसूल १००% गृहीत धरून लावावे.
३.वाढीव जमीन महसूल
महसूल मागणी निश्चिती मधील > वाढीव जमीन महसूल
वाढीव जमीन महसूल भरण्यासाठी नवीन नोंदणी या बटनावर क्लिक करा.
नवीन नोंदणी बटनावर क्लिक केल्यावर खाते क्रमांक टाकून शोधा करा.
वाढीव जमीन महसूल भरण्यास पात्र असलेल्या खातेदारास ५०% किवा १००% निवडा.
जतन या बटनावर क्लिक केल्यावर खालीलप्रमाणे खातेदार निहाय माहिती दिसेल.
वाढीव सारा लागू करण्यकरीता खातेदार निवडून जतन बटनावर क्लिक करून होय करा.
अहवाल > वाढीव जमीन महसूल
गावातील एकाच खातेदाराची अनेक खाते असल्यास ते गाव नमुना आठ–ब मध्ये � एकत्रितपणे दर्शविण्यासाठी खाते एकत्रीकरणाची सुविधा देण्यात आली आहे. ��१.खाते एकत्रीकरण करून एकत्रीकरणाचा नवीन विलीनीकरण खाते क्रमांक गाव नमुना आठ –ब मध्ये � दर्शविण्यात येईल. (उदा.M1-712,780)�२.खाते एकत्रीकरण सुविधा फक्त गाव नमुना आठ–ब मध्ये खाते एकत्रितपणे दर्शविण्यासाठी खाते � एकत्रीकरणाची सुविधा देण्यात आली त्याचा अमल ई-फेरफार मधील खात्यावर परिणाम होणार नाही. � (ODC अहवाल क्रं.२८,२८-अ,२८-ब खातेएकत्री करणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.)� ३. खाते एकत्रीकरणाची सुविधा फक्त चालू वर्षा करीता असेल पुढील वर्षा मध्ये ई-फेरफार � मध्ये खाते एकत्रीकरण झाल्यास सदर खाते वगळण्याची सुविधा देण्यात येईल.
४.खाता एकत्रीकरण
महसूल मागणी निश्चिती मधील > खाता एकत्रीकरण
खाता एकत्रीकरण करण्याकरिता गाव निवडून शोधा करा.
गाव निवडून शोधा केल्यावर गावातील एकूण खातेदार दिसतील.
खाता एकत्रीकरण करण्याकरिता खाते क्रमांक शोधा करून पहिले खाते निवडा.
तसेच खाते एकत्रीकरण करण्याकरिता खाते क्रमांक शोधा करून दुसरे खाते निवडून मर्ज करा.
खातेदाराचे खाते निश्चित करण्यासाठी मुख्य खात्याची निवड करा.
मुख्य खात्याची निवड झाल्यावर OK या बटनावर क्लिक करा.
एकत्रीकरण करण्याकरिता निवडलेल्या खात्याला नवीन विलीनीकरण खाते क्रमांक देण्यात येईल.
अहवाल > खाता एकत्रीकरण
सन २०२२-२३ या वर्षा करीता एकदाच मागणी निश्चिती करण्यासाठी मागणी निश्चितीची सुविधा � देण्यात आलेली आहे. ��१.चालू वर्षाची (सन २०२२-२३ ) खातेदार निहाय मागणी निश्चिती करावी.एकाच वेळी १०० खातेदार � निवडण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. �२..खाते एकत्रीकरण,कजप न झालेले बिनशेती जमीन,वाढीव जमीन महसूल या सर्व सुविधांचा वापर � केल्यावर अखेर खातेदारांची मागणी निश्चिती करावी.�३.सुटीच्या खातेदारासह संपूर्ण गावाची मागणी निश्चित करावी.�४.मागणी निश्चिती केल्यावर खरेदार निहाय मागणी आठ-ब ,आठ-क मध्ये दर्शविण्यात येईल
५.मागणी निश्चिती
महसूल मागणी निश्चिती मधील > मागणी निश्चिती
मागणी निश्चिती करण्याकरीता गाव निवडून मागणीची गणना करा.
मागणीची गणना या बटनावर क्लिक केल्यावर खातेदार निवडा.
मागणी निश्चिती करीता खातेदार निवडल्यावर मागणी निश्चिती बटनावर क्लिक करून होय करा.
अहवाल > मागणी निश्चिती
एखाद्या खातेदाराची मागणी चुकीच्या पद्धतीने दर्शविण्यात आलेली असल्यास मागणी दुरुस्ती सुविधा देण्यात आलेली आहे. ��१. मागणी दुरुस्ती सुविधा मध्ये ज.म. , जि.प.,ग्रा.प.,वाढीव सारा,रो.हमी कर ,शिक्षण कर दुरुस्त करता येईल.��२. सदर दुरुस्ती मागणी निश्चित करण्याच्या पूर्वी करण्यात यावी.��३. व्यवहाराचा तपशील मधील देय रक्कम या टॅबचा वापर करण्यापूर्वीच मागणी दुरुस्ती करता येईल.��४. मागणी निश्चिती करतांना मागणी दुरुस्ती करीता निवडण्यात आलेले खातेदारांचीच मागणी दुरुस्त करता येईल.�� टीप - मागणी दुरुस्ती मागणी तपशील किवा पावती तयार करण्या पूर्वीच करता येईल.� ����
६.मागणी दुरुस्ती
महसूल मागणी निश्चिती मधील > मागणी दुरुस्ती
मागणी निश्चिती या टॅब मध्ये ज्या खातेदाराची मागणी दुरुस्त करावयाची आहे ते खाते क्रमांक निवडा.
खाते क्रमांक निवडून निवडा व मागणी दुरुती बटनावर क्लिक करून होय करा.
आपण निवडलेले खाते क्रमांक मागणी दुरुस्तीसाठी उपलब्ध होईल.
खाते क्रमांकावरील सुधारणा या बटनावर क्लिक केल्यावर मागणी दुरुस्ती करून जतन करा.
अहवाल > महसूल मागणी दुरस्ती
१. मागणी तपशील ��२. मागणी नोटीस ��३. पावती तयार करा.��४. पावती प्रत��५. चलन तयार करा��६. चलन तपशील
3.व्यवहाराचा तपशील
जमीन महसूलाची मागणी करण्याकरीता खातेदाराला मागणीचा तपशील देण्याकरीता सदर � सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.��१. मागणी निश्चिती झाल्यावर मागणी नोटीस काढता येईल. �२. खातेदाराला जमीन महसूलाची मागणी करण्याकरीता मागणीचा तपशील देता येईल.�३. मागणीचा तपशीलची प्रिंट वर कोणताही खर्च आकारण्यात येत नाही. �
१.मागणीचा तपशील
व्यवहाराचा तपशील > मागणीचा तपशील
मागणी तपशील पाहण्यासाठी गाव निवडून खाते क्रमांक शोधा.
गाव निवडून खाते क्रमांक शोधा केल्यावर मागणी तपशील दिसेल .
प्रत काढा या बटनावर क्लिक केल्यावर मागणी तपशील प्रिंट काढण्या करीता उपलब्ध होईल.
महाराष्ट्र जमीन महसुलाच्या वसुलीबाबत नियम, १९६७ नियम ५ आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १७८ नुसार नमुना-एक ची नोटीस कसूरदारास काढण्याकरीता सदर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ��१. मागणी निश्चिती झाल्यावर मागणी नोटीस काढता येईल.��२. जानेवारी च्या १५ तारखेपर्यंत कोणताही दंड आकरण्यात येणार नाही.��३.मागणी नोटीस दाखल आकारणीयोग्य असलेली फी म्हणून रुपये 2 एवढी रक्कम खातेदाराच्या मागणीत वाढ होईल.������
२.मागणी नोटीस
व्यवहाराचा तपशील > मागणी नोटीस
मागणी नोटीस तयार करण्याकरिता गाव निवडून खाते क्रमांक शोधा.
गाव निवडून खाते क्रमांक शोधा केल्यावर मागणी नोटीस चा तपशील दिसेल.
प्रत काढा या बटनावर क्लिक केल्यावर मागणी नोटीस प्रिंट काढण्या करीता उपलब्ध होईल.
जमीन महसुलाची देय रक्कम (रोख ,धनादेश ,डिमांड ड्राफ्ट) खातेदाराकडून प्राप्त झाल्यावर जमीन महसुलाची � पावती देण्याकरीता देय रक्कम ही सुविधा देण्यात आलेली आहे.��१. मागणी निश्चिती झाल्यावर देय रक्कम सुविधा मध्ये खाते उपलब्ध होईल. �२. जमीन महसुलाची देय रक्कम रोख ,धनादेश ,डिमांड ड्राफ्ट स्वरुपात स्वीकारता येईल.�३. धनादेश किंवा डिमांड ड्राफ्ट प्राप्त झाल्यास बँकेचा तपशील भरावे.�४. मागणी निश्चिती केल्यावर चालू किंवा १ ऑगस्ट २२ - नंतर नव्याने निर्माण झालेला संकीर्ण महसूल � करीता खाता क्रमांक किंवा मक्ताखाता क्रमांक निवडून करता येईल. �
३.पावती तयार करा
गाव निवडून खाते क्रमांक टाका व १ ऑगस्ट २२ - मागणीची पावती वर क्लिक करून शोधा करा.
शोधा केल्यावर खातेदाराची माहिती उपलब्ध होईल देय पद्धत निवडून जतन करा.
देय पद्धत निवडून जतन केल्यावर जमीन महसुल पावतीचा तपशील दिसेल.
प्रत काढा या बटनावर क्लिक केल्यावर ज. महसुलाची पावती प्रिंट काढण्या करीता उपलब्ध होईल.
गाव ,महसूल वर्ष,खाता क्रमांक टाकून संकीर्ण महसूल किंवा मागणीची पावती क्लिक करून शोधा.
संकीर्ण महसूल किंवा मागणीची पावती वर क्लिक करून माहिती भरा आणि जतन करा.
जतन केल्यावर जमीन महसूलाची पावती चा तपशील उपलब्ध होईल.
प्रत काढा वर क्लिक केल्यास पावती प्रिंट करीता उपलब्ध होईल.
जमीन महसुलाची देय रक्कम (रोख ,धनादेश ,डिमांड ड्राफ्ट ) खातेदाराकडून प्राप्त झाल्यावर जमीन महसुलाची पावती देण्याकरीता पावतीची प्रत ही सुविधा देण्यात आलेली आहे.��१. पावतीची प्रत कितीही वेळा प्रिंट काढता येईल.�����������
४.पावतीची प्रत
गावाची व महसूल वर्षाची निवडा करून खाता क्र. किवा मक्ता क्र. निवडून शोधा करा.
शोधा केल्यावर खातेदाराची माहिती उपलब्ध होईल .
प्रत काढा या बटनावर क्लिक केल्यावर ज. महसुलाची पावती प्रिंट काढण्या करीता उपलब्ध होईल
जमीन महसुलाची वसुली केल्यावर एकत्रित किंवा खातेदार निहाय चलन तयार करण्याकरिता सदर सुविधा देण्यात आलेली आहे.��१. एक किंवा अनेक खातेदार निहीय वसुली झालेल्या पावत्याची चलन तयार करता येईल.�२. पाच हजार रुपय पर्यंत किंवा १५ दिवसाच्या आत चलन तयार करणे आवश्यक आहे.�३. रोख ,धनादेश ,डिमांड ड्राफ्ट च्या चलन स्वतंत्र तयार करावे.�टिप :- चलन हस्तलिखित चलन तयार करा निवडून चलन तयार��
५.चलन तयार करणे
व्यवहाराचा तपशील > चलन तयार करा
गावाची व महसूल वर्षाची निवडा करा. देय पद्धत निवडून शोधा करा.
देय पद्धत निवडून शोधा केल्यावर खातेदार निहाय पावत्यांचा तपशील उपलब्ध होईल.
खातेदार निहाय पावत्यां निवडून चलन तयार करा बटनावर क्लिक करून होय करा.
चलन तयार करा बटनावर क्लिक केल्यावर चलन चा तपशील उपलब्ध होईल.
प्रत काढा या बटनावर क्लिक केल्यावर चलन प्रिंट काढण्या करीता उपलब्ध होईल
चलन तयार केल्यानंतर पैसे जमा केलेले आणि पैसे जमा न केलेल्या चलन चा तपशील पाहण्या करीता व चलन चा बँकेत भरणा केल्यावर बँकेचा तपशील भरण्याकरिता सदरची सुविधा देण्यात आलेली आहे.�������
६.चलन तपशील
व्यवहाराचा तपशील > चलन तपशील
चलनची सद्य स्थिती करीता पैसे जमा केले किंवा पैसे जमा नाही केले असे दोन पर्याय उपलब्ध आहे.
सद्य स्थिती या बटनावर क्लिक केल्यावर चलनचा तपशील उपलब्ध होईल.
चलन उपलोड करा या बटनावर क्लिक केल्यावर बँकेचा तपशील भरण्यास उपलब्ध होईल.
बँकेचा तपशील भरल्यावर जतन करा या बटनावर क्लिक करा.
जतन केल्यावर चलन पाहण्या करीता उपलब्ध होईल.
चलन पहा केल्यावर बँकेत किंवा ONLINE भरणा केलेल्या चलन पाहण्याकरीता उपलब्ध होईल.
�धन्यवाद...
जमाबंदी आयुक्त कार्यालय,पुणे