1 of 11

� �समग्र शिक्षा अंतर्गत

शाळा सर्वांची – जबाबदारी प्रत्येकाची

शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण

2 of 11

शिक्षण हक्क कायदा, ग्रामपंचायत आणि शाळा व्यवस्थापन समिती

    • गावातील सर्व (६ ते १४ वयोगट) बालके शाळेत दाखल
    • शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती
    • शाळेच्या भौतिक सोयी
    • गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी उपाय योजना
    • शिक्षकांना सहकार्य
    • शाळेच्या शैक्षणिक प्रक्रियांचे नियोजन (समिती सभा, बालसभा, शैक्षणिक ग्रामसभा)
    • शाळेच्या दैनंदिन कामकाजावर लक्ष ठेवणे / सहभागी होणे
    • शाळा विकास आराखडा तयार करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे
    • शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी पालकांचा सहभाग निश्चित करणे

ग्रामपंचायत (RtE Section – 9)

शाळा व्यवस्थापन समिती (RtE Section – 21)

3 of 11

    • मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण हा प्रत्येक मुलाचा अधिकार आहे.
    • मूल हे शाळेसोबतच आपल्या शाळेबाहेरील अनुभवातूनही शिकत असते. यासाठी शिक्षकांबरोबरच पालक व समाज यांचीही भूमिका महत्त्वपूर्ण ठरते.
    • शाळा व्यवस्थापन समिती हि या घटकांची प्रतिनिधी आहे.
    • मुलांच्या शिकण्यासाठी अनुकूल व प्रेरक वातावरण निर्माण व्हावे, यासाठी शिक्षक व समाज या दोन्ही घटकांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे.  

शाळा व्यवस्थापन समिती महत्त्वाची का?

4 of 11

शाळा व्यवस्थापन समिती स्थापना

प्रत्येक शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व अनुदानित शाळेत शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करणे शिक्षण हक्क कायद्यानुसार बंधनकारक

पुनर्गठन

पहिले वर्ष 

दुसरे वर्ष

नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाल्याच्या दिनांकापासून तीन महिन्याच्या आत, शाळेमध्ये एक शाळा व्यवस्थापन समिती करण्यात येईल व ती प्रत्येक दोन वर्षांनी पुनर्गठीत करण्यात येईल

5 of 11

- ७५% सदस्य पालक

    • २५% इतर सदस्य
      • मुख्याध्यापक
      • शिक्षण तज्ञ/शिक्षण प्रेमी
      • ग्रामपंचायत सदस्य
      • शिक्षक सदस्य

शाळा व्यवस्थापन समिती रचना

५०% सदस्य महिला

एकूण सदस्य १२ ते १६

२ विद्यार्थी प्रतिनिधी (पैकी किमान एक मुलगी असावी )

6 of 11

शाळा व्यवस्थापन समिती रचना

    • ७५% सदस्य बालकांचे माता, पिता किंवा पालक
    • २५% सदस्य स्थानिक प्राधिकरण सदस्य, मुख्याध्यापक किंवा वरिष्ठ शिक्षक, शिक्षणतज्ञ किंवा बालविकास तज्ञ
    • एकूण सदस्यांच्या किमान ५०% सदस्य महिला
    • २ विद्यार्थी प्रतिनिधी पैकी किमान १ मुलगी (स्वीकृत सदस्य- मतदानाचा अधिकार नाही)
    • समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष पद पालकांतून निवडले जावे व दोन्ही पैकी किमान एक महिला असावी.
    • शाळेचे मुख्याध्यापक हे समितीचे पदसिद्ध सचिव असतील

 

7 of 11

शाळा व्यवस्थापन समिती स्थापना प्रक्रिया

    • मुख्याध्यापकानी निवड प्रक्रिया कार्यक्रमाची माहिती सर्व पालक, आणि ग्रामपंचायतीचे सरपंच / ग्रामसेवक यांच्यापर्यंत पोहचवणे आणि निवडीचा कार्यक्रम जाहीर करणे. किमान सात दिवस आधी सर्व पालकांना सूचित करणे आवश्यक आहे.
    • शाळा व्यवस्थापन समिती स्थापना /पुनर्स्थापना करण्यासाठी मुख्याध्यापकांद्वारा (पदसिद्ध सचिव) पालकसभा आयोजित करावी.
    • पालकसभेसाठी किमान ७०% पालकांची उपस्थिती आवश्यक.
    • महिलांच्या सहभागासाठी विशेष प्रयत्न केले जावेत.
    • ग्रामपंचायत मधून जे एक सदस्य निवडायचे आहेत, त्यांची मागणी मुख्याध्यापाकानी पत्राद्वारे ग्रामसेवक यांच्याकडे करावी
    • शिक्षणाविषयी आवड असलेल्या तसेच शाळेसाठी वेळ देवू शकणाऱ्या उत्साही व कृतीशील पालकांना संधी द्यावी
    • शिक्षक प्रतिनिधी, विद्यार्थी प्रतिनिधी (मुलगा आणि मुलगी- प्रत्येकी एक) यांची निवड मुख्याध्यापकानी करावी.
    • समितीची रचना, जबाबदारी व कार्य पद्धती यांची माहिती सर्वाना देण्यात यावी.
    • समितीचे गठन राजकीय, सामाजिक दबावाखाली न करता खेळीमेळीच्या वातावरणात लोकशाही पद्धतीने करण्यात यावे.
    • समिती सद्स्यांतून अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करण्यात यावी. यापैकी एक महिला असावी.
    • शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांची नावे शाळेत फलकावर दर्शनी भागात नोंदवलेली जावीत

8 of 11

शाळा व्यवस्थापन समितीची कार्ये

शाळा व्यवस्थापन समिती

शालेय गुणवत्ता

परिसर स्वच्छता

पोषण आहार

शाळा विकास

पट नोंदणी

उपस्थिती

9 of 11

�����������

शाळा व्यवस्थापन समितीची कार्ये

  • शाळा विकास आराखडा तयार करून तो अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या स्वाक्षरीने मुख्याध्यापकांमार्फत स्थानिक स्वराज्य संस्थेस सादर करणे.
  • स्थानिक सरकारच्या स्त्रोतांच्या मार्फत अनुदान मिळविणे आणि त्याची अंमलबजावणी करणे.
  • शालेय कामकाजावर लक्ष ठेवणे
  • पटनोंदणीसाठी गावात मुलांचे सर्वेक्षण करणे, शाळाबाह्य, विशेष गरजा असलेली बालके, मुली, व दुर्बल घटकांतील मुले यांचा शोध घेवून त्यांना शाळेत दाखल करून घेणे.
  • शिक्षकांवर अशैक्षणिक कामाचा जास्त भार येऊ न देणे याचे निरीक्षण करणे , RTE  अधिनियम section 27 के अनुसार शाळेशी निगडीत विविध शासकीय योजनांची सुयोग्य अंमलबजावणी करणे.
  • विकलांग मुलांना शाळेत दाखल करून घेणे. आणी शाळेत त्या साठी लागणाऱ्या सेवा सुविधा आहे किवा नाही याची खात्री करणे.
  • शालेय पोषण आहाराची नियमितता आणि दर्जा राखणे.
  • बालकांचे हक्क व ग्रामपंचायत, शाळा, माता वा पिता आणि पालक यांची कर्तव्ये याविषयी माहिती जनतेस कळविणे.
  • शिक्षकांच्या सतत संपर्कात राहून शाळेतील मुलांच्या गुणवत्तेचा आढावा घेणे.
  • शिक्षकांच्या सहकार्याने नियमित पालक सभांचे आयोजन करणे व मुलांच्या गुणवत्तेबाबत पालकांशी संवाद साधने.
  • पालक, ग्रामपंचायत व ग्रामस्थांचा शाळा सुधार व शैक्षणिक गुणवत्ता वाढ उपक्रमात सक्रीय सहभाग मिळवणे

10 of 11

शाळा व्यवस्थापन समितीतील सदस्यनिहाय भूमिका

  • मुख्याध्यापक
    • शिक्षण हक्क कायदा कलम २३ नुसार पदासिद्ध सचिव
    • समिती गठन आणि बैठकांचे आयोजन
    • इतिवृत्त लेखन
    • तालुका स्तरीय शिक्षण यंत्रणेशी समन्वय
    • वर्गाचे प्रतिनिधीत्व
  • समिती अध्यक्ष
    • शिक्षक व पालक यांच्यातील समन्वय साधण्यासाठी प्रथम संपर्क
    • शाळेच्या सूक्ष्म नियोजनात व निर्णय प्रक्रियेत सर्व सदस्यांना एकत्र आणणे
    • मासिक बैठका नियमित होण्यासाठी पुढाकार
    • शिक्षक –पालक – विद्यार्थी शैक्षणिक आढावा व नियोजन बैठकीसाठी पुढाकार
  • स्थानिक प्राधिकरणाचे प्रतिनिधी
    • गावातील तसेच समितीतील लोकनियुक्त व्यक्तिमत्व
    • शाळा आणि स्थानिक प्राधिकरण यांच्यातील समन्वयात सक्रीय सहभाग
    • पालकांचा आणि ग्रामस्थांचा शाळेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्यासाठी प्रयत्न
    • ग्रामस्तरावरील शैक्षणिक शासकीय योजनांचा पाठपुरावा करणे

  • पालक सदस्य
    • प्रत्येक पालकाचा शालेय नियोजनात सहभाग निश्चित करणे
    • वर्गाचे पालकत्व स्वीकारून त्याप्रमाणे कार्य करणे
    • मासिक बैठकीस नियमित उपस्थित राहून सक्रीय सहभाग
  • शिक्षण प्रेमी
    • शिक्षणाबाबत जागरूक, उत्साही गावातील व्यक्ती
    • शैक्षणिक उपक्रम आखणी, पालक संवाद यांच्या आयोजनात पुढाकार
    • विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी उपक्रमांच्या आयोजनात सक्रीय सहभाग
  • विद्यार्थी प्रतिनिधी
    • मतदानाचा अधिकार नसला तरी समितीचा महत्वाचा घटक
    • शाळेतील मुलांसाठीच्या नेमक्या गरजा शिक्षक व पालक यांच्या निदर्शनास आणून देणे
    • बैठकीत स्वत:चे मत मांडण्याचा अधिकार
    • बालासाभा घेण्यासाठी पुढाकार

11 of 11

शाळा व्यवस्थापन समितीबाबत काही प्रश्न