1 of 8

भारतातील पंचायतराजची उत्क्रांती

डॉ. श्रीकांत मगर

सहाय्यक प्राध्यापक, लोकप्रशासन विभाग,

श्रीमती एस.के.गांधी महाविद्यालय, कडा

2 of 8

भारतातील पंचायतराजची उत्क्रांती

  • प्रस्तावना:
  • जेव्हा मानवी उदय झाला तेव्हापासून पंचायतराज व्यवस्थेचा उदय झाला.
  • शाब्दिक दृष्टिकोनातून पंचायतराज हा शब्द मराठी भाषेतील' पंचायत 'आणि' राज ' या दोन शब्दांनी बनलेला आहे.
  • याचा अर्थ पाच जन प्रतिनिधींचे समूह
  • पंचायत' शब्द संस्कृत भाषेतील ग्रंथानुसारएखादया अध्यात्मिक पुरुषासहित पाच पुरुषांच्या समूहाला अथवा वर्गाला ‘ पंचायतन' या नावाने संबोधित करण्यात येते.
  • उल्लेख कौटिल्याचे ‘अर्थशास्त्र' अबूल फजलच्या ‘ऐन-ए-अकबरी’ अशा विविध ग्रंथांत करण्यात आलेला आहे

3 of 8

भारतातील पंचायतराज व्यवस्थेचा विकास

  • प्राचीन स्वयंशासित खेड्यापासून आधुनिक काळातील लोकशाही विकेंद्रीकरणाच्या तत्त्वाला अनुसरून निर्माण केलेल्या पंचायत राजसारख्या आदर्शवत प्रारूपाचा विकासक्रम अत्यंत रचनात्मक स्वरूपाचा राहिला आहे.
  • प्राचीन काळातील वैभव संपन्न स्थानिक स्वशासन मध्यकाळातील सत्तासंघर्षाने काहीसे अस्थिर झाले आणि ब्रिटिशांच्या काळात ते पूर्णतः मोडकळीस आले होते
  • आधुनिक स्वशासनाचे पुनरुज्जीवनही याच कालखंडात इ. स. १८८२ च्या लॉर्ड रिपनच्या स्थानिक स्वशासनाच्या ठरावाच्या रूपाने झाले.
  • स्वातंत्र्येतर कालखंडात १९९२च्या ७३ व्या घटनादुरुस्तीमुळे देशभर खऱ्या अर्थाने पंचायत ‘राज अस्तित्वात आले.

4 of 8

भारतातील पंचायतराजची उत्क्रांतीचे टप्पे

  • प्रारूप सामान्यपणे तीन टप्प्यांतून जाणून घेता येईल.
  • प्राचीन कालखंड

अ) रामायण तसेच महाभारत:

  • रामायण काळात ग्रामप्रमुखांना 'ग्रामिणी' अथवा 'महत्तर' या नावाने ओळखले जात.
  • बौद्ध जातक कथांमध्ये बौद्ध काळातील सुस्थापित पंचायत तंत्राचा उल्लेख आढळतो या काळात गावाच्या प्रमुखास 'ग्रामसभोजक' नावाने ओळखले जात असे.

ब) मौर्य काळ:

  • मौर्यकाळात 'ग्राम' शासनाचा सर्वात खालचा स्तर होता. प्रशासनाच्या रूपात ' जनपदा' चे अस्तित्व होते.
  • अनेक गावांना मिळून 'जनपद' निर्माण केले जात असे.
  • मौर्यकाळात ग्रामप्रशासनाच्या देखोरेखीसाठी ग्रामिक तसेच ग्रामिक संघ आणि ग्रामीक सभा या अस्तित्वात होत्या.

5 of 8

  • मौर्यकाळात 'उपवास' हे ग्रामसभेचे सदस्य असत
  • प्रत्येक गावाचा प्रमुख ‘ग्रामिक' असे.
  • पाच किंवा दहा गावांचा शासक ‘गोप' वा प्रमुख स्थानिक नावाचा पदाधिकारी असे.
  • स्थानिकचा प्रमुख पूर्ण ‘जनपदा' चा प्रभारी अधिकारी 'समाहार्ता' म्हणून ओळखला जात असे.

क) गुप्त कालखंड:

  • गुप्तकाळात कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी ग्रामपंचायतीची असे गावाची सुरक्षा करणाऱ्या अधिकाऱ्याला 'ग्रामरक्षक किंवा प्रतिहार' म्हटले जात असे.

6 of 8

प्राचीन ग्रामपंचायतीची भूमिका

  1. महसूल वसुली
  2. पडिक जमिनीसंबंधीचे अधिकार
  3. संघर्षाची सोडवणूक
  4. मंदिर प्रशासन
  5. आर्थिक कार्ये
  6. नैसर्गिक आपत्ती
  7. सार्वजनिक उपयुक्ततेची कार्ये

7 of 8

२) मध्ययुगीन कालखंड

  • शेरशाह सुरीच्या काळात स्थानिक शासनाचा सर्वात लहान स्तर 'गाव' चा प्रमुख मुखिया किंवा मुकादम असे.
  • मोगल प्रांत अनेक सरकार व जिल्ह्यामध्ये विभाजलेला होता.
  • सर्वात लहान शाखा ‘ परगना ' होती. गावाची सफाई, शिक्षा, सिंचन, वादावर निर्णय इ. कार्ये परगणा करीत असे.
  • 'पटवारी' महसूल वसूल करीत असे. तसेच ‘चौधरी' वादावर निर्णय देत असे.
  • मोगल काळात सामान्यातः जिल्हा क्षेत्रात काजी, मुफ्ती व मीर आदिल नावाचे न्यायिक अधिकाऱ्यांची कार्य करीत असत.

8 of 8

  • अकबराच्या काळात ग्रामपंचायतीतील वैधानिक रूपात न्याय देणारी संस्था म्हणून स्वीकृती होती
  • लोकांच्या नैतिक व धार्मिक प्रगती प्रबंध व न्याय व्यवस्थेसंबंधी कार्ये पंचायतींनाच करांवी लागत असत.
  • मोगलकालीन कालखंड पंचायत राज दृष्टीने अंत्यत ‘अंधःकारमय कालखंड ' म्हणून ओळखला जातो.