1 of 25

मानसशास्त्रातील संशोधन/अभ्यास पद्धतींद्वारे वर्तन समजून घेणे

श्रद्धा रारावीकर

2 of 25

मानसशास्त्रातील संशोधन/अभ्यास पद्धती

  • वस्तुनिष्ठ आत्मनिरीक्षण
  • निरीक्षण
  • सर्वेक्षण
  • स्ववृत्त
  • प्रायोगिक संशोधन पद्धती
  • सह्संबंधात्मक संशोधन

3 of 25

१.वस्तुनिष्ठ आत्मनिरीक्षण

  • विल्यम वुंड यांनी मनाच्या घटकांचा व अनुभवांचा अभ्यास करण्यासाठी वस्तुनिष्ठ आत्मनिरीक्षण हि पद्धत शोधून काढली

4 of 25

��वस्तुनिष्ठ आत्मनिरीक्षण (continued)

  • स्वतःच्या अनुभवांचे अतिशय काळजीपूर्वक व पद्धतशीरपणे निरीक्षण करणे म्हणजे वस्तुनिष्ठ आत्मनिरीक्षण होय.

5 of 25

�वस्तुनिष्ठ आत्मनिरीक्षण (continued)

  • हि पद्धत वापरण्यापूर्वी विशेष प्रशिक्षण दिले जाते व स्वतःच्या अनुभवांचे व भावनांचे वर्णन करण्यास सांगितले जाते.

6 of 25

वस्तुनिष्ठ आत्मनिरीक्षण (continued)

  • दिवसचेदिवस मेट्रोनोम ह्या उपकरणातील आवाज ऐकून त्याविषयी वर्णन करणे अपेक्षित असते. कोणती लय सुखद वाटते, गतीमान ठोक्यांनी उद्दीपन वाढते का किंवा संथ लयीने शांत वाटते का हे बघितले जाते व त्याची अगदी काळजीपूर्वक नोंद घेतली जाते. ह्या दरम्यान प्रयुक्ताचे हृदयाचे ठोके व श्वासाची गती याचीही नोंद घेतली जाते. ह्याच प्रमाणे रंगीत दिवे, वेगवेगळे वास, स्पर्श याबाबतीतही निरीक्षण केले जाते.

7 of 25

वस्तुनिष्ठ आत्मनिरीक्षण (continued)

  • हि पद्धत कितीही अकुशल व भरकटलेली, दिशाहीन वाटत असली तरीही विल्यम वुंडने शास्त्रीय मापन पद्धतींचा मानसशास्त्रात प्रथम समावेश केला व पहिली प्रयोगशाळा उभारली या कार्यासाठी त्याला ‘मानसशास्त्राचा जनक’ असे म्हंटले जाते

8 of 25

२.निरीक्षण

  • एखादे वर्तन किंवा घटना घडत असताना त्याचे केलेले निरीक्षण, नोंद व वर्णन करण्यासाठी ही पद्धत मानसशास्त्रीय अभ्यासात वापरली जाते.

9 of 25

निरीक्षण (continued)

निरीक्षणाचे प्रकार:

  1. नैसर्गिक निरीक्षण
  2. पद्धतशीर निरीक्षण

हे निरीक्षण दोन प्रकारे केले जाते :

  1. सह्भागयुक्त निरीक्षण
  2. असह्भागयुक्त निरीक्षण

10 of 25

���नैसर्गिक निरीक्षण �

  • प्राणी व लहान मुले यांचा अभ्यास करण्यासाठी हि पद्धत वापरली जाते. असे निरीक्षण करताना नैसर्गिक परिस्थिती व वर्तन यामध्ये जाणूनबुजून कोणताही बदल केला जात नाही.
  • निरीक्षण करताना कोणत्या वर्तनाचे निरीक्षण करायचे हे निश्चित नसते

11 of 25

पद्धतशीर निरीक्षण

  • कोणाच्या, कोणत्या वर्तनाचा कधी अभ्यास करायचा आहे हे आधीच निश्चित करून, नियोजनपूर्वक निरीक्षण केले जाते व त्याची अगदी काळजीपूर्वक नोंद केली जाते.

12 of 25

����सह्भागयुक्त निरीक्षण �

  • ज्या समूहाचे निरीक्षण करायचे आहे त्या समूहामध्ये निरीक्षणकर्ता (संशोधक) त्यांच्यातीलच एक सदस्य म्हणून सामील होतो. त्यामुळे संशोधकाला सर्वांचे अगदी जवळून निरीक्षण करता येते. समूहातील इतर सदस्यही त्याला आपल्यातील एकजण समाजात असल्याने त्यांचे वर्तन हि नैसर्गिक असते.

13 of 25

असह्भागयुक्त निरीक्षण

  • यामध्ये निरीक्षक समूहाच्या बाहेर राहून सदस्यांच्या वर्तनाचे निरीक्षण करतो. पण सदस्यांच्या नकळत त्यांचे निरीक्षण करणे अवघड जाते. निरीक्षणातून काही बारकावे निसटू शकतात. सदस्यांना जर लक्षात आले कि त्यांचे निरीक्षण केले जात आहेत तर त्यांच्या वर्तनात कृत्रिमता येते.

14 of 25

  • सह्भागयुक्त निरीक्षण

  • असहभागयुक्त निरीक्षण

15 of 25

३.सर्वेक्षण

  • जेव्हा मोठ्या समूहाची मते किंवा वर्तन जाणून घ्यायचे असते तेव्हा हि संशोधन पद्धत वापरली जाते.
  • ज्या मोठ्या समूहाचा अभ्यास करायचा आहे त्याच्या गुणांचे प्रतिनिधित्व करणारा एक लहान समूह निवडला जातो.

अशा लहान समूहाला प्रातिनिधिक नमुना’ असे म्हणतात. असा ‘प्रातिनिधिक नमुना’ निवडून त्यांना प्रश्न विचारले जातात व त्यांच्या उत्तरावरून संपूर्ण समूहाबद्दल अंदाज बांधला जातो.

16 of 25

सर्वेक्षण यशस्वी होण्यासाठी दोन अटी

१. प्रातिनिधिक नमुनानिवड

२.प्रश्नांची योग्य शब्दरचना व क्रम

17 of 25

सर्वेक्षणाचे प्रकार

  • प्रत्यक्ष मुलाखत
  • इंटरनेट सर्वेक्षण
  • टपाल सर्वेक्षण
  • टेलिफोन सर्वेक्षण

18 of 25

४. स्ववृत्त/ वृत्ताभ्यास

  • व्यक्तीविषयी जास्तीतजास्त सखोल माहिती मिळवण्यासाठी व त्यावरून तिच्या वर्तनाचे व व्यक्तिमत्वाचे वर्णन करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. विविध मार्गांनी मिळालेली माहिती संकलित करून तिच्या पूर्वायुष्याबद्दल जाणून घेता येते व त्याआधारे वर्तमानातील वर्तनाची करणे जाणून घेता येतात. त्यावरून भविष्यातील वर्तनाचा ही अंदाज बांधता येतो.
  • ह्या माहितीचा उपयोग मनोविकृतींच्या निदानासाठी व योग्य उपचार पद्ध्तीची निवड करण्यासाठी होतो
  • यशस्वी व उच्चस्थानी पोहोचलेल्या व्यक्तीच्या जीवन वृत्तांताचा अभ्यास केल्यास प्रेरणाही मिळते.

19 of 25

स्ववृत्तासाठी माहिती गोळा करणे

-

मुलाखत

मित्र व नातेवाईकांच्या मुलाखती

निरीक्षण

लिखित साहित्य (नोंदवही )

अनुवांशिकता

शारीरिक आरोग्य

पूर्वायुष्याची माहिती

मानसशास्त्रीय चाचणी

20 of 25

५.प्रायोगिक पद्धती

  • “नियंत्रित परिस्थितीत वर्तनाचे केलेले निरीक्षण म्हणजे प्रयोग होय.”
  • प्रयोगात अभ्यासायच्या समस्येच्या दृष्टीने आवश्यक प्रसंग मुद्दाम निर्माण केले जातात.
  • प्रायोगिक पद्धतीतील महत्वाच्या संकल्पना:
  • अभ्युपगम
  • प्रयुक्त
  • परिवर्त्य- स्वतंत्र, अवलंबी, व नियंत्रित
  • गट- प्रायोगिक व नियंत्रित

21 of 25

प्रायोगिक पद्धतीतील महत्वाच्या संकल्पना�

  1. अभ्युपगम- प्रयोगातील समस्येचे तात्पुरते उत्तर म्हणजे अभ्युपगम. हे उत्तर खरे आहे कि खोटे हे प्रयोगाद्वारे तपासले जाते.
  2. प्रयुक्त- प्रयोगामध्ये ज्या व्यक्तींचे निरीक्षण केले जाते त्यांना प्रयुक्त असे म्हणतात.
  3. परिवर्त्य- मानवी वर्तनावर परिणाम घडवू शकणाऱ्या भोवतालच्या परिस्थितीतील सर्व घटकांना परिवर्त्य असे म्हणतात.
  4. परिवर्त्यांचे प्रकार:
  5. स्वतंत्र परिवर्त्य- प्रयोगामध्ये ज्या घटकात बदल घडवुन आणला जातो व त्या बदलाचा परिणाम तपासाला जातो असा घटक
  6. अवलंबी परिवर्त्य- स्वतंत्र परिवर्त्यातील बदलामुळे निर्माण झालेली प्रतिक्रिया म्हणजे अवलंबी परिवर्त्य. ह्या परिवर्त्याचे मापन केले जाते.
  7. नियंत्रित परिवर्त्य- स्वतंत्र परिवर्त्याव्यतिरिक्त वातावरणातील इतर घटकही अवलंबी परिवर्त्यावर परिणाम करू शकतात. त्यांचा अभ्यास प्रयोगात करायचा नसल्याने त्यांच्यावर नियंत्रण ठेवले जाते.

22 of 25

  • स्वतंत्र परिवर्त्याचा अवलंबी परिवर्त्यावर होणारा परिणाम तपासण्यासाठी दोन गटांची आवश्यकता असते
  • प्रायोगिक गट- प्रयोगात ज्या प्रयुक्तांच्या गटाला स्वतंत्र परिवर्त्य दिले जाते तो गट
  • नियंत्रित गट- ह्या गटातील प्रयुक्तांना त्यांचे नैसर्गिक वर्तन करू दिले जाते

  • प्रयोग यशस्वी होण्यासाठी दोन महत्वाच्या अटी:
  • प्रयुक्तांची अनियतिकृत विभागणी
  • अवांतर परिवर्त्यांवर नियंत्रण

23 of 25

६. सह्संबंधात्मक संशोधन

  • दोन किंवा अधिक परिवार्त्यांमधील संबंधांचे प्रमाण म्हणजे सहसंबंध होय. जेव्हा एका परिवर्त्यात बदल घडून येतो तेव्हा दुसऱ्या परिवर्त्यामध्ये सुद्धा बदल घडण्याची शक्यता असते. असा बदल घडत असल्यास त्यांच्यात सहसंबंध आहे असे मानतात.
  • सह्संबंधात्मक पद्धतीमध्ये मानसशास्त्रज्ञ दोन परिवर्त्यामध्ये संबंध आहे का?, असल्यास तो कशा प्रकारचा आहे व किती प्रमाणात आहे हे तपासतात.
  • सर्वप्रथम अगदी काळजीपूर्वक परिवर्त्यांचे निरीक्षण व नोंद केली जाते. त्यांचे संख्याशास्त्रीय विश्लेषण करून ते एकमेकांशी संबंधित आहे का हे ठरवले जाते. यासाठी संशोधक परिवर्त्यामध्ये कोणताही बदल घडवून आणत नाही.

24 of 25

  • सह्संबंधाची तीन फलिते :
  • १.धन सहसंबंध- जेव्हा दोन परिवर्त्यामध्ये एकाच वेळी वाढ किंवा घट होत असेल तेव्हा त्यांच्यात धन सहसंबंध असतो
  • २.ऋण सहसंबंध- एका परिवर्त्यामध्ये वाढ होत असताना दुसऱ्या परिवर्त्यात घट होत असेल तर त्यांच्यात ऋण सहसंबंध असतो
  • ३.सह्संबंधाचा अभाव- म्हणजे दोन परिवर्त्यामध्ये कोणताही सहसंबंध नाही

25 of 25

धन्यवाद!