ई-चावडी आज्ञावली
(सरिता नरके)
अपर जिल्हाधिकारी तथा राज्य संचालक,ई-फेरफार प्रकल्प
जमाबंदी आयुक्त कार्यालय,पुणे.
डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम
ई-चावडी आज्ञावली मध्ये लॉगिन करण्याकरीता खालील लिंक चा वापर करण्यात यावा.
HTTPS://ECHAWADI.MAHABHUMI.GOV.IN/
ई-फेरफार आज्ञावली मधील सेवार्थ ID आणि PW टाकून लॉगिन करा....
ई-चावडी लॉगीन केल्यावर भाषा बदला..
मुख्यपृष्ठ वर १. महसूल मागणी निश्चिती २.व्यवहाराचा तपशील ३.गाव नमुना तपशील ४.अहवाल ५. डॅशबोर्ड असे पाच मेनू दिसतील.
१.गाव नमुना १�२. गाव नमुना एक चा गोषवारा�३. गाव नमुना १अ �४. गाव नमुना १-ब �५. गाव नमुना – एक (क) �६. गाव नमुना १-ड �७. गाव नमुना १-इ �८. गाव नमुना दोन�९. गाव नमुना तीन�१०. गाव नमुना ६-ब���
3.गाव नमुना तपशील
११. गाव नमुना ६-ड �१२. गाव नमुना ७-अ�१३. गाव नमुना ७-ब�१४. गाव नमुना १४�१५. गाव नमुना १५ (आवक / जावक)�१६. गाव नमुना १७�१७. गाव नमुना १९
निरंक आणि कामकाज पूर्ण नमुने निवडणे.
वसुली उद्दिष्ट नमूद करणे.
गाव नमुना एक नोंदवहीमधील भूमापन क्रमांक ,क्षेत्र, आकारणी ई-फेरफार प्रणालीत उपलब्ध डेटा प्रमाणे प्राप्त होईल.�१.गाव नमुना १ मध्ये वारंवार होणारे बदल दुरुस्त करून नमुना अद्यावत ठेवावा. गाव नमुना १ मध्ये मुख्यतः लेखन दुरुस्ती, बिनआकारी, बिनभोगवटा क्षेत्राचे प्रदान, जमिनीचे अभिहस्तांकन, अकृषिक परवानगी, अनाधिकृत अकृषिक आकारणी नियमानुकूल करणे, मळईची जमीन, पाण्याने वाहून गेलेली जमीन बाबत दुरुस्ती करून अद्ययावत करावा.�२.गाव नमुना १ मध्ये तालुका निरीक्षक भूमि अभिलेख यांचेकडून कमी जास्ती पत्रक (क. जा. प.) आल्यावर तलाठ्यांने बदल करावा. ��
गाव नमुना १
जमिनीची नोंदवही �(आकारबंद जमाबंदी मिस्ल-शेतवारपत्रक)
गाव नमुना तपशील > गाव नमुना एक
गावाची निवडा करून शोधा करा. गावातील सर्व कृषक भूमापन क्र. उपलब्ध होतील.
माहिती भरा या बटनावर क्लिक केल्यावर माहीती भरण्य करीता उपलब्ध होईल.
सार्वजनिक मार्गाधिकार आणि सुविधाधिकाराची माहिती भरून SAVE करा.
अहवाल > गाव नमुना एक (गाव नमुना-७,ई-फेरफार LIVE डेटा)
गाव नमुना-७,ई-फेरफार LIVE डेटा आणि ई-फेरफार ओ.डी.सी यामधील फरकाचा अहवाल उपलब्ध करून देण्यात आले आहे. गाव नमुना एक च्या फरका नुसार भूधारणा,क्षेत्र ,आकारणी यामध्ये काही दुरुस्ती असल्यास ई-फेरफार प्रणालीमध्ये दुरुस्ती करण्यात यावी.�����
गाव नमुना एक चा फरक
गाव नमुना एक (गाव नमुना-७,ई-फेरफार LIVE डेटा)
गाव नमुना एक ( ई फेरफार ओ.डी.सी )
गाव नमुना एक (फरक)
गाव नमुना एक चा गोषवारा अतिशय महत्वाचा आहे कारण गाव नमुना ५ व तालुका नमुना १ यावर तो अवलंबून आहे. हा नमुना दरवर्षी तयार करावयाचा आहे.�गाव नमुना १ चा गोषवारा तालुका निरीक्षक भूमी अभिलेख यांच्या कार्यालयातील नमुन्याशी जुळला पाहिजे. �प्रत्यक्षात क्षेत्रात बदल होत नसला तरी भूधारणा व आकारणी यात बदल होतात. �जमिन महसूलाची वसूली कमी अधिक होईल, त्या दृष्टीने गाव नमुना १ च्या गोषवा-यात दुरुस्ती करण्यात यावी.�तलाठी यांनी गाव नमुना १ चा गोषवारा दरवर्षी ३१ जुले पर्यंत तयार करुन त्यावर तहसीलदार यांची स्वाक्षरी घेऊन सदर नमुन्याची एक प्रत तहसील कार्यालयात सादर करण्यात यावी.���
२.गाव नमुना एक चा
गोषवारा
गाव नमुना तपशील > गाव नमुना एक चा गोषवारा
गाव निवडून शोध करा .
गाव नमुना एक चा गोषवारा मधील माहिती भरून जतन करा.
अहवाल > गाव नमुना एक चा गोषवारा गाव निवडून शोध करा .
गाव नमुना एक चा गोषवारा भाग-अ
गाव नमुना एक चा गोषवारा भाग -ब
ई-चावडी मध्ये ज्या महसुली गावात वन जमीन म्हणून अधिसूचीत करण्यात आलेले भूमापन क्रमांक असतील ते तलाठी यांनी भूमापन क्रमांक, वनाखालील क्षेत्र, वनाचा प्रकार (संरक्षित वन, राखीव वन, राखीव वन) याची माहिती भरूनअद्यायवत करावी. �������
३.गाव नमुना १अ
वन जमिनींची नोंदवही
गाव नमुना तपशील > वन जमिनींची नोंदवही
नवीन नोंदणी वर क्लिक करून माहिती भरा.
वनाचा प्रकार (संरक्षित वन, राखीव वन, राखीव वन) व माहिती भरून जतन करा.
अहवाल > वन जमिनींची नोंदवही
�१.सरकारी जमिन कोणत्याही सार्वजनिक कामाकरीता राखून ठेवण्यात आलेली नाही किंवा देखभाल करणेकरीता व्यक्ती / � संस्थेला ताब्यात देण्यात आलेली नाही, अशा जमिनीची माहिती अद्यायावत करावी.��२.सरकारी आकारी जमिनीची व बिनआकारी जमिनीची नोंद घेण्यात येते. गावात असणाऱ्या बिनभोगवटयाच्या (सरकारी) � जमिनीचे क्षेत्र, आकार यांची माहिती ई-फेरफार प्रणालीमधून फेच होणार आहे.. एखाद्या जमिनीमध्ये रस्त्याचा अथवा � वहितीचा सार्वजनिक हक्क असेल तर त्यांचीही नोंद या नोंदवहीतील स्तंभ क्रमांक ४ मध्ये करणे आवश्यक आहे. � ���
४.गाव नमुना १-ब
बिन भोगवटयाच्या(सरकारी)जमिनींची नोंदवही
गाव नमुना तपशील > गाव नमुना एक ब
गाव निवडून शोधा करा. गावातील सर्व सरकार भूधारणा असलेले भूमापन क्र. उपलब्ध होईल.
माहिती भरून आणि SAVE करा.
अहवाल > गाव नमुना एक ब
गाव नमुना एक क हा सुधारित गाव नमुना आहे.या मध्ये १ ते १६ प्रकारात वर्गीकरण करण्यात आलेले असून ई-फेरफार प्रणालीमधून फेच होणार आहे.��१.प्रकार निहाय माहिती फेच करावी.�२.जमीन प्रदान करण्याचे आदेश क्रमांक आणि दिनांक अद्ययावत करावा.��
५.गाव नमुना - एक (क)
गाव नमुना तपशील > गाव नमुना एक क
गाव निवडून प्रकार निवडा व शोधा करा. गावातील सर्व प्रकार निहाय भूमापन क्र. उपलब्ध होईल.
माहिती भरा वर क्लिक करून जमिनी बाबत माहिती भरा.
अहवाल > १ ते १६ प्रकार निहाय गाव नमुना एक क चा गोषवारा
अहवाल > १ ते १६ प्रकार निहाय गाव नमुना एक क चा गोषवारा
कुळ कायदयाखाली आणि सिलींग कायदयाखाली अतिरिक्त म्हणून जाहीर केलेल्या जमिनींची नोंद या नमुन्यात घेतात.� कुळ कायद्यांतर्गत कुळाने अटी व शर्तीचा भंग केल्यावर ती जमिन कुळाकडून काढून घेऊन सरकार जमा करण्यात येते व तिचे पात्र लोकांना फेरवाटप होते. अशा जमिनीला कुळ कायदया अंतर्गत अतिरिक्त जमीन म्हणून समजले जाते.�गा.न.नं. १ ड मधील जमिनीचे क्षेत्राचे वाटप झालेनंतर त्याची नोंद गा.न.नं. १ क मध्ये घेतली जाईल, याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
६.गाव नमुना १ड
कुळवहिवाट कायदा आणि महाराष्ट्र शेतजमीन (जमीनधारणेची कमाल मर्यादा) अधिनियम,१९६१ यांच्या उपबंधानुसार वाढीव म्हणुन घोषित केलेल्या जमिनी दर्शविणारी नोंदवही
गाव नमुना तपशील > गाव नमुना एक ड
माहिती भरा वर क्लिक करून जमिनी बाबत माहिती भरून SAVE करा.
माहिती भरणा केल्यावर दुरुस्त किंवा डिलीट करण्या करिता उपलब्ध येईल.
अहवाल > गाव नमुना एक - ड
सरकारी जमिनीवरील सर्व अतिक्रमणांची नोंद या नमुन्यात घेण्यात येते. सरकारी जागेवर झालेले अतिक्रमण नियमानुकूल किंवा दूर करण्यासाठी करण्यात आलेल्या कार्यवाहीची नोंद या नमुन्यात घेण्यात येते.�संबंधित गावचे तलाठी यांनी अतिक्रमण नजरेत आल्यावर या नमुन्यात नोंद घेऊन तहसीलदार यांच्याकडे सादर करावे. अशा अतिक्रमणांसंबंधी तहसीलदार यांनी दिलेल्या आदेशांची नोंद व अंमलबजावणी तलाठी यांनी करावी.����
७.गाव नमुना १इ
अतिक्रमण नोंदवही
गाव नमुना तपशील > गाव नमुना एक ई
नवीन नोंदणी वर क्लिक करून अतिक्रमण जमिनी बाबत माहिती भरा.
अतिक्रमण केलेल्या जमिनीचा फोटो अपलोड करून माहिती जतन करा.
अहवाल > गाव नमुना एक ई
बिगर शेतीकरीता उपयोगातील जमिनी व त्यावरील जमीन महसूलाची नोंद या नमुन्यात केली जाते. या नमुन्याचे दोन भाग करण्यांत आले आहेत. अ] गावठाणातील ब] गावठाणबाहेरील प्रत्येक भागाचे उपयोगानुसार खालीलप्रमाणे पाच वर्गात वर्गीकरण करण्यांत आले आहे. १. निवास विषयक प्रयोजन २. औद्योगिक प्रयोजन ३. वाणिज्यविषयक प्रयोजन ४. कमी / वाढवलेल्या दराने कोणत्याही प्रयोजनाकरीता ५. महसूल माफ प्रदाने १. सक्षम अधिका-यांनी पारीत केलेल्या आदेशाचे आधारे हा नमुना तयार करण्यात येतो. २. तलाठी यांनी गाव नमुना - २ चा तालुका नमुना - २ शी दरवर्षी मेळ घालावा लागतो. ३. गावठाणातील जमिनी फक्त निवास विषयक प्रयोजनासाठी महसूल माफीने देण्यात येतात. ४. गावठाणतील जागेचा निवासेत्तर व पारडी जमिनीचा अकृषिक वापर झाल्याचे आढळल्यास असे वापर अनाधिकृत अकृषिक वापर ठरवून दंडनीय कार्यवाही (एन.ए.पी.-३६ ) करण्यात येते तसेच असे वापर नियमानुकूल केले जातात. त्याची नोंद गाव नमुना - २ ला घ्यावी. तसेच पाच वर्षापेक्षा अधिक कालावधीचे भाडेपट्टे, प्रदाने / अकृषिक परवानग्या यांच्या नोंदी या नमुन्यात घेण्यात याव्यात.�
गाव नमुना २
अकृषिक महसुलाची नोंदवही
गाव नमुना तपशील > गाव नमुना दोन
गाव निवडून शोधा करा. गावातील सर्व अकृषक असलेले भूमापन क्र. उपलब्ध होईल.
माहिती भरा वर क्लिक करून अकृषक जमिनी बाबत माहिती भरून SAVE करा.
अहवाल > गाव नमुना दोन
ईनाम जमिनीचे तीन वर्ग अस्तित्वात आहेत.�१. ईनाम वर्ग १ सरंजाम ईनाम: सातारा सरंजाम इनाम प्रतापसिंह शाहू महाराज भोसले जिवंत असे पर्यंत चालू � राहील, नंतर आपोआप खालसा होईल. �२. ईनाम वर्ग - ३ देवस्थान ईनाम: मंदिराची पूजा अर्चा व धार्मिक खर्च भागविण्याकरीता जमीन ईनाम दिली जाते.�३. ईनाम वर्ग - ७ किरकोळ बिनशेती : शाळा महाविद्यालये, धर्मशाळा, हॉस्पिटल, क्रीडांगणे, व्यायाम शाळा इत्यादी सार्वजनिक कामांकरीता महसूल माफीने दिलेल्या जमिनी ईनाम वर्ग ७ च्या जमिनीची नोंद गाव नमुना ३ सह गाव नमुना २ मध्येही तलाठी यांनी करावी.�
९.गाव नमुना तीन
इनाम पत्रक
गाव नमुना तपशील > गाव नमुना तीन
गाव निवडून शोधा करा. गावातील सर्व इनाम जमिनीचे भूमापन क्र. उपलब्ध होईल.
माहिती भरा वर क्लिक करून इनाम जमिनी बाबत माहिती भरून SAVE करा.
अहवाल > गाव नमुना तीन
१. महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम चे कलम १४९ अन्वये हक्क प्राप्त करणा-याने तीन महिन्याच्या � आत तलाठयाला सूचना देणे आवश्यक आहे, अन्यथा संबंधित व्यक्ती विलंब शुल्कास पात्र ठरतो.�२. फेरफार प्रमाणीत करणारा सक्षम अधिकारी विलंब शुल्काची आकारणी करु शकतो. त्याची वसुली � तलाठयाने संकीर्ण जमिन महसूल म्हणून करावयाची असते व त्याची नोंद गाव नमुना १७� मध्ये करावी .�३. विलंब शुल्कावर स्थानिक उपकर देय नाही.
१०.गाव नमुना ६ब
(विलंब शुल्क (महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,१९६६ कलम १५२ खालील दंड ) प्रकरणांची नोंदवही)
गाव नमुना तपशील > गाव नमुना सहा ब
नवीन नोंदणी वर क्लिक करून विलंब शुल्क बाबत माहिती भरा.
माहिती भरून जतन करा.
अहवाल > गाव नमुना सहा ब
१. तलाठी यांनी वाटणी किंवा जमिनीचे खरेदी विक्री व्यवहारामुळे जमिनीचे पोटहिस्से पडत असतील � तर त्याची अप्रमाणित स्थानदर्शक रेखाचित्रे गाव नमुना ६/ड मध्ये काढुन तहसील कार्यालयात पुढील � कार्यवाहीस्तव दाखल करावीत
११.गाव नमुना ६ड
नवीन उप- विभाग (पोट हिस्से) नोंदवही
गाव नमुना तपशील > गाव नमुना सहा ड
नवीन नोंदणी वर क्लिक करून पोट हिस्से बाबत माहिती भरा.
अहवाल > गाव नमुना सहा ड
कुळवहिवाट नोंदवहीमध्ये कुळ वहिवाटीबाबत ची माहिती भरावी. उदा. कुळाचे नाव, आकारलेला कर व खंड बाबत माहिती अद्ययावत करावी.
१२.गाव नमुना ७अ
कुळवहिवाट नोंदवही
गाव नमुना तपशील > गाव नमुना सात
नवीन नोंदणी वर क्लिक करून कुळाच्या जमीनी बाबत माहिती भरा.
कुळाच्या जमीनी बाबत माहिती भरून जतन करा.
अहवाल > गाव नमुना ७ अ
पिकांच्या तपासणीच्या काळात, जमीन प्रत्यक्ष ज्या व्यक्तीचा ताब्यात असेल ती व्यक्ती जिचे नाव अधिकार अभिलेखामध्ये अभिलिखीत केलेले असेल तीच आहे याची तलाठयाने पडताळणी करावी.जमीन प्रत्यक्षात ज्या व्यक्तीच्या ताब्यात आहे ती व्यक्ती अधिकार अभिलेखानुसार अशा जमिनीचा भोगवटा करण्याचा हक्क असलेल्या व्यक्तीहून वेगळी आहे असे तलाठयास आढळून आल्यास, त्याने त्या व्यक्तीच्या नावाची या नोंदवहीत नोंद करावी.
१३.गाव नमुना ७ब
(अधिकार अभिलेखानुसार जमीन कब्जात असल्याचे मानण्यात येणाऱ्या व्यक्ती - व्यतिरिक्त जमीन कब्जात असलेल्या इतर व्यक्तीची नोंदवही)
गाव नमुना तपशील > गाव नमुना सात ब
नवीन नोंदणी वर क्लिक करून गा.न. सात-ब बाबत माहिती भरा.
गा.न. सात-ब बाबत माहिती भरून जतन करा.
अहवाल > गाव नमुना सात-ब
गाव नमुना १४ या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठ्याबाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबत ची माहिती भरावी . शेती आणि गावठाण मधील पाणीपुरवठ्याबाबतची माहिती स्वतंत्र भरावी.
१४.गाव नमुना १४
पाणी पुरवठ्याच्या नोंदवही
गाव नमुना तपशील > गाव नमुना चौदा
नवीन नोंदणी वर क्लिक करून पाणीपुरवठ्याच्या साधनां बाबत माहिती भरून जतन करा.
अहवाल > गाव नमुना चौदा
आवक / जावक नोंदवहीत तलाठ्यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या व बाहेर पाठीवलेल्या पत्र व्यवहाराच्या नोंदी घ्याव्यात.
१५.गाव नमुना १५
आवक / जावक
गाव नमुना तपशील > गाव नमुना पंधरा
नवीन नोंदणी वर क्लिक करा आणि पत्रव्यवहार बाबत माहिती भरून जतन करा.
अहवाल > गाव नमुना १५ आवक/जावक
१.संकीर्ण जमीन महसूल बसवण्यास योग्य बाब सर्व प्रतिवृत्ते या नमुन्यामध्ये भरून अद्ययावत करावे.�२.सर्व प्रकारचे दंडाचे वसुली आदेश यामध्ये नमूद करणे. ��
१६.गाव नमुना सतरा
संकीर्ण महसूल बसविण्यासंबंधीचे प्रतिवृत नोंदवही
गाव नमुना तपशील > गाव नमुना सतरा
नवीन नोंदणी वर क्लिक करा आणि संकीर्ण महसुला बाबत माहिती भरा.
नवीन नोंदणी वर क्लिक करा आणि संकीर्ण महसुला बाबत माहिती भरून जतन करा.
अहवाल > गाव नमुना सतरा
तलाठी/मंडळ अधिकारी यांच्याकडे ताब्यात असणाऱ्या सरकारी मालमत्तेची नोंद अद्ययावत करावे.
१७.गाव नमुना १९
तलाठी/ मंडळ अधिकारी यांच्या ताब्यात असलेल्या सरकारी मालमत्तेची नोंदवही
गाव नमुना तपशील > गाव नमुना एकोणवीस
नवीन नोंदणी वर क्लिक करून मालमत्तेची माहिती भरून जतन करा.
अहवाल > गाव नमुना एकोणीस
१. चलान पहा ��२. पावत्या पहा ��३. गाव नमुना चार -- संकिर्ण जमीन महसुलाची नोंदवही��४. गाव नमुना पाच चा गोषवारा��५. गाव नमुना ८ ब आणि ८ क��६. गाव नमुना आठ ड��७. गाव नमुना नऊ - ब�
4.अहवाल
१.चलान पहा या अहवालात पैसे जमा केले आणि पैसे जमा नाही केले असे दोन प्रकारच्या चलन बघण्याची सुविधा देण्यात आले आहे. � �����
१.चलान पहा
अहवाल > चलान पहा
चलान पहा > पैसे जमा केले
चलान पहा > पैसे जमा नाही केले
चालू वर्षात खातेदार निहाय पावत्या पाहण्याची सुविधा यामध्ये देण्यात आलेली आहे.
२.पावत्या पहा
अहवाल > पावत्या पहा
१. चालू वर्षातील गावाची एकूण संकिर्ण जमीन महसुलाची वसुली अद्यावावत करण्यात यावी.��२. गावातील पाच वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी निश्चित केलेल्या संकीर्ण महसुलाच्या हिशोबाची नोंदी अद्ययावत � करण्यात यावी.
३.गाव नमुना चार
संकिर्ण जमीन महसुलाची नोंदवही
अहवाल > गाव नमुना चार
गाव आणि महसूल वर्ष निवडून डेटा मिळवा वर क्लिक करा.
गाव नमुना पाच हा गा.न.1 ते 4 मधील माहितीचा घोषवारा आहे. गा.न.1 ते 4 नोंदवहीत गावाचे एकूण क्षेत्रफळ, गावाचा महसूल, ग्रा.प.,जिल्हा परिषदेचे कर याबाबतची माहिती अद्ययावत होईल.
४.गाव नमुना पाच
अहवाल > गाव नमुना पाच
गाव नमुना पाच चा गोषवारा भाग-अ
गाव नमुना पाच चा गोषवारा भाग-ब
१.सदर अहवाल गावाची एकत्रित जमीन महसुलाची वसुली दर्शविण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. � गाव नमुना आठ –ब आणि आठ-क मधील खातेदार निहाय एकत्रित वसुली दर्शविण्यात आलेली आहे.�
५.गाव नमुना आठ –ब आणि आठ-क
अहवाल > गाव नमुना आठ-ब
अहवाल > गाव नमुना आठ-क
अहवाल > गाव नमुना आठ –ब आणि आठ-क
सदर अहवालात तलाठ्याने वसूल केलेल्या सरकारी येणे रकमांची व इतर रकमांची रोख नोंदी दर्शविण्यात येईल.
६.गाव नमुना आठ ड
(तलाठयाने/मं.नि.वसुल केलेल्या सरकारी येणे रकमांची व इतर रकमांची नोंदवी)
अहवाल > गाव नमुना आठ ड
ई-चावडी मधील गाव नमुना नऊ – ब अहवालात गाव नमुना नऊ आणि नऊ –अ पावती यांचा हिशोब दर्शविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.�
७.गाव नमुना नऊ - ब
अहवाल > गाव नमुना नऊ
१.डॅशबोर्ड (MIS) तालुका ,उपविभाग आणि जिल्हा स्तरावर गावांची नोंदवलेली माहिती � बघण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.� �२.तालुक्यातील सर्व गावांची नमुना निहाय नोंदवलेली माहिती चा प्रगती अहवाल उपलब्ध � आहे.�
5.डॅशबोर्ड (MIS)
खालीलप्रमाणे ID आणि PASWARD टाका.
जमाबंदी आयुक्त कार्यालय,पुणे
कलेक्टर डॅशबोर्ड
सर्व विभाग
जमाबंदी आयुक्त कार्यालय,पुणे
विभागनिहाय > डॅशबोर्ड
तालुका निवडा..
तालुकानिहाय सर्व गावांची नोंदवलेली माहिती.
�धन्यवाद...
जमाबंदी आयुक्त कार्यालय,पुणे