1 of 38

​

सुस्वागतम्

2 of 38

​

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, मुंबई उपनगर

दि.26 जून, 2025 ते दि.04 जुलै, 2025 दरम्यान

“राजश्री शाहू महाराज” यांच्या जयंतीचे औचित्य साधून, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत

“राजश्री शाहू महाराज जयंती पर्व”

विशेष मोहिम

विषय : 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन

3 of 38

​

जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया,

सर्वसाधारण माहिती व ऑनलाईन

अर्जाची कार्यपध्दती

4 of 38

शैक्षणिक – (CET / NEET/JEE /NATA

या सामायिक प्रवेश परिक्षा देणारे विद्यार्थी)

अ.क्र.

‍अर्ज करण्याचा कालावधी /महिना

अभ्यासक्रम /‍ परिक्षा

१.

ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर –

​

१२ वी विज्ञानमध्ये शिकणारे व वैद्यकीय, अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, फार्मसी, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्यव्यवसाय या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी इ.

२.

जानेवारी –

​

अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांनी CET चा ऑनलाईन अर्ज भरल्यावर लगेच समितीकडे अर्ज प्रत्यक्ष सादर करावा.

अभ्यासक्रम – MBA/ MMS, BFA,

M.F.A, MCA. M.Pharm, M.E/ M.

Tech, M.Arch, BHMCT, MHMCT,

LLB, B.Ed, M.Ed, B.P.Ed, M.P.Ed इ.

​

३.

फेब्रुवारी –

​

तंत्रशिक्षण पदविका, फार्मसी पदविका मध्ये शेवटच्या वर्षात शिकणारे व पुढील वर्षी पदवीच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत.

​

5 of 38

अर्ज सादर करावयाची कार्यप्रणाली

1. bartievalidity.maharashtra.gov.in /

barti.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन

अर्ज भरावेत.

2. अर्जाची पाठपोट प्रिंट काढावी.

3. अर्जाची प्रिंट, सोबत आवश्यक मुळ कागदपत्रे व साक्षांकीत प्रती

स्वतंत्र संच घेऊन समिती कार्यालयात ३० दिवसात सादर

करावीत.

4. ज्या जिल्ह्यातून जातीचा दाखला घेतला आहे त्या कार्यक्षेत्रातील

समितीकडे अर्ज सादर करावा.

5. कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती सुस्पष्ट व सक्षम प्राधिकाऱ्यांकडून

साक्षांकित केलेल्या असाव्यात.

6 of 38

  • ६. अर्जासोबत विहीत क्रमाने कागदपत्रे लावावीत.
  • 7. कागदपत्रांचा विहीत क्रम :-

​

  • अ) विहीत नमुन्यातील अर्जाची पाठपोट प्रिंट आऊट.
  • ब) अर्जदाराचा जातीचा मुळ दाखला व त्याची साक्षांकित प्रत.
  • क) अर्जदाराच्या शाळा सोडल्याच्या दाखल्याची साक्षांकित प्रत.
  • ड) अर्जदाराच्या वडीलांचा शाळा सोडल्याच्या दाखल्याची साक्षांकित

प्रत.

  • इ) रक्तनातेसंबंधातील नातेवाईकांचे जात वैधता प्रमाणपत्र असल्यास

त्याची साक्षांकित प्रत.

  • ई) आवश्यक प्रतिज्ञापत्रे.

7 of 38

अर्ज सादर करताना खाली दिल्याप्रमाणे कागदपत्रे क्रमांकानुसार अर्जासोबत जोडावेत.

​

  1. कॉलेजचे शिफारस पत्र
  2. कॉलेज आयडी
  3. फॉर्म नं.15ए
  4. विदयार्थ्यांने सामायिक प्रवेश परिक्षा दिली असल्यास त्याचा Application Form, Score Card, Hall Ticket सादर करावे.
  5. ऑनलाईन फॉर्मची प्रिन्टआऊट.
  6. विदयार्थ्यांचे जात प्रमाणपत्र
  7. विदयार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला
  8. वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला
  9. आजोबा/आजी आत्या/काका यांचा शाळा सोडल्याचा दाखला व गाव नमुना नं.14 (जन्माचा उतारा)
  10. रक्त नातेसंबंधातील जात वैधता प्रमाणपत्र
  11. फॉर्म नं.17 व फॉर्म नं.3 (Affidavit)

8 of 38

विदयार्थी अर्जाचा नमुना क्रमांक

प्रयोजन

अर्ज नमुना क्र.

शपथपत्र नमुना क्र.

वंशावळ शपथपत्र

शैक्षणिक

१६

१७

०३

9 of 38

वंशावळ प्रतिज्ञापत्र – नमुना ३ (नियम ४)

उदा.

विठ्ठल दादू कांबळे

​

​

शंकर विठ्ठल कांबळे अरविंद विठ्ठल कांबळे

​

​

प्रदिप प्रज्ञा शरद दिलीप

विशाल सार्थक

(अर्जदार) (वैधता धारक)

​

​

​

​

​

​

​

10 of 38

  • अर्जदाराचे वडीलांच्या शाळा प्रवेश मानीव दिनांकापूर्वी नसल्यास, त्यात जातीची नोंद नसल्यास किंवा वडील अशिक्षित असल्यास पुढीलपैकी कागदपत्रे लावावीत.

​

  1. आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला/गाव नमुना नं.१४ (जन्म-मृत्यु दाखला किंवा
  2. काकांचा शाळा सोडल्याचा दाखला/गाव नमुना नं.१४ (जन्म-मृत्यु दाखला किंवा

3. आत्याचा शाळा सोडल्याचा दाखला/गाव नमुना नं.१४ (जन्म-मृत्यु

दाखला किंवा

4. चुलत आजोबा/चुलत काका/चुलत आत्या यांचा शाळा सोडल्याचा

दाखला/गाव नमुना नं.१४ (जन्म-मृत्यु दाखला)

5. मुंबई महानगर पालिका क्षेत्रात गाव नमुना नं.१४ मिळत नाही, तर या

ठिकाणी Birth Abtract मिळतो. यामध्ये जातीची नोंद असते.

6. मराठवाड्यात यालाच खासरा पत्रक असे म्हणतात.

11 of 38

ऑनलाईन अर्ज सादर करावयाची कार्यप्रणाली

1.bartievalidity.maharashtra.gov.in /

barti.maharashtra.gov.in ही वेबसाईट उघडावी.

2.डाऊनलोड या टॅब मधील अर्ज, प्रतिज्ञापत्र नमुने वाचावेत.

​

​

​

​

​

​

​

​

12 of 38

​

3. रजिस्ट्रेशन करुन व्यवस्थित अर्ज भरावा.

​

4. अर्जदाराच्या जात प्रमाणपत्रावरील माहिती ऑनलाईन प्रणालीमध्ये अचुक भरावी. सदरची माहिती आपल्या जात वैधता प्रमाणपत्रावर प्रिंट होणार आहे. त्यामुळे स्पेलिंग मिस्टेक करु नये.

​

5. सर्व मुळ कागदपत्र व्यवस्थित स्कॅन करुन ऑनलाईन प्रणालीमध्ये

अपलोड करावीत. छायांकित प्रती अपलोड करु नयेत.

​

6. मानिव दिनांका पुर्वीची जातनोंद असणारी जुनी कागदपत्रे सर्वाधिक

महत्वाची आहेत.त्यांची मुळ प्रत स्कॅन करुन अपलोड करावी. व या पुरावाधारकाशी नातेसंबंध स्पष्ट होणारी कागदपत्रे जोडावीत. तसेच ती अपलोड करावीत.

 

13 of 38

7. विद्यार्थ्यांचा जन्मदाखला / प्रमाणपत्र अलिकडील काळातील

असल्यामुळे अपलोड करु नये.

​

8. ऑनलाईन प्रणालीत अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट, सोबत मुळ कागदपत्रे, साक्षांकीत प्रती घेऊन समिती कार्यालयात ३० दिवसात सादर करावीत.

​

9. सक्षम प्राधिकारी यांनी साक्षांकीत केलेल्या प्रती द्याव्यात.

10. वैधता प्रमाणपत्र ऑनलाईन पध्दतीने ई-मेल वर पाठविले जाणार

असल्यामुळे आपला ई-मेल व पासवर्ड नमुद करावा व लक्षात ठेवावा.

त्रयस्थ व्यक्तीचा ई - मेल व फोन नंबर देऊ नये.

​

11. ज्या जिल्हातून जातीचा दाखला घेतला आहे त्या कार्यक्षेत्रातील

समितीकडे अर्ज सादर करावा.

​

14 of 38

​

​

12. दि.1 सप्टेंबर, 2012 च्या नियमानुसार अर्जदाराचा जातीचा दाखला ज्या सक्षम

प्राधिका-याने निर्गमित केलेला आहे, असा जातीचा दाखला काढताना जो

मानीव‍ दिनांकापूर्वीचा पुरावा सादर केलेला आहे त्या जिल्हयातील सक्षम

प्राधिका-याकडून विहीत नमुन्यातील सुधारीत जातीचा दाखला प्राप्त करुन

घ्यावा आणि संबंधित जिल्हयातूनच जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्राप्त

करुन घ्यावी.

​

13. अर्ज स्वत: किंवा पालकांनी सादर करावा. त्रयस्थ व्यक्तीमार्फत अर्ज सादर

करु नये.

​

14. आपल्या प्रस्तावा संदर्भात असणाऱ्या त्रुटी, आक्षेप, वैधता प्रमाणपत्र बाबत

SMS व ईमेल व्दारे सुचित केले जाते.

​

15. ऑनलाईन जात वैधता प्रमाणपत्रावर अधिकाऱ्यांची डिजीटल स्वाक्षरी ( )

अशी असते. सदर डिजीटल स्वाक्षरीचे प्रमाणपत्र योग्य प्रकारे दिसण्यासाठी

Acrobat Reader DC या ॲपमधुन डाउनलोड करुन घ्यावे.

​

15 of 38

16 of 38

17 of 38

जातीचे प्रमाणपत्र घेतल्यानंतर त्यावरील नावाचे स्पेंलिग, जात व इतर नोंदी तपासाव्या. त्यात काही चुक असल्यास प्रमाणपत्र त्वरीत बदलुन घ्यावे.

18 of 38

राज्याची मागासवर्गीय यादी व प्रवर्गनिहाय आरक्षणाची टक्केवारी

​

अ.क्र

प्रवर्ग

एकूण जाती

आरक्षणाची टक्केवारी

१

अनुसूचित जाती

५९

१३%

२

अनुसूचित जमाती

४७

७%

३

विमुक्त जाती-अ

१४

३%

४

भटक्या जमाती-ब

३६

२.५%

५

भटक्या जमाती-क

१+पोटजाती २६

३.५%

६

भटक्या जमाती-ड

१+ पोटजाती २

२%

७

इतर मागासवर्ग

३५०

१९%

८

विशेष मागास प्रवर्ग

७

२%

​

एकूण आरक्षणाची टक्केवारी

​

५२%

19 of 38

महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) नियम 2012 मधील नियम 2 (ड) नुसार मानीव दिनांक

प्रवर्ग

मानीव दिनांक

अनुसूचित जाती (SC)

दि. 10 ऑगस्ट, 1950

विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT)

दि. 21 नोव्हेंबर, 1961

इतर मागास वर्ग (OBC) व

​

विशेष मागास प्रवर्ग (SBC)

दि.13 ऑक्टोंबर, 1967

 

20 of 38

अ.क्र.

तपशील

दिनांक

पुराव्याचे वर्णन

पुरावा मानीव दिनांका पुर्वीचा आहे काय ?

१.

जन्मदिनांक

७.३.१९६०

जन्म दाखला / गाव नमुना नं.१४

होय

२.

प्राथमिक शाळा प्रवेश

१.६.१९६६

प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखला

होय

३.

माध्यमिक शाळा प्रवेश

१.६.१९७३

माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला

नाही

४.

शासकीय सेवेत रुजू

२१.२.१९८५

सेवा पुस्तकातील नोंद

नाही

उदा.पुरावाधारक – श्री.सचिन बाळकृष्ण कदम, प्रवर्ग इ.मा.व मानीव दि.13.10.1967.

मानीव दिनांकापूर्वीचा पुरावा म्हणजे काय ? याचे पुढील उदाहरण नीट पहावे.

रजिस्टरमध्ये / अभिलेखामध्ये ज्या दिवशी नोंद झाली तो दिनांक ग्राहय धरण्यात येतो.

21 of 38

  • नाव / आडनावामध्ये बदल/अपभ्रंश असल्यास वंशावळ प्रतिज्ञापत्रात तसा उल्लेख करावा किंवा नांव बदलाचे राजपत्र सादर करावे.

​

  • वंशावळ प्रतिज्ञापत्र अभ्यासपूर्वक करावे.

​

  • चुलत आजोबा/चुलत काका/चुलत आजी आत्या/चुलत आत्या इ. नातेवाईकांचा जात दर्शक पुरावा असल्यास नातेसंबंध सिध्द करण्यासाठी एकत्रित नावाचा उल्लेख असलेले आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. उदा.महसुली पुरावे - जमीनीचे फेरफार उतारे, सातबारे उतारे, हक्काचे पत्रक, खरेदी खत इ.

22 of 38

समतेच्या तत्वावर आधारित भारतीय संविधान

​

  • कलम १५ (४) : राज्य मागासलेल्या वर्गाच्या उन्नतीसाठी

विशेष तरतूद करु शकेल.

​

  • कलम १६ (४) : राज्य मागासवर्गीयांसाठी आरक्षण देऊ

शकेल.

​

  • कलम १७ : अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे.

​

  • कलम ४६ : राज्य दुर्बल घटकांचे शैक्षणिक व आर्थिक हित

संवर्धन करेल.

​

​

23 of 38

वेळेवर जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केव्हा करावा ?

​

नियम १८ (५) – समितीला ३+(२) = ५ महिने एवढा कालावधी निर्णय घेण्यासाठी निश्चीत केला आहे. त्यामुळे प्रवेश घेण्यापूर्वी ५ महिने आधी अर्ज सादर करावा.

​

​

​

​

​

​

​

​

​

​

​

​

​

​

​

​

​

​

​

​

​

24 of 38

​

१. राष्ट्रपतीचे (अनुसूचित जाती) अध्यादेश, १९५०

​

२. राष्ट्रपतीचे (अनुसूचित जमाती) अध्यादेश, १९५०

​

३. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आदेश (सुधारणा)

कायदा १९७६ (१९७६ चा १०८ वा) मधील परिशिष्ट-१

मधील भाग-१०

​

या अध्यादेशांद्वारे राज्य निहाय यादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

​

​

​

​

​

​

​

​

​

​

​

​

​

​

​

​

​

​

25 of 38

अनुसूचित जाती आदेश (सुधारणा) १९९०

​

परिच्छेद (३) अनुसूचित जातीमध्ये हिंदु, शिख व बौध्द या धर्मातील व्यक्ती समाविष्ट असतील.

26 of 38

​

अन्य प्रवर्ग, म्हणजे अनुसूचित जमाती, इ.मा.व, विजा.भ.ज. व वि.मा.प्र. यांना धर्माचे बंधन नाही.

27 of 38

महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम 2000

महाराष्ट्र शासन अधिनियम सन 2001

​

  • कलम 8 नुसार जाती दावा सिध्द करण्याची जबाबदारी

अर्जदार यांची राहील.

  • कलम 9 नुसार सक्षम प्राधिकाऱ्यास, अपील प्राधिकरणास व

पडताळणी समितीस दिवाणी न्यायालयाचे अधिकार प्रदान

करण्यात आलेले आहेत.

28 of 38

महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) नियम 2012 मधीन नियम 2 (ड) नुसार मानीव दिनांक

​

  • मानीव दिनांकापूर्वीच्या जात नोंदीना सर्वाधिक महत्व

(Most Probative Value).

​

  • मानीव दिनांकापूर्वीचा कुटूंबाचा महाराष्ट्र राज्यातील कायमस्वरुपी

रहिवास असावा.

29 of 38

नियम 3 : रहिवासासंबंधातील शर्ती

​

अर्जदार/वडील/आजोबा जेथील कायमस्वरुपी रहिवासी होते. तेथील सक्षम प्राधिकाऱ्याकडे जातीच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा.

30 of 38

अन्य प्रतिज्ञापत्रे����

अ. नियम 14 नमुना 17 नुसार

​

1. कागदपत्रे खरी आणि योग्य मार्गाने मिळवलेली आहेत.

​

2. कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही.

​

ब. मोडी / उर्दु लिपीतील कागदपत्रे असल्यास मोडी / उर्दु

जाणकाराचे लिप्यांतर व शपथपत्र.

​

क. कागदपत्रात कोणत्या ही प्रकारचा अनधिकृत

बदल करु नये.

​

31 of 38

कागदपत्रातील नोंदीत बदल करण्याबाबतचे सर्वसाधारण नियम

1. विद्यार्थी शिकत असताना जात नोंदीतला बदल करण्याचा अधिकार उपसंचालक (शिक्षण) / शिक्षणाधिकारी यानांच आहे. याचाच अर्थ जुन्या / मानीव दिनांकापुर्वीच्या शालेय नोंदीत सामान्यत: बदल करता येत नाही.

​

2. जन्म, मृत्युची 1 वर्षानंतर नविन नोंदणी करण्याचा अधिकार जन्ममृत्यू नोंदणी अधिकारी यांना नाही. 

32 of 38

१. जात नोंद नसणारी अनावश्यक कागदपत्रे समितीने

मागितल्याशिवाय जोडू नयेत.

उदा. 1. रेशनकार्ड

2. विज बिल

3. पॅन कार्ड

4. निवडणुक ओळखपत्र

5. आधार कार्ड

​

2. समितीने घेतलेल्या आक्षेपांचे दोन ते सहा

आठवडयाच्या आत निरसन करावे लागेल.

अन्यथा अपूर्ण अर्ज फेटाळले जातील.

​

33 of 38

अन्य माहिती �मुस्लीम समाजाच्या बाबतीत आवश्यक पुरावे

  • शालेय नोंदीमध्ये जातीचा सहसा उल्लेख नसतो.

​

  • मानीव दिनांकापुर्वीचे महसुली व व्यवसाय पुरावे आवश्यक.

​

  • पिढीजात / पारंपारीक व्यवसायाचे जुने पुरावे असावेत.

​

  • आता कोणतीही व्यक्ती कोणताही व्यवसाय करु शकत

असल्याने अलिकडच्या काळात केवळ चरितार्थासाठी

नव्याने स्विकारलेल्या व्यवसायानुसार जातीदावा सिध्द होत

नाही.

​

34 of 38

अन्य राज्यातून आलेल्या व्यक्ती – सर्वसाधारण माहिती.

1. मानीव दिनांकापूर्वी कायम रहिवासासाठी महाराष्ट्रात आले

असल्यास महाराष्ट्र राज्यातील सवलतीस पात्र.

​

2. मानीव दिनांका नंतर महाराष्ट्र राज्यात आले असल्यास

अ. त्यांचे मुळ राज्य व केंद्र शासनाच्या सवलतीस पात्र.

​

ब. नमुना क्रमांक 10 मध्ये जातीचे प्रमाणपत्र मिळेल. मात्र महाराष्ट्र

राज्याच्या सवलती मिळणार नाहीत. तसेच वैधता

प्रमाणपत्रही मिळणार नाही.

 

35 of 38

​

​

कायम रहिवास : सेवा, नोकरी, शिक्षण व कारावास इत्यादी कारणाकरीता नसलेला रहिवास

 

36 of 38

खोटा / चुकीचा जात दाखला मिळवल्यास शिक्षा

​

​

  • दिलेला लाभ काढून घेणार. (उदा.प्रवेश रद्द)
  • सहा महिने ते दोन वर्षे सश्रम कारावास.
  • दोन हजार ते वीस हजार रुपये दंड .

37 of 38

जात प्रमाणपत्र पडताळणी समिती

​

रचना

​

अध्यक्ष :- सहसचिव पेक्षा कमी दर्जा नसलेले अधिकारी

सदस्य :- उपायुक्त, समाज कल्याण

सदस्य सचिव :- संशोधन अधिकारी

​

पोलीस दक्षता पथक (समितीला क्षेत्रीय चौकशी करुन सहाय्य करण्यासाठी)

​

पोलीस उपअधिक्षक

पोलीस निरीक्षक

पोलीस शिपाई

38 of 38

​

​

​

​

​

धन्यवाद !

​

​

​

​

​

​