1 of 16

प्रकरण २.�शिक्षणाचा ऐतिहासिक आढावा�_______________________

डॉ. श्रीकांत मगर

सहाय्यक प्राध्यापक, लोकप्रशासन विभाग,

श्रीमती एस.के.गांधी महाविद्यालय, कडा.

2 of 16

वैदिक काळातील शिक्षण

  • वैदिक काळातील शिक्षण पद्धती ही विद्यार्थ्यांना सर्वागिन ज्ञान देणारी शिक्षण पद्धती होती.
  • वैदिक काळामध्ये केवळ धार्मिक शिक्षणावर भर नव्हता. तर विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान, तकशक्ती, व्याकरण, ज्योतिष, छंद आणि निरुक्त यावर भर देण्यात आला.
  • वैदिक काळात चिंतन आणि मनन हे आवश्यक मानलेले आहे आणि प्राचीन काळातील ज्ञान हे याकरिता अरण्यातील एकांतवासावर भर देते.
  • उपनिषदांतील तत्त्वज्ञान यांना आरण्यकेट्टी म्हणतात.

3 of 16

वैदिक काळातील शिक्षण

  • प्राचीन काळापासून शिक्षणाचे दोन प्रकार आढळतात.
  • एक प्रकार वैदिक ज्ञानाची परंपरा मुखोदगत करणे या स्वरूपाचा आहे.
  • दुसरा प्रकार हा चिंतन आणि मनन या स्वरूपाचा आहे आणि त्याचे प्रतीक म्हणजे उपनिषदे आहेत.
  • ज्या ऋषींनी शिक्षणाच्या परंपरा सुरू केल्या. त्यांनी आपापल्या शाखा गुरुशिष्य परंपरेच्या स्वरूपात प्रस्थापित केल्या.

4 of 16

वैदिक काळातील शिक्षणाची वैशिष्ट्ये

१) गुरुकुल पद्धत

२) उपनयन

३) शिष्याची नित्यकर्मे

४) गुरुसेवा

५) योग्य संस्कार

६) शैक्षणिक सत्र

७) अध्ययन व पठण

८) धार्मिक शिक्षणास प्रोत्साहान

९) बौद्धिक विकास

१०) बाह्य विषयांचे ज्ञान

११) स्त्री शिक्षण.

5 of 16

बौद्ध काळातील शिक्षण

  • इ. स. पूर्व ५६३ मध्ये भगवान बुद्ध अवतरले.
  • त्यांनी उपयुक्त दोषांप्रती प्रतिक्रिया स्वरूप एक सुधारणावादी धर्माला जन्म दिला ज्याला ‘बौद्ध’ धर्म असे म्हणतात.
  • वैदिक धर्मातील दोष दूर करून त्यातील नीतिमत्ता आणि शांती, दया, अहिंसा इ. मूल्यांवर भर.
  • शिक्षणातून आचार संपन्न व्यक्तिमत्त्व निर्माण करण्याचा प्रयत्न होत होता, कारण शंभर विचारांपेक्षा एक आचार श्रेष्ठ असतो.' याला स्थान होते.
  • बौद्धकालीन शिक्षणाचा प्रमुख हेतू निर्वाणप्राप्ती आणि बौद्ध धर्माचा प्रसार करणे हा होता.

6 of 16

बौद्ध काळातील शिक्षण

  • शिक्षणासाठी मठ व विहार होते.
  • भिक्षू मठात वास्तव्य करीत.
  • भिक्षूच्या संघटनेस संघ म्हणत, शिक्षण संघ जीवनातून मिळे.
  • मठ व विहार शिक्षणाची केंद्रे होती.
  • विद्यापीठात जादूविद्या, धनुर्विद्या, सर्पविद्या, ज्योतिष आणि वैद्यक इ. विद्या शिकविल्या जात असत.

7 of 16

बौद्ध काळातील शिक्षणाचे विविध केंद्रे किंवा विद्यापीठे

अ) वलभी विद्यापीठ

ब) विक्रमशिला विद्यापीठ

क) जगदला विद्यापीठ

ड) मिथिला विद्यापीठ

इ) नदिया (नवन्दीप) विद्यापीठ

ई) नालंदा विद्यापीठ

8 of 16

मुस्लिम काळातील शिक्षण

  • वैदिक व बौद्ध काळातील शिक्षणाचे ध्येय ही संस्कृती संक्रमन होते तेच ध्येय मुस्लिमांच्या शिक्षणात दिसून येते.
  • शिक्षणातून इस्लाम संस्कृतीचे जतन तसेच संवर्धन करण्याचे काम केले जात असत.
  • मुस्लिम कालीन शिक्षणाचा आधार धर्म होता.
  • मशिदीचे जाळे जसेजसे पसरू लागले तसतसे मशिदीलाच जोडून शाळाही निघू लागल्या.
  • शाळा, मशिदींना जोडून असल्यामुळे मुलांच्या मशिदीत चालत असणारे धार्मिक संस्कार, व्यवहार नेहमी पाहण्यात येत व त्यांचा संस्कारही त्यांच्यावर होत असे.

9 of 16

मुस्लिमकालीन शिक्षणाची केंद्रे

  • दिल्ली
  • अजमेर
  • आग्रा
  • लाहोर
  • मुलतान
  • मुर्शिदाबाद
  • जौनपूर

10 of 16

भारतातील प्रमुख शैक्षणिक आयोग / समित्या

  1. क्र

आयोग/समित्या

स्थापना वर्ष

शैक्षणिक आयोग व समित्यांचे कार्य

१.

लोकशिक्षण समिती

१८२३

भारतीय शिक्षण

२.

मेकॉले समिती

१८३५

भारतीय शिक्षणात इंग्रजी भाषेचा समावेश (शिक्षणाचा पाझर सिद्धांत)

३.

वूडचा खलिता

१८५४

समग्र भारतीय शिक्षण (भारतीय शिक्षणाची सनद)

४.

हंटर कमिशन

१८८२

भारतातील शैक्षणिक विकासाचा आढावा (भारतातील पहिला शिक्षण आयोग)

५.

सिमला शिक्षण परिषद

१९०१

प्राथमिक शिक्षण ते विद्यापीठ स्तरावरील शिक्षणावर चर्चा

11 of 16

६.

भारतीय विद्यापीठ आयोग

१९०२

विद्यापीठ शिक्षण (ज्ञानाच्या कक्षा वाढविणे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे.)

७.

कर्झनचे शैक्षणिक धोरण

१९०४

भारतीय प्रशासकीय पद्धतीत आणि भारतीय विद्यापीठ सुधारण कायदा

८.

गोखलेंचा ठराव

१९१०

प्राथमिक शिक्षण हे सर्व देशातून मोफत आणि सक्तीचे असावे.

९.

कलकत्ता विद्यापीठ आयोग (सॅडलर आयोग)

१९१७

विद्यापीठातील परिस्थिती आणि भवितव्य या विषयी चौकशी करणे.

१०.

हरटॉग समिती

१९२९

भारतातील शैक्षणिक परिस्थितीचा आढावा

११.

अॅबोट वूड

१९३६

व्यावसायिक व सर्वसामान्य शिक्षण, शारीरिक शिक्षण

१२.

स्वामी कुवल्यानंद

१९३६

शारीरिक शिक्षण

१३.

डॉ. झाकीर हुसेन

१९३७

वर्धा शिक्षण योजना (मूलोद्योगी

शिक्षण)

12 of 16

१४.

बी. जे. खरे समिती

१९४०

समग्र भारतीय शिक्षण

१५.

सार्जंट अहवाल

१९४४

भारतातील युद्धोत्तर शैक्षणिक प्रगती

१६.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण

१९४८-४९

भारतातील विद्यापीठ शिक्षण

१७.

जी. बी.जगर

१९४८

संगीत शिक्षण

१८.

ताराचंद

१९४८

माध्यमिक शिक्षण (केंद्रीय

शिक्षण सल्लागार)

१९.

बी. जी. खेर

१९४८

भारतातील शैक्षणिक विकासास

अर्थसाहाय्य

२०.

डॉ. यार लक्ष्मणशास्त्री मुदलियार

१९५२

माध्यमिक शिक्षण आयोग

२१.

के.एल. श्रीमाली

१९५४

ग्रामीण भागातील उच्च शिक्षण

समिती

13 of 16

२२.

जी. रामचंद्रन

१९५६

मूलभूत शिक्षण प्रशिक्षण समिती

२३.

पी. डी. शुक्ला

१९५७

प्राथमिक शिक्षण

२४.

ए. एल. मुदलियार

१९५७

उच्च शिक्षण (बनारस विद्यापीठ

चौकशी)

२५.

सुनितीकुमार चटर्जी

१९५६-५७

संस्कृत शिक्षण (संस्कृत

आयोग)

२६.

जे. पी. नाईक

१९५८

एकसूत्रीकरण समिती

२७.

दुर्गाबाई देशमुख

१९५८-५९

राष्ट्रीय स्त्री शिक्षण समिती

२८.

ए. श्रीप्रकाश

१९५९

धार्मिक व नैतिक शिक्षण समिती

२९.

हृदयनाथ कुंझरू

१९५९

शारीरिक शिक्षण व मनोरंजन युवक कल्याण

14 of 16

३१.

हंसा मेहता

१९६१

मुले व मुलींसाठी भिन्न

अभ्यासक्रम

३२.

डॉ. संपूर्णानंद

१९६१

भावनिक एकात्मता समिती

३३.

जी. एस. महाजनी

१९६२

महाविद्यालयीन शिक्षण

३४.

एम भक्तवत्सलम

१९६३

ग्रामीण भागातील स्त्री शिक्षण

३५.

कोठारी आयोग

१९६४-६६

शिक्षणाचा सर्वांगीण विकास (१० + २ + ३ शैक्षणिक

आकृती)

३६.

के. जी. सय्यद्दीन

१९६६

शालेय पाठ्यपुस्तक समिती

३७.

चित्रा नाईक

१९६५-६६

शिक्षण प्रशिक्षण समिती

(महाराष्ट्र शासन)

३८.

डॉ. त्रिगुणासेन

१९६८

१९६८ च्या शैक्षणिक धोरणाचा

अहवाल

15 of 16

३९.

जी. रामचंद्रन

१९७०

समग्र भारतीय शिक्षण / सर्व स्तरावरील परीक्षा

४०.

पी. डी. शुक्ला

१९७२

शिक्षणाचा आकृतिबंध

४१.

टी. डी. शुक्ला

१९७६

एन. सी. ई. आर. टी.

४२.

ईश्वरभाई पटेल

१९७७

अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक परीक्षण समिती

४३.

पार्वतीबाई मलगोंडा

१९८४

शालेय शिक्षण सुधारणा समिती (महा.)

४४.

नवीन राष्ट्रीय शै.धोरण

१९८६

समग्र भारतीय शिक्षण

४५.

आचार्य राममूर्ती

१९९०

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण परीक्षण समिती.

४६.

आर. एच. दवे

१९९१

किमान अध्ययन पातळी ठरविण्यासाठी नेमलेली समिती.

16 of 16

४७.

जनार्दन रेडी

१९९२

१९८६ च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण परिक्षण समिती.

४८.

प्रा. राम मेघे

१९९२

प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण समस्या व उपाय

योजना

४९.

प्रो. यशपाल

१९९३

ओझ्याविना अध्ययन

५०.

राम जोशी

१९९६

राज्यस्तरीय बालशिक्षण समिती.

५१.

आर. पी. रस्तोगी

१९९७

विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकांच्या वेतन श्रेणीची पुनर्रचना समिती.