1 of 1

१) ‘लिळाचरित्र’हे कोणाचे चरित्र आहे?

अ)श्रीगोंविदप्रभू ब) श्रीचक्रधरस्वामी क) श्रीकृष्ण ड) श्रीदत्तात्रय

२) ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ कोणत्या ग्रंथावरील भाष्य आहे?

अ) गीता ब) भागवत क) रामायण ड) महाभारत

३)मराठी भाषेतील पहिले पदयमय चरित्र कोणते आहे?

अ)ज्ञानेश्वरचरित्र ब)लीळाचरित्र क) गोविंदप्रभू चरित्र ड) स्मृतीस्थळ

४) ‘ताटीचे अभंग’ कोणत्या संताचे आहेत?

अ)संत ज्ञानेश्वर ब) संत मुक्ताबाई क)संत कान्होपात्रा ड) संत जनाबाई

५)संत ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ कोठे लिहिला ?

अ) नेवासे ब)आळंदी क) काशी ड) पैठण

६)‘वचन साहित्य’ कोणत्या भाषेत आहे?

अ)तेलगू ब) आसामी क) तमिळ ड) कन्नड

७) ‘अनुभव मंटप’ ची स्थापना कोणी केली?

अ)जातवेदमुनी ब) महात्मा बसवेश्वर क) नागलांबिका ड) मादिराज

८)संत एकनाथांचे पहिले आख्यानकाव्य कोणते?

अ) सीता स्वयंवर ब) रूक्मिणी स्वयंवर क) भावार्थ रामायण ड) यापैकी नाही

९) संत वाटिकेतील जाईची वेल’ म्हणून कोणत्या संत कवयित्रीचा उल्लेख केला जातो?

अ)संत कान्होपात्रा ब)संत जनाबाई क) संत मुक्ताबाई ड) संत बहिणाबाई

१०)संत एकनाथांच्या गुरूचे नाव काय होते?

अ) जातवेदमुनी ब) संत भानुदास क) जनार्दन स्वामी ड) केशवचैतन्य