1 of 87

समृद्धी बजेट (TOT)

रोहयोतून समृद्धीकडे ...

2 of 87

प्रशिक्षण स्वरूप ...

  • TOT प्रशिक्षण
  • पुढील प्रशिक्षण नियोजन
  • सुलभक म्हणून अपेक्षा

3 of 87

दिवस पहिला समृद्धी समजून घेवू....��

  • उदिष्टे
  • समृद्धी म्हणजे काय ते सांगतात.
  • कुटुंब समृद्धी आणि गाव समृद्धी यातील फरक सांगू शकतील. तसेच एकमेकांशी कसे पूरक आहेत हे सांगतील.
  • समृद्धी बजेट का करायचे हे सांगतात.

4 of 87

VIDEO पाहून काय मत तयार झाले?

  • मी समृद्ध तर गाव समृद्ध (video क्रमांक एक,दोन, तीन, सहा, व सात.)
  • काय मत तयार झाले दोन लोकांना शेयर करण्यास सांगणे.
  • गाव समृद्ध तर मी समृद्ध ( video क्रमांक चार, पाच, व आठ.)
  • काय मत तयार झाले दोन लोकांना शेयर करण्यास सांगणे.
  • मी आणि गाव समृद्धी या दोन्ही मध्ये काय फरक आहे ?

5 of 87

VIDEO बाबत चिंतन प्रश्न ....

  • कोणता video आवडला ? Video मध्ये साधलेली प्रगती आपल्या कार्यक्षेत्रातील लोकांना साधता येवू शकते का ? Video मध्ये असलेल्या लोकांनी समृद्धी साठी काय केले असेल ?
  • आपल्या कार्यक्षेत्र किंवा परिसरात video मध्ये दाखवल्या प्रमाणे अधिक नफा कमावणारे लोक आहेत का ? आधी ते श्रीमंत नव्हते पण आता तुलनेने अधिक पैसे कमवले आहेत ? ( होय किंवा नाही असा प्रतिसाद मेसेज ने द्यावा.
  • रोहयो मधून अशी समृद्धी आणायला मदत होईल का ? ( चिंतन करा. अर्धा मिनिट वेळ.)
  • रोहयो मधून काय अपेक्षित आहे ? फक्त काम उपलब्ध करून देणे कि मत्ता निर्मिती करून समृद्धी आणणे.

6 of 87

समृद्धी म्हणजे काय ?

  • समृद्धी हा शब्द मोघम आहे, प्रत्येकाची समृद्धीची व्याख्या वेगवेगळी असू शकते.
  • आपण समृद्धीला कसे परिभाषित करत आहोत ?
  • समृद्धी म्हणजे....प्रत्येक कुटुंबाने प्रतीवर्षी खर्च वजा जाता एक लाख रुपये नफा कमविणे.
  • समृद्धी म्हणजे ‘प्रत्येक कुटुंब लखपती कुटुंब’ अशी समृद्धीची परिभाषा केली आहे.
  • लखपती कुटुंब हि समृद्धीची दुसरी पायरी आहे. पहिली पायरी मोबाईल पती , दुसरी पायरी लखपती आणि तिसरी पायरी कारपती.

7 of 87

प्रत्येक कुटुंब लखपती होवू शकते का ?� प्रतिवर्षी एक लाख रुपये कमविणे हि अशक्यप्राय बाब आहे का ?�

  • चला प्रत्येक कुटुंब लखपती होण्याचा आधार शोधूया....
  • राज्याचे प्रतिव्यक्ती सरासरी उत्पन्न दोन लाख एकोणवीस हजार रुपये आहे. आपण फक्त प्रती कुटुंब एक लाख रुपये प्रती वर्ष निव्वळ नफा म्हणत आहोत.
  • पाणी foundation हि गावांसाठी काम करणाऱ्या संस्थेने स्पर्धेतील सहभागी शेतकऱ्यांना प्रती एकर प्रती वर्ष एक लाख रुपये निव्वळ नफा हे उदिष्ट ठेवले आहे.
  • अमेरिका सारखे किमान पन्नास देश आहेत जिथे प्रती व्यक्ती कार (चार चाकी वाहन) उपलब्ध आहे. याचा अर्थ त्यांचे वार्षिक निव्वळ नफा तीन चार लाखाच्या वर असणार आहे.

8 of 87

प्रत्येक कुटुंबाला लखपती कसे करता येईल?

  • प्रत्येक कुटुंबाला समृद्ध ( लखपती ) करायचे असेल तर काय आणि कसे काम केले पाहिजे हे समजून घेणे महत्वाचे आहे.
  • वर्षानुवर्ष मागेल त्याला काम इथपर्यंत मर्यादित न राहता प्रत्येक कुटुंबाला समृद्धी आणि समृद्धी साठी पाहिजे ते काम याकडे आता आपल्याला जावे लागणार आहे.
  • समृद्धी साठी संसाधने महत्वाचे आहेत परंतु त्य सोबतच आणखी काय महत्वाचे असेल ? ( मेसेज टाकावा.)
  • ज्ञान, व्यवसायिक कोशल्य महत्वाची आहेत का ? निर्माण झालेल्या मत्तेचा योग्य उपयोग केला तर समृद्धी येईल. त्यासाठी फक्त मत्ता निर्माण करून थांबता येणार नाही तर निर्माण झालेल्या मत्तेतून प्रत्येक कुटुंबाला लखपती कसे करता येईल याची जबाबदारी रोहयोने घेणे गरजेचे आहे. शिकण्यासाठी आधी मोबाईल पती व्हावे लागेल.

9 of 87

प्रत्येक कुटुंबाचा विचार.....व्यवसायाच्या अनुषंगाने कुटुंब रचना समजून घेवू...

  • एखादे गाव समृद्ध करायचे असेल तर त्या गावातील प्रत्येक कुटुंब समृद्ध करावे लागणार आहे. यासाठी आपल्याला गावातील व्यवसायिक कुटुंब रचना व आर्थिक स्तिथी समजून घ्यावी लागेल. प्रत्येक कुटुंबाचे वर्गीकरण करावे लागणार. कुटुंबाची रचना पाहता प्रामुख्याने गावा मध्ये चार प्रकारचे कुटुंब असतात.
  • भूमिहीन शेतमजूर कुटुंब
  • शेतकरी कुटुंब
  • व्यावसायिक कुटुंब
  • नोकरदार कुटुंब

10 of 87

शेतकरी कुटुंब लखपती करूया....

  • १.शेतकऱ्याकडे किती क्षेत्र (Area) आहे? त्यातिल किती ओलीताखाली आहे. २.पाण्याचा स्त्रोत कोणता आहे. 3शेतीसोबत कोणता जोडधंदा आहे का ? कोणता करू इच्छिता ४.सध्या शेतात कोणते पिक घेताय ? किती एकर मध्ये ? ५.वर्षभर शेताला पाणी मिळेल यासाठी काय करता येईल ? ६.मागिल वर्षीचे उत्पन्न किती ? वाढवण्यासाठी काय करता येईल. ७.आपण आपल्या शेतीत काही नविन प्रयोग करता आहात का ? नविन पिक पध्दती द्यायला आवडेल का ?
  • (शरद चंद्र पवार ग्राम समृद्धी शाषण निर्णय).
  • शेती करणाऱ्याला लखपती करायचे असेल तर त्यांना ते सध्या काय करतात, कुटुंबाचे उत्पादन किती आहे? कसे मिळवतात? रोहयोच्या कोणत्या बाबी दिल्यास त्यांचे कुटुंब लखपती होईल. १.शेततळे २.नाडेप ३.गोठा ४.विहीर ५.शोषखड्डे 6.फळबाग ७.फुलबाग अशाप्रकारे २६२ कामांच्या यादीतून वैयक्तिक जे काम घेऊ शकतो ते गर्जे प्रमाणे व पात्रते प्रमाणे package तयार करणे. लाभ देतांना वैयक्तिक पातळीवर ६०:४० चे प्रमाण राखता येणार आहे.
  • असे करता येते का ? याआधी कुणी केले आहे का?

11 of 87

ओझर गावचे नियोजन....

  • प्रतिक पाटील यांनी केलेले शेतकरी कुटुंब निहाय नियोजन पाहू.
  • कुटुंब इतिहास...सध्या काय करतात ? कोणती पिके घेतात? उत्पन्न किती आहे?
  • लखपती होण्यासाठी ते कुटुंब काय करू शकते? पिक पद्धतीत बदल? सिंचन शेती?
  • इतर शेतीपूरक व्यवसाय ....
  • इतर जोड धंदे...
  • रोहयो मधून कोणती मदत मिळवता येईल. लखपती होण्याची शाश्वती.

12 of 87

मजूर कुटुंबाला लखपती करूया...

मजूर कुटुंबाचे रूपांतर व्यावसायिक कुटुंब किंवा शेतकरी कुटुंब यामध्ये रुपांतर करू शकलो तरच मजूर कुटुंबाला लखपती करता येईल. मजूर कुटुंबांना त्यांच्या समृद्धी साठी उपयुक्त अशे लाभ दिले तर नक्कीच मजूर कुटुंब समृद्ध होऊ शकते.

उधारनार्थ :

  • मजुरी साठी नाही तर स्व:मत्ता निर्मितीसाठी काम ...( व्यवसायिक कौशल्य प्राप्त करण्यास पात्र)
  • १. नाडेप कंपोस्ट २.जनावराचा गोठा- ( कारंजा येथील उदा.) ३.कुकुटपालन शेड ४. शेळीपालन शेड ५.वर्मी कंपोस्ट ६. hydroponic fodder
  • आणखी कोणत्या योजना देता येतील? २६२ योजनांचा अभ्यास.
  • जमीन – जागा नसेल तर काय? ६०:४० चे प्रमाण कसे राखावे?

13 of 87

व्यावसायिक कुटुंबाला लखपती करूया...

  • करत असलेल्या व्यवसायासाठी सुविधा.
  • नवीन व्यवसाय सुरु करण्यास रोहयोची मदत.
  • गट स्थापन करून व्यवसाय वाढविणे.
  • २६२ पैकी कोणती मदत व्यवसाय वाढीसाठी करता येईल.
  • व्यावसायिक कौशल्य विकास प्रशिक्षणे.

14 of 87

गाव समृद्ध करतांना ....

  • ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध, गाव समृद्ध तर मी समृद्ध.’
  • आता आपण असे समजू कि गावातील प्रत्येक कुटुंब समृद्ध झाले, आता प्रत्येक कुटुंब समृद्ध झाले तर गाव समृद्ध झाले असं आपण म्हणू शकतो का? ( उत्तर कंमेंट बॉक्स मध्ये करा)
  • तर त्याचे उत्तर हो आणि नाही असे दोन्हीही असू शकते. उदाहरण बघा— गावातील प्रत्येक शेतकरी जास्त उत्पादन घेत आहे पण बाजार पेठ पर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही. जे उत्पादन घेतले त्यला आज बाजार भाव नाही, तर त्या पिकांचे काय होईल ? त्या पिकाला अधिक पैस्यामध्ये रुपांतर करायचे झाल्यास गावात प्रत्येक शेतात जाता येईल असे रस्ते तयार करावे लागतील, तयार झालेला माल साठवण्यासाठी गोडाउन असल्यास अश्या अडचणचीनवर मात करता येऊ शकते. ह्या साठी आपल्याला सार्वजनिक कामे करावी लागतील त्याने गाव समृद्धी होईल. आणि याचा फायदा कुटुंबाला पण होणार आहे.

15 of 87

गाव समृद्ध करतांना ....

गावातील प्रत्येक घटक समृद्धी मध्ये सहभागी आहे का याची खात्री करणे. सहभागी करून घेण्यासाठीचा विचार –

16 of 87

गाव समृद्ध करतांना ....

परिसरातील समृध्द असलेल्या गावांबाबत माहिती मिळविणे , भेट देणे.

शिकण्याची प्रक्रिया हे वाचन साहित्य अभ्यासण्यास देणे.

17 of 87

गाव समृद्ध करतांना ....

यामध्ये सर्वप्रथम गाव समृध्द करण्याकरिता गावातील भौतीक व आर्थिक परिस्थिती जाणुन घेणे. व अभ्यास करणे, गावातील रस्ते, शाळा / अंगणवाडी चा भौतीक विकास करणे. पोषण, आरोग्य, शिक्षण, पाणी पुरवठा दळणवळण , स्वच्छता, वृक्षलागवड, जल व मृदसंधारण कामे, शितगृह, शेत माल साठविण्यासाठी गोडाउन, पांदन रस्ते, इत्यादी बाबी का करावयात हे पटवून देणे.

  • यशस्वी लोकांकडून शिकणे....

18 of 87

गाव समृद्ध करतांना ....

  • गावाची पिक पध्दती जाणुन घेउन आवश्यकते बदल का करावेत हे पटवून देणे.
  • पिकांना पाणी देण्याच्या पध्दती जाणून घेवून व त्यांना पाण्याच्या प्रत्येक थेंबातुन अधिक उत्पन्न्‍ कसे मिळतील या बाबत माहिती पटवून देणे.
  • मातीच्या प्रत्येक कणातुन अधिक उत्पन्न्‍ कसे ‍मिळतील या बाबत मार्गदर्शन करणे व त्यांना पटवून सांगणे.
  • सेंद्रीय शेती करण्यास प्रोत्साहित करणे तसेच सेंद्रीय शेती चे महत्व पटवून देणे परिणामी रासायनीक शेतीचा ऱ्हास होईल व रासायनीक खतांचा खर्च कमी होईल व चांगल्या प्रकारचे पोषक धान्य मिळले व त्यामुळे आरोग्य निरोगी राहील व कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळेल हे पटवून देणे.

19 of 87

गाव समृद्ध करतांना ....शाश्वत विकास.

  • कायम लखपती राहायचे असेल तर काय करावे लागेल.
  • समृध्दी गावामध्ये शाळा व अंगणवाडी चा भौतीक विकास का महत्वाचा आहे. हे समजावून सांगणे म्हणजेचे गाव शैक्षणीक दृष्या समृध्द असेल तर येणाऱ्या पिढीला शैक्षणिक दृष्टीने प्रबळ करू शकतो. त्यामुळे येणाऱ्या पीढीला मजुरी करण्याची गरज भासणार नाही. आणी त्याचे व्यवहारीक ज्ञान वाढेल.
  • गावातील प्रत्येक कुटूंबाचे, पोषण, शिक्षण या मध्ये सातत्य कसे राखले जावू शकते हे पटवून देणे. गावातील सांडपाणी व्यवस्थापन करणे 100 % कुटूंबांना नरेगातुन शोषखडडे घेणे शोषखडडे मुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढ होण्यास मदत होईल. तसेच गावातील लोकांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. त्यासाठी गावांमध्ये शोषखडडे घेणे.

20 of 87

गाव समृद्ध करतांना ....

  • गावामध्ये वृक्षलागवड केल्यास गापातील प्रदुषित हवामानात बदल होण्यास मदत होईल व गाव सुशोभित होईल हे पटवून देणे.
  • गावात शेत माल साठवणूकिची व्यवस्था असल्यास शेतकऱ्याला हव्या त्या वेळी व हमी दराने माल विकता येउ शकतो त्यामुळे त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होवू शकते हे पटवून देणे.
  • गावात बाजारपेठ/ विपणन प्रक्रिया या बाबत माहिती पटवून देणे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून आर्थिक उत्पन्नात वाढ होईल व प्रवासाचा खर्च कमी होईल हे पटवून देणे.

21 of 87

गाव समृद्ध करतांना ....

पाउसाचे पाण्याचे योग्य नियोजन केल्यास पाण्याचा योग्य निचरा होवून जमिनीतील पाणी पातळीत वाढ होणे, शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध केल्यास प्रत्येक हंगामात जास्तीत जास्त पिके घेतल्यास उत्पन्न वाढीस मदत होईल तसेच सिंचनाच्या पध्दती म्हणजेच ठिंबक सिंचन तुषार सिंचन या सारख्या पध्दती अवलंबता येतील जणे करून पाण्याच्या प्रत्येक थेंबातुन जास्तीत जास्त उत्पन्न घेता येईल हे पटवून देणे.

22 of 87

गाव समृद्ध करतांना ....

  • गाव समृध्दी करिता स्थलांतर थांबविणे महत्वाचे आहे. परिणामी गावातच मजुरांची संख्या वाढेल, तसेच स्थलांतरीत मजुरांची आर्थिक पिळवणूक होणार नाही व त्यांच्या मुलांना गावातच योग्य शिक्षण, त्यांचे स्वास्थ चांगले राहण्यास मदत होईल.
  • ग्राम रोजगार सेवक यांनी अधिक काम केल्यास मानधनात वाढ होईल. परिणामी तो स्वत: समृध्द होईल त्यामुळे इतर ग्राम रोजगार सेवक प्रोत्साहित होवून त्याचे अनुकरण करतील.
  • ग्राम रोजगार सेवक याचे मानधन आणि समृद्ध कुटुंब व समृद्ध गाव याचा संबध तिसऱ्या दिवसाच्या सत्रामध्ये सविस्तर पाहणार आहोत...

23 of 87

गाव समृद्ध करतांना ....

  • गावात मत्ता निर्माण करून गावाच्या समृद्धी आणि सौदार्यामध्ये भर घालणारे कामे.

1.शाळा, अंगणवाडी चे नियोजन 2. शिक्षण

3.पोषण 4. गावातील अंतर्गत रस्ते

5.सांडपाणी व्यवस्थापन 6. पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय

7.गावांमध्ये वृक्षलागवड 8. शेतमाल साठवणुकिच्या सोई

9.पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापण 10. गाव सुशोभित करणे.

11. मृद संधारण व जलसंधारण कामे 12. सिंचन पध्दती

13. सेंद्रीय शेती 14. स्थलांतर

15. बाजारपेठ

24 of 87

कुटुंब आणि गावाची समृद्धी आणायची असेल तर आता लेबर बजेट तयार करावे कि समृद्धी बजेट?

लेबर बजेट

समृद्धी बजेट

1)लेबर बजेट हे रोजगाराच्या हमी साठी बनवले जायचे.

समृद्धी बजेट हे लखपती बनन्यासाठी आणि त्यातून समृद्धी मिळविण्यासाठी बनवले जाणार आहे.

2) लेबर बजेट हे ग्रामपंचायत केंद्रस्तानी ठेवून गाव वीकास या संकल्पनेवर आधारीत होते.

2) समृद्धी बजेट हे कुटूंबाला केंद्रस्तानी ठेवून "मी समृद्ध तर गाव समृद्ध, गाव समृद्ध तर मी समृद्ध, पर्यायाने माझा महाराष्ट्र समृद्ध" ह्या धोरणे वर आधारित असून “कुटुंबाची समृद्धी”या संकल्पनेवर आधारीत आहे.

25 of 87

कुटुंब आणि गावाची समृद्धी आणायची असेल तर आता लेबर बजेट तयार करावे कि समृद्धी बजेट?

3) लेबर बजेट मध्ये “मागेल त्याला काम” म्हणजेच रोजगाराची हमी होती.

3) समृद्धी बजेट मध्ये “पाहिजे ते काम” म्हणजेच लखपती होण्यासाठी काम घ्याची हमी आहे.

4) लेबर बजेट मध्ये रोजगार हमी सोबत जल संधारण व मृद संधारण है मूख्य हेतू होते.

समृद्धी बजेट मध्ये लखपती कुटुंब आणि ते लखपती बनत असताना होणारे जल व मृदसंधारण हे मुख्य हेतू आहेत.

26 of 87

कुटुंब आणि गावाची समृद्धी आणायची असेल तर आता लेबर बजेट तयार करावे कि समृद्धी बजेट?

5) लेबर बजेट चे मुल्यमापण मनुष्य दिन ने केला जातो.

समृद्धी बजेट चे मूल्यमापन हे लखपती कुटूंब व तयार होणाऱ्या मत्ते ने केले जाणार आहे, ते करत असताना मनुष्य दिन निर्माण होणार आहे.

6) लेबर बजेट मध्ये मागणी आली तर काम देण्यात यायचे

समृद्धी बजेट मध्ये लखपती होण्यासाठी पाहिजे ते काम देण्यात येणार आहे. त्याची पूर्तता करतांना कामाची मागणी येणारच आहे.

27 of 87

कुटुंब आणि गावाची समृद्धी आणायची असेल तर आता लेबर बजेट तयार करावे कि समृद्धी बजेट?

7) लेबर बजेट मधे लाभार्थी यंत्रने कडे जायचे.

समृद्धी बजेटमध्ये यंत्रना लाभार्थी पर्यंत पोचनार.

8) लेबर बजेट मध्ये फक्त उदरनिर्वाह साठी मनरेगा ची कामे करणे हि मानसीकता

समृद्धी बजेट मध्ये सन्मानाने समृद्धी मीळवण्यासाठी व समृद्ध होण्यासाठी काम हा मानसिकतेत आमूलाग्र बदल

28 of 87

चला तर मग समृद्धी बजेट तयार करूया त्यासाठी एक स्वाध्याय पूर्ण करू.....

  • स्वाध्याय –

आपल्या कार्यक्षेत्रातील एक मजूर कुटुंब निवडा (भूमिहीन) व एक शेतकरी कुटुंब निवडा दोन्ही कुटुंबाशी बोला त्यांचा इतिहास ( व्यवसाय स्वरूप, आर्थिक स्तिथी, कौटुंबिक स्तिथी ) अभ्यासून ते लखपती होण्याचे नियोजन करा. त्यांना लखपती करतांना रोहयोची कशी मदत होऊ शकते.

29 of 87

सर्वांचे स्वागत ....

दिवस दुसरा

30 of 87

समृद्धी बजेट तयार करतांना....

सत्राची उद्दिष्ट्ये-

  • समृध्दी बजेट तयार करतांना बजेट पूर्व जाणीव -जागृती, प्रचार व प्रसार करतात.
  • समृद्धी बजेट बनवण्याची/नियोजनाची प्रक्रिया सांगतात.
  • १०० टक्के कुटुंब आणि गावाचा शाश्वत विकासावर केंद्रित करून समृद्धी बजेट तयार करतो.

31 of 87

कालच्या स्वाध्यायावर बोलूया...

काल आपण दोन कुटुंबासोबत बोललो आहोत. त्यांना लखपती करण्यासाठी रोहयो काय मदत करू शकते ? याचे नियोजन आपण केले आहे.

  • कालचे काम केल्यानंतर काय मत तयार झाले आहे ?
  • काय अनुभव आला ?
  • तीन लोकांचे मत ऐकू... संकलन.

32 of 87

समृद्धी बजेट पूर्व नियोजन....

समृद्धी बजेट तयार करण्यासाठी कोणती पूर्वतयारी करावी लागेल ? हा प्रश्न विचारून सहभागींचा प्रतिसाद घेणे.

( मेसेज करून प्रतिसाद देतील.)

33 of 87

लोकांशी काय बोलावे....

  • गाव पातळीवरील नियोजन
  • १. १०० टक्के कुटुंबापर्यंत रोहयोची माहिती गेली का ?
  • २.. २६२ योजना काय आहेत हे गावातील १०० टक्के लोकांना माहित होणे.
  • ३. आपण लखपती होऊ शकतो हा विश्वास येण्यासाठी आठ video गावातील सर्व कुटुंबाना दाखविणे.
  • ४. प्रत्येक कुटुंबाला लखपती व्हायचे असेल तर कुटुंबाने काय करायला हवे याबाबत कुटुंबाशी बोलणे
  • ५. लखपती होताना रोहयोच्या कोणत्या योजनेची आवश्यकता आहे हे निश्चित करणे.

34 of 87

लोकांशी काय बोलावे....

२६२ योजनांचे वर्गीकरण करून सर्वांपर्यंत पोहचवणे.

१. शेतकरी लाभाच्या योजना.

२. मजूर कुटुंबाना लाभाच्या योजना

३. गटांना लाभाच्या योजना

४. सार्वजनिक लाभाच्या योजना

५. इतर योजना

35 of 87

लोकांशी काय बोलावे....

रोहयो मध्ये झालेले बदल.

  • लखपती कुटुंब होण्यासाठी समृद्धी योजना संच (एका पेक्षा जास्त योजना देण्यावर भर )

शरदचंद्र पवार ग्राम समृद्धी योजना

  • मागेल त्याला काम सोबत पाहिजे ते काम.
  • प्राधान्यक्रमानुसार गावातील १०० टक्के कुटुंबांचा विचार.
  • लेबर बजेट नाहीतर समृद्धी बजेट.

36 of 87

रोहयो वर का काम करायचे?

मजुरी कुठे अधिक मिळते ? रोहयोचे २४८ जास्त कि इतर ठिकाणी मिळणारे ३०० जास्त.

रोहयो २४८

इतर ठिकाणचे ३०० -४००

फक्त २४८ नाहीतर इतर लाभाच्या योजना

फक्त मजुरी मिळणार

१०० दिवस केंद्र्शाषण व त्यापुढे राज्याशाषण काम देणार

पूर्ण वेळ काम मिळणार नाही.

तुम्ही आहात तिथे काम

घर सोडून जावे लागेल.

पतीपत्नी दोघांना समान काम समान वेतन

२४८+२४८= ४९६

पतीपत्नी दोघांना सारखी मजुरी नाही.

३००+१५०= ४५०

हवे तेंव्हा हवे तेवढे काम ( वेळेचे बंधन नाही )

मालक सांगेल ते काम ( वेळेसह अनेक बंधने)

37 of 87

रोहयो वर का काम करायचे?

  • लखपती होण्यासाठी ...फक्त २४८ रुपये मजुरीसाठी नाहीतर वयक्तिक लाभाची योजना घेण्यासाठी काम करायचे.
  • मी शारीरिक श्रम करून केलेल्या कामामुळे तयार झालेला अकुशल मला कुशल जास्त असणारी योजना घेताना मदत करणार आहे. मला कायम रोहयोचे काम करायचे नसून लखपती व्हायचे आहे.
  • मी रोहयोचे काम केल्यास गावात मोठ्याप्रमाणात अकुशल तयार होणार आहे ज्याचा फायदा गावाला आणि गावातील कुटुंबाना होणार आहे.
  • मला कामाची गरज नसेल तर मी श्रमदान करून आलेल्या मजुरीतून लोककल्याण करणारी काम करू शकतो. ( पाणी foundation चे काम)

38 of 87

समृद्धी बजेट पूर्व नियोजन....

  • गावातील प्रत्येक कुटुंबाचे जॉब कार्ड काढले आहे का ?
  • प्रत्येक कुटुंबाचे स्वतंत्र जॉब कार्ड. ( जॉब कार्ड विभक्तीकरण )
  • जॉब कार्ड विभक्तीकरण का करायचे?

39 of 87

समृद्धी बजेट पूर्व नियोजन....

अपूर्ण कामे पूर्ण करणे...

  • अपूर्ण का आहे ते समजून घेवू.
  • मजूर किंवा लाभार्थी पातळीवर अडले असेल तर संवाद साधून महत्व पटवून देणे.
  • स्वतः लखपती होणे किंवा गावातील कुटुंब लखपती होण्यासाठी अपूर्ण कामे पूर्ण करणे कसे महत्वाचे आहे.
  • यंत्रणा पातळीवर अडचण असेल तर पाठपुरावा करणे.
  • वरिष्ठांची मदत घेणे.

40 of 87

मला लाभ घ्यायचा असेल तर काय करावे लागेल?

  • लखपती होतांना कोणत्या योजना घ्यायची हे ठरविणे.
  • सदर योजनेसाठी आवश्यक पात्रता.
  • कोणती कागद पत्रे लागणार आहेत.
  • माझे जॉब कार्ड काढले आहे का?
  • जॉब कार्ड विभक्त केले आहेका?
  • कुशल ची योजना घेतांना ६०:४० चे प्रमाण राखण्यासाठी आणि मी लखपती होण्यासाठी अकुशल च्या कोणत्या योजना घ्यायला हव्या.

41 of 87

समृद्धी बजेट प्रचार - प्रसार

डिजीटल माध्यम

१. What’s App चा उपयोग

२. Facebook चा उपयोग

३. YOU TUBE चा उपयोग

४. पोस्टर किंवा जाहिरात तयार करणे.

42 of 87

समृद्धी बजेट प्रचार - प्रसार

प्रत्यक्ष संवाद माध्यम

  • गृह भेटी लोकप्रतिनिधी बैठका.
  • प्रभातफेरी स्वयंसेवी संस्थांची मदत.
  • कॉर्नर सभा, सभा. तरुण मंडळांची मदत.
  • दवंडी देणे भजन मंडळ, बचत गटाची मदत.
  • ध्वनी यंत्रणा उपयोग सार्वजनिक मंडळे यांची मदत.

43 of 87

समृद्धी बजेट प्रचार - प्रसार

अधिकारी / कर्मचारी यांचा सहभाग

१. ग्रामपंचायत कर्मचारी यांचा सहभाग २. अंगणवाडी सेविका

३. आशा वर्कर ४. शाळा / शिक्षक

५. कृषी सहायक 6. आरोग्य कर्मचारी

७. तलाठी ८. सामाजिक वनीकरण

९. फोरेस्ट १०. इतर कर्मचारी

44 of 87

समृद्धी बजेट पूर्व बैठका

  • ग्रामपंचायत बैठक
  • गाव पातळीवरील सर्व अधिकारी यांची एकत्रित बैठक
  • इतर आवश्यक बैठका

45 of 87

समृद्धी बजेट

चला समृद्धी बजेट तयार करूया....

46 of 87

VIDEO चर्चा ...

  • पाणी फाउंडेशनचा शिवार फेरी आणि त्या माध्यमातून कामांची निवड करण्याबाबतचा विडिओ.
  • लेबर बजेट शासन निर्णय २०२० २६२ अनुज्ञेय कामांची यादी

चिंतन प्रश्न

    • यापूर्वी लेबर बजेट तयार करतानानागरिकांचा सहभाग घेण्यात येत होता का?
    • यापूर्वीची लेबर बजेट तयार करण्याची प्रक्रिया सर्वसमावेशक होती का?
    • यापूर्वी समृद्धी हा घटक नियोजनात महत्वपूर्ण/केंद्रस्थानी होता का ?

47 of 87

१. सर्वेक्षण...

सर्वेक्षणाचे महत्व-

  • प्रत्यक्ष भेटी
  • सुयोग्य माहितीचे संकलन
  • १०० कुटुंबाचे सर्वेक्षण

प्रत्यक्षात सर्वेक्षण करताना ३ घटक विचारात घ्यावे.

  • शेतकरी/मजूर/व्यावसायिक (कुटुंब)
  • वैयक्तिक / सार्वजनिक जमिनीवर मृद व जलसंधरणाची कामे
  • गावांचा विकास (शाळा/अंगणवाडी/गावातील इतर गरजा)

48 of 87

शेतकर्‍याचे/कुटुंबाचे सर्वेक्षण (गृहभेटी)

  • या सर्व प्रक्रियेत अंतिमतः शेतकर्‍याचे/कुटुंबाचे उत्पन्न वाढून त्याला लखपती करणे अपेक्षित आहे.
  • त्यासाठी मनरेगा अंतर्गत अनुज्ञेय २६२ कामापैकी कोणती कामे प्राधान्याने कोणाला द्यावी लागतील याचे नियोजन करणे आवश्यक आहे.
  • त्यासाठी एका ठिकाणी बसून आराखडा बनवण्यापेक्षा ज्याला समृद्ध/लखपती करायचे आहे त्याला भेट देऊन त्याच्याकडे सध्या असणारी संसाधने आणि लखपती करण्यासाठी मनरेगाच्या माध्यमातून आवश्यक असणारी कामेयाची निवड करावी लागेल.

49 of 87

चिंतन प्रश्न

  • प्रश्न- मनरेगाच्या माध्यमातून कोणत्या प्रकारची वैयक्तिक कामे/लाभ दिला जाऊ शकतो ? (२ प्रशिक्षणार्थीकडून उत्तरे घेतली जातील)

50 of 87

शेतकर्‍याला/कुटुंबाला भेट देऊन त्याची माहिती पुढील मुद्द्याच्या आधारे घेणे आवश्यक आहे

१. शेतकर्‍याचे नाव २. ग्रामपंचायत

३. गावाचे नाव ४. शेती धारण क्षेत्र (हेक्टर)

५. सध्या घेत असलेली पिके 6. वर्षात किती पिके घेतली जातात?

७. सध्याचे कृषिपासून मिळणारे वार्षिक उत्पन्न ८. कृषिसाठी लागणारा एकूण वार्षिक खर्च

९. कृषीपासून मिळणारा निव्वळ वार्षिक नफा १०. शेतीला पाणी देण्याची पद्धत

११. शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे का ? असल्यास कोणती?

51 of 87

शेतकर्‍याला/कुटुंबाला भेट देऊन त्याची माहिती पुढील मुद्द्याच्या आधारे घेणे आवश्यक आहे

१२. शेतापर्यंत जाण्यास/शेतमाल वाहतुकीसाठी रस्ता आहे का?

१३. शेतमाल साठवणूक करण्यासाठी गोदाम सुविधा उपलब्ध आहे का ?

१४. सध्या कोणते वैयक्तिक लाभ आवश्यक आहेत ?( मनरेगामध्ये अनुज्ञेय २६२ कामांपैकी वैयक्तिक कामाच्या यादीतून आवश्यक असलेली कामे निवडावी)

१५. जॉबकार्ड आहे का ? असल्यास जॉबकार्ड क्रमांक ?

१६. जोडधंदा आहे का ? कोणता ? त्यापासून मिळणारे उत्पन्न ?

१७. कोणती खते वापरता ?

१८. रोहयोमार्फत यापूर्वी कोणता लाभ मिळाला आहे?

52 of 87

शिवार फेरी

  • प्रश्न - यापूर्वी बनवलेल्या लेबर बजेटमधील कामांसाठी लोकेशन/स्थळ उपलब्ध नाही असे कधी झाले का ? [होय/नाही] (कॉमेंट बॉक्स मध्ये प्रश्नाचे उत्तर घेऊ)
  • जर कामासाठी स्थळ उपलब्ध नसेल तर अशा कामाचा समावेश लेबर बजेट मध्ये का केला ?
  • यापूर्वी लेबर बजेटची जी प्रक्रिया होती त्यात शिवार फेरी किंवा जिथे ही कामे घ्यायची आहेत त्या क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यावर भर नव्हता.
  • त्यामुळे बर्‍याच वेळा संबंधित अधिकारी/कर्मचारी एका ठिकाणी बसून जी कामे हवी आहेत त्याचा समावेश करायचे.
  • परंतु ही कामे प्रत्यक्षात करताना कामासाठी स्थळ उपलब्ध नसेल तर कामे घेता येत नव्हती. पर्यायाने लेबर बजेटमध्ये भरपूर कामे समाविष्ट असतांनाही फार थोडी कामे प्रत्यक्षात करण्यास वाव असायचा.

53 of 87

शिवार फेरी

  • कामांची निवड प्रत्यक्ष शिवार फेरी न करता केल्याने ‘माथा ते पायथा’ या संकल्पनेचा विचार केला गेला नाही. परिणामी जलसंधारणची कामे तांत्रिकदृष्ट्या योग्य होत नव्हती. त्यामुळे भरमसाठ कामे करूनही अपेक्षित परिणाम साधता येत नव्हता.
  • मनरेगा अंतर्गत ६० % खर्च अकुशल असेल तर ४० % कुशल खर्च करता येतो. त्यातून भौतिक विकासाची कामे करता येतात. परंतु शिवार फेरी न करता कामे घेतल्याने प्रत्यक्षात लेबर बजेट मोठे बनले तरी त्याचा उपयोग व्हायचा नाही.
  • कामे शेल्फवर नसल्याने अकुशल मजुरी रोजगार मिळण्यास अडचणी निर्माण व्हायच्या. त्याचा परिणाम अपेक्षित मनुष्यदिन निर्मितीवर व्हायचा आणि कमी मनुष्यदिन निर्माण व्हायचे.
  • अकुशल खर्चाचे प्रमाण कमी झाल्याने सहाजिकच त्या तुलनेत कुशल खर्चास कमी वाव मिळायचा. त्यामुळे सार्वजनिक विकासाची कामे आणि वैयक्तिक लाभाची कामे (ज्यामध्ये कुशल भाग जास्त असतो ) देण्यास अडचणी येतात.

54 of 87

शिवार फेरी

  • त्यामुळे शिवार फेरी करून प्रत्यक्षात कोणती कामे घेण्यास वाव आहे याचे नियोजन करावे लागेल.
  • यासाठी भूजल सर्वेक्षण विभागाने rechargepriorityarea चे नकाशे GSDA च्या website वर दिले आहेत, त्याचा अभ्यास करून कोणत्या क्षेत्रात कोणते जलसंधारणचे उपचार करता येतील हे निश्चित करावे.
  • यासाठी ‘माथा ते पायथा’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवावी. एखाद्या पाणलोट क्षेत्रात घ्यावयाच्या कामामध्ये सुरवातीला माथ्याकडील कामे आधी घ्यावी आणि नंतर पायथ्याकडील कामे क्रमाने घेण्यात यावी.

55 of 87

शिवार फेरी

  • ज्या ठिकाणी सपाट प्रदेश आहे आणि माथा ते पायथा नियोजन करण्यास कमी वाव आहे अशा ठिकाणी सार्वजनिक शेततळे, सार्वजनिक शोषखड्डे, सीसीटी, डीसीटी, जलशोषक चर, वृक्षलागवड अशी कामे घेऊन नियोजन करावे.
  • शिवार फेरी करताना सरपंच, ग्रामसेवक, रोजगार सेवक, तलाठी, कृषी सहायक, तांत्रिक अधिकारी, गावातील मनरेगा मजूर, शेतकरी, पोलिस पाटील, शिक्षक, इतर विभागांचे अधिकारी/कर्मचारी, बचतगट महिला,युवक हे मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून समृद्धी बजेट तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभाग देतील याची खात्री ग्रामसेवक आणि रोजगार सेवक यांनी करावी.
  • सोबत भूजल सर्वेक्षण विभागाने तयार केलेले rechargepriorityarea चे त्या गावचा नकाशा व मनरेगा अंतर्गत अनुज्ञेय २६२ कामापैकी मृद व जलसंधारणच्या १८१ कामांची यादीबाबत सर्व उपस्थितांशी चर्चा करून कामाची निवड करावी.

56 of 87

गावाचे सर्वेक्षण/गाव फेरी

  • कोणतेही गाव समृद्ध करताना त्या गावासाठी आवश्यक असणार्‍या भौतिक सुविधा/मत्ता निर्मिती होणे आवशयक असते.
  • यापूर्वी करण्यात असलेल्या लेबर बजेटमध्ये गाव फेरी करत नसल्याने गावच्या विकासाच्या गरजा लेबर बजेटमध्ये प्रतिबिंबीत होत नव्हत्या. त्यामुळे गावात मनरेगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासात्मक कामे होऊ शकली नाही.
  • तसेच शाळा/अंगणवाडीच्या परिसरात होऊ शकणारी कामे मनरेगामध्ये यापूर्वीच समाविष्ट असली तरी एकत्रित स्वरुपात ही कामे करावी अशा पद्धतीचा दृष्टीकोणाचा अभाव होता. यासाठी दि. १/१२/२०२० चा जैतादेहीपॅटर्नचा शासन परिपत्रक आले.
  • यामध्येसमाविष्ट शाळा-अंगणवाडीच्या परिसरात करता येणारी १३ प्रकारचीकामे निश्चित करण्यासाठी त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्यावी लागेल.

57 of 87

गावाचे सर्वेक्षण/गाव फेरी

  • गावफेरीच्या माध्यमातून गावासाठी आवश्यक असणार्‍या सुविधा जसे की रस्ते, नाली, गोदाम, पेविंग ब्लॉक, पाणंद रास्ते, बचतगटासाठी इमारत,ग्रामपंचायत भवन, बाजार ओटे, स्मशानभूमी, राजीव गांधी सेवा केंद्र,वृक्षलागवड, सार्वजनिक विहीर, सार्वजनिक शोषखड्डे अशा प्रकारचीकोणती कामे आवश्यक आहेत याची निवड करावी.
  • शाळा/अंगणवाडीला भेट देऊन त्या परिसरात रस्ते, नाली, संरक्षक भिंत, पेविंग ब्लॉक, किचन शेड, पाऊस पाणी संकलन, शोषखड्डा, शौचालय, अंगणवाडी इमारत, विहीर/बोअर पुनर्भरण, नाडेप/गांडूळ खत, खेळाचे मैदान, वृक्ष लागवड यापैकी प्रत्यक्षात आवश्यक असणार्‍या/होऊ शकणार्‍या कामांची निवड करण्यात यावी.
  • (वरील ३ उपघटक कुटुंब/शेतकर्‍यासाठी आवश्यक असणारी कामे, जलसंधारण कामे आणि भौतिक विकासाची सार्वजनिक कामे याच्या याद्या व प्रपत्र प्रत्यक्षात सर्वेक्षण करणार्‍या टीमला देण्यात येतील.)

58 of 87

माहीतीचे संकलन करणे

  • यापूर्वी करत असलेल्या लेबर बजेट मध्ये सर्वेक्षण यशस्वीपणे होत नसल्याने माहितीचे संकलन करण्यास अडचणी होत्या.
  • योग्य माहितीच्या अभावी योग्य नियोजन करण्यास मर्यादा येत होत्या.
  • परिणामी लेबर बजेट वास्तविक न बनता अवास्तव बनत होते व त्यात कुटुंबाच्या/गावाच्या/शेतकर्‍यांच्या गरजा प्रतिबिंबीत होत नव्हत्या.
  • त्यामुळे वरील प्रक्रिया (गृहभेटी, शिवार फेरी, गाव फेरी) करून विहित नमुन्यात योग्य डाटा/माहिती तयार करणे अत्यंत आवश्यक आहे. यातून आवश्यक असणार्‍या कामांची निवड करावी.

59 of 87

माहीतीचे संकलन करणे

  • त्या गावातील काम करणारे मजूर (अॅक्टिव मजूर) आणि वर्षातून द्यावयाच्या रोजगाराचे दिवस यांचा गुणाकार करून त्या गावासाठी किती मनुष्यदिन आवश्यक आहेत याचा विचार करावा.
  • उदा. एका वर्षात किमान ३०० दिवस रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल आणि त्या गावात १००० अॅक्टिव मजूर असतील तर १००० *३००= ३००००० मनुष्यदिन तयार करावे लागतील. जेणेकरून सर्व मजुरांना अपेक्षित रोजगारही मिळेल आणि वैयक्तिक.सार्वजनिक स्वरूपाची कामेही करता येतील. जर यापेक्षा कमी मनुष्यदिनाचे नियोजन केले तर सर्व मजुरांना काम देणे शक्य होणार नाही आणि आपणाला अपेक्षित कामेही करता येणार नाहीत. अकुशल खर्च कमी झाल्याने परिणामी कुशल खर्चास वाव कमी होईल. यापेक्षा जास्त नियोजन झाल्यास काम करण्यासाठी मजूर उपलब्ध होणार नाहीत परिणामी कामे अपूर्ण राहतील किंवा होणारच नाहीत.
  • कुटुंब/शेतकर्‍यासाठी आवश्यक असणारी वैयक्तिक लाभाची कामे, जलसंधारण कामे आणि भौतिक विकासाची सार्वजनिक कामे याचे एकत्रीकरण करावेआणि गावाचा एकत्रित समृद्धी आराखडा तयार करावा.

60 of 87

माहितीची छाननी/विश्लेषण करून समृद्धी बजेट तयार करणे

  • वरीलप्रमाणे एकत्रित झालेल्या माहितीवर रोजगार सेवक/ ग्रामसेवक/ सरपंच /नरेगा क्षेत्रिय अधीकारीयांच्या ग्रामस्तरीय समितीमार्फत चर्चा करून खालील बाबींची सुनिश्चिती करावी.
    • घेतलेली सर्वकामे मनरेगा मध्ये अनुज्ञेय आहेत.
    • प्रत्येक शेतकर्‍याला/कुटुंबाला भेट देऊन त्याचे योग्य नियोजन झाले आहे.
    • गावच्या विकासासाठी आवश्यक कामांचा अंतर्भाव बजेटमध्ये झाला आहे.
    • शाळा/अंगणवाडीच्या कामांचा समावेश समृद्धी बजेटमध्ये झाला आहे.
    • गावची मजूर क्षमता आणि वर्षभरात प्रत्येक मजुराला पुरवायचे कामाचे दिवस याचा ताळमेळ घालून योग्य मनुष्यदिनाचे नियोजन झाले आहे.
    • अकुशल आणि कुशल खर्चाचे प्रमाण ६०:४० झाले आहे.

61 of 87

माहितीची छाननी/विश्लेषण करून समृद्धी बजेट तयार करणे

  • ग्रामस्तरीय समितीने तयार केलेल्या समृद्धी बजेटची पंचायत समिती स्तरावर तहसिलदार/BDO/APO/EOP(विस्तार अधिकारी पंचायत)/PTO यांचे समिती मार्फत पडताळणी/छाननी करावी. तांत्रिक त्रुटी असल्यास दुरुस्ती सुचवावी व त्याप्रमाणे बदल करून घ्यावे.
  • तालुक्याचा एकत्रित ६०:४० प्रमाण राखले गेले असल्याबाबत तहसिलदार आणि गटविकास अधिकार्‍यानी खात्री करावी. ग्रामपंचायत स्तरावर हे प्रमाण कमी-जास्त झाले तरी तालुक्याच्या पातळीवर कुशल खर्चाचे प्रमाण ४० % पेक्षा जास्त जाऊ देऊ नये. जर तसे झाले असेल तर ज्या ग्रामपंचायतचे कुशल खर्चाचे प्रमाण ४० % पेक्षा जास्त झाले आहे त्यांच्या आराखड्यात योग्य ते बदल सुचवावे.
  • कुशल खर्चाचे प्रमाण जास्त असल्यास अशा ग्रामपंचायतमध्ये जास्त मनुष्यदिन निर्माण होणारे अकुशल कामे जसे की सीसीटी, डीसीटी, जलशोषक चर, वृक्षलागवड, शेततळे अशी कामे घ्यावी जेणेकरून कुशल खर्च जास्त असलेल्या कामात कपात न करता अधिक अकुशल खर्चामुळे त्या प्रमाणात कुशल खर्चाची मर्यादा वाढण्यास मदत होईल.

62 of 87

समृध्दी बजेटला मंजुरी प्रक्रिया

ग्रामसभा

  • गटविकास अधिकार्‍यांनी तालुक्यातील सर्व गावांच्या ग्रामसभेचा वेळापत्रक कार्यक्रम तयार करावे.
  • ग्रामसभेला समृद्धी बजेटची माहिती देण्यासाठी एका क्षेत्रीय अधिकार्‍याची नियुक्ती करावी.
  • सदर क्षेत्रीय अधिकार्‍यांने ग्रामसभेत लेबर बजेट व समृद्धी बजेटमधील फरक समजावून सांगून तयार करण्यात आलेल्या समृद्धी बजेटवर चर्चा घडवून आणावी.
  • ग्रामपंचायतीच्या समृध्दी बजेट ग्रामसभेच्या समोर वाचन होऊन आवश्यक कामांचा समावेश झाल्याबाबत खात्री करावी. ग्रामसभेने सुचवलेले बदल करावे. आणि ग्रामसभेची मंजुरी प्राप्त करावी.

63 of 87

समृध्दी बजेटला मंजुरी प्रक्रिया

पंचायत समिती

त्यानंतर 60 : 40 चे प्रमाण तपासून तसेच गावांच्या परिपूर्ण समृध्दी बजेटला पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेत चर्चा करून मान्यता प्राप्त करुन घ्यावी.

64 of 87

समृध्दी बजेटला मंजुरी प्रक्रिया

जिल्हा परिषद

  • जिल्हा परीषद स्तरावर पंचायत समीती स्तरावरील मंजुर समृध्दी बजेट जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेपूढे मंजुरीसाठी ठेवणे.
  • त्यांनंतर 60 : 40 चे प्रमाण तपासून परिपूर्ण समृध्दी बजेटला जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेची मान्यता प्राप्त करुन घ्यावी.
  • यानंतर समृद्धी बजेट जिल्हाधिकारी यांचेकडे पाठवावे.

65 of 87

विविध स्तरावरून प्रक्रियेचा आढावा/पाठपुरावा-

  • कोणतेही बजेट/नियोजन करणे हा एका सलग आणि सुनियोजित प्रक्रियेचा भाग असतो.
  • त्यात समृद्धी बजेट हे लेबर बजेटपेक्षा अनेक अंगांनी वेगळे आहे.
  • समृद्धी बजेटचे बहुतांशी यश हे त्याचे सुयोग्य नियोजनात आहे. जर नियोजन योग्य पद्धतीने झाले तर यश मिळण्याची शक्यता असते. मात्र योग्य नियोजन झाले नाही तर यश मिळण्याची शक्यता नसते. हे लक्षात घेऊन नियोजनाच्या प्रक्रियेत असणार्‍या वरिष्ठ अधिकार्‍यांनी या प्रक्रियेचा सातत्याने आढावा घेऊन विहित वेळेत वास्तविक समृद्धी बजेट तयार करण्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे.

66 of 87

विविध स्तरावरून प्रक्रियेचा आढावा/पाठपुरावा-

  • जिल्हाधिकारी/मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी १५ दिवसातून एकदा या प्रक्रियेचा आढावा घेऊन यंत्रणांचे मनोबल वाढवावे.
  • उपजिल्हाधिकारी रोहयो आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेगा यांनी दर ८ दिवसाला समृद्धी बजेट तयार करण्याच्या प्रक्रियेचा आढावा घ्यावा.
  • तहसिलदार आणि गटविकास अधिकारी यांनी आठवड्यातून दोन वेळा प्रक्रियेचा आढावा घेऊन उत्कृष्ट नियोजन होईल याची खात्री करावी.

67 of 87

काय मत तयार झाले?

  • आजचे सत्र ऐकून काय मत तयार झाले आहे ?
  • तीन – चार लोक आपले मत शेयर करतील.

सत्र समारोप

68 of 87

सर्वांचे स्वागत ....

दिवस तिसरा

69 of 87

परिणामासाठी काम व माझी भूमिका...

उदिष्टे –

    • समृद्धी बजेट नंतर कोणते परिणाम दृश्य स्वरुपात दिसतात हे सांगतात.
    • Output , outcomes आणि impact काय आहे हे सांगतात.
    • परिणामासाठी काम करतांना स्वतःची भूमिका काय आहे ते ओळखतात.

70 of 87

कालच्या वाचन साहित्यावर बोलूया...

काल आपण लक्षाधीश कुटुंबे आणि समृद्ध गावे हे वाचन साहित्य वाचले आहे. सदर वाचन वाचन साहित्य वाचून काय मत तयार झाले आहे ?

तीन लोकांचा प्रतिसाद घेवू...

71 of 87

उदिष्टाकडे वाटचाल .....

  • लखपती कुटुंब तयार करायची असतील तर फक्त योजना देवून आपले काम होणार नाही, योजने सोबत ज्ञान आणि कौशल्य पण द्यावे लागतील.
  • गाव समृद्ध करायची असेल तर समग्र विचार करावा लागेल.
  • अंतिम परिणाम लक्षात घेवून काम करावे लागेल.

72 of 87

परिणाम समजून घेवू ....

परिणाम तीन पातळीवर पाहता येतात.

  • Output पातळीवर काय परिणाम दिसणार आहेत.
  • Outcomes पातळीवर काय परिणाम दिसणार आहेत.
  • Impact पातळीवर काय परिणाम दिसणार आहेत.
  • उदा. लखपती होण्यासाठी कुटुंबाशी बोललो. (Input ) १. कुटुंबाला आपले मत पटले काय करायचे ते लक्षात आले. (output ) २. लखपती होण्यास काम सुरु केले त्यासाठी रोहयोच्या योजनेची मदत घेतली. ( outcomes) ३. कुटुंब लखपती झाले आणि कायम लखपती राहील यासाठी काम करू लागले. ( impact )

73 of 87

OUTPUT पातळीवर काय परिणाम दिसणार आहेत.

  • १०० लोकांना रोहयोची माहिती झाली, रोहयो कशी मदतगार आहे हे त्यांना कळले.
  • १०० टक्के कुटुंबाशी संपर्क झाला, त्यांना लखपती होण्यासाठी संवाद झाला.
  • प्रत्येक कुटुंबाचे जॉब कार्ड काढल्या गेले आहे. आवश्यक ती सर्व जॉब कार्ड विभक्त करण्यात आले आहेत.
  • कार्यक्षेत्रातील अपूर्ण कामे पूर्ण करण्यात यश आले.लोकांचा सहभाग वाढला.
  • प्रत्येक कुटुंब समृद्धी बजेट मध्ये सहभागी होण्यास तयार आहे.
  • समृद्धी बजेट मधील लाभ मिळविण्यास कुटुंबाची पूर्वतयारी झाली आहे.
  • गावाने शाश्वत समृद्धीचे नियोजन केले आहे. समृद्धी बजेट.

74 of 87

OUTCOMES पातळीवर काय परिणाम दिसणार आहेत. �

  • प्रत्येक कुटुंबाचे समृद्धी बजेट तयार झाले.
  • गावाचे समृद्धी बजेट तयार झाले.
  • प्रत्येक कुटुंब लखपती होण्यासाठी रोहयो सोबत येवून योजनांचा लाभ घेत आहे.
  • लोकांच्या विचारात बदल होवून उपलब्ध संसाधनाचा पूर्णतः उपयोग करत आहेत.
  • समृद्धी बजेट मध्ये समाविष्ट केलेले १०० टक्के काम पूर्ण होत आहेत. गावतील प्रत्येक कुटुंब त्यामध्ये भाग घेत आहे.
  • गावातील प्रत्येक घटक रोहयोचा लाभ घेवून लखपती होत आहे.
  • प्रत्येक गाव शाश्वत समृद्धीच्या दिशेने जात असून लखपती सह पोषण,शिक्षण, विचार यावर पण काम करत आहेत.

75 of 87

IMPACT पातळीवर काय परिणाम दिसणार आहेत.

१.गावातील प्रत्येक कटुंब लखपती झाले.

२.वापरल्या गेलेला पाण्याचा प्रत्येक थेंबाचा उपयोग अधिकाधिक उत्पन्न मिळवण्यासाठी केला गेलेला आहे.

प्रत्येक थेंबातून अधिक पैसा ( per drop more money)

३. वापरल्या गेलेल्या प्रत्येक एकरामागे अधिकाधिक उत्पन्न मिळवले गेलेले आहे.मातीच्या प्रत्येक कणातून अधिक पैसा.(per particle more money)

४. गावात उपलब्ध भूजलाचा वापर किमान ६० % व कमाल ७० % पर्यंत केला गेला आहे.

76 of 87

IMPACT पातळीवर काय परिणाम दिसणार आहेत.

५.गावातील मातीच्या वापराची पद्धत,त्याही पोत सतत टिकून राहावी किंवा वाढत जावी असे करण्यात यश आले आहे.

६. गावाचे ० ते ६ वयोगटाची १०० % मुले कुपोषण मुक्त आहेत.( वयाप्रमाणे वजन)

७. . गावाचे ६ ते १४ वयोगटाची १०० % मुले कुपोषण मुक्त आहेत.( वयाप्रमाणे वजन)

८. गावातील १५ ते ३५ वयोगटातील १०० टक्के महिला व पुरुषांचे हिमोग्लोबिन प्रमाण १२ चे वर आहे. ( रक्तक्षय मुक्त गाव )

९. गावातील पहिल्या वर्गातील प्रत्येक मुलाला दिवाळीपर्यंत वाचन येते.

77 of 87

IMPACT पातळीवर काय परिणाम दिसणार आहेत.

१०. गावातील प्रत्येक मुल पाचव्या वर्गाच्या शिष्यवृत्ती परीक्षेला बसतात व पास होतात. कोणालाही शिष्यवृत्ती नाही मिळाली तरी चालते मात्र ते पास होतात.

११. गावातील प्रत्येक मुल आठव्या वर्गाच्या शिष्यवृत्ती परीक्षेला बसतात व पास होतात.

१२. शाळेतील चौथ्या वर्गापासूनच्या वरच्या किमान एक चतुर्थांश मुलांना इंग्रजी बोलता येते.

78 of 87

परिणाम मिळवण्यासाठी माझी भूमिका ....

ग्राम रोजगार सेवक

१. प्रत्येक कुटुंबाची भेट:- योजनेची मुलभूत माहिती प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचण्याकरिता गृहभेट घेणे तसेच उपलब्ध संबंधित social media (whats app, telegram, facebook) चा वापर करणे. कुटुंब हे शेतकरी, मजूर, व्यावसयिक कि नोकरदार आहे याचा तक्ता तयार करणे. कुटुंब निहाय वार्षिक उत्पन्न नमूद करणे.

२.कुटुंबाच्या गरजेनुसार कामांची नोंद घेऊन त्याचा अहवाल ग्राम पंचायतला सादर करणे.

३.जॉब कार्ड ची मागणी करण्याऱ्या प्रत्येक कुटुंबास जौब कार्ड उपलब्ध करून देणे.

79 of 87

जास्तीत जास्त पैसे मिळवण्यासाठी माझी भूमिका ...� ग्राम रोजगार सेवक

  • मानधन अधिक कसे मिळणार आहे ते समजून घेवू.
  • किमान महिन्याला पाच हजार मानधन मिळावे यासाठी शाषण प्रयत्नरत आहे.
  • गावात रोहयोची कामे कसे वाढतील.
  • फक्त सक्रीय मजूर नाही तर पूर्ण कुटुंबाना सक्रीय करावे लागेल.
  • रोहयो सोपी करावी लागेल, सर्व कुटुंबापर्यंत जावे लागेल.
  • वैयक्तिक लाभाच्या आणि सर्वाना हव्या असणाऱ्या योजनांचा पाठपुरावा.
  • स्वतःला तयार करावे लागेल.

80 of 87

परिणाम मिळवण्यासाठी माझी भूमिका ....� सरपंच / सचिव

१. ग्राम पंचायत स्तरावर शिवार फेरीचे आयोजन करणे.

२. प्रचार व प्रसिद्धी करणे याकरिता गावामध्ये दवंडी pitavane व सार्वजनिक ठिकाणी योजनेची महीती देण्याकरिता फलक लावणे तसेच माहिती पत्रिका तयार करने. तसेच योजनेची प्रसिद्धी व प्रचार करण्याकरिता धार्मिक स्थळांचा सुयोग्य वापर करणे.

३.ग्राम सभेचे आयोजन करणे व नारेगातील अनुद्नेय सर्व कामाची सखोल माहिती देणे. नारेगा संबंधित वाचन साहित्य व video यांचे ग्रामस्थांसमोर सादरीकरण करणे.

४. secc -२०११ नुसार वैयक्तिक लाभार्थी निवड करणे

५. गावांच्या आवश्यकतेनुसार सार्वजनिक स्वरूपाच्या व अभिसरणाच्या कामांचे नियोजन करणे

81 of 87

परिणाम मिळवण्यासाठी माझी भूमिका ....� सरपंच / सचिव

६. नरेगा संकेतस्थलावरील प्राप्त प्रपत्रानुसार शिल्लक मनुष्य दिवसाचे नियोजन करून उर्वरित मनुष्य दिवसाच्या अनुषंगाने नवीन कामे प्रस्तावित करणे

७. लोकांच्या अपेक्षित मागणीच्या कालावधीत योग्य ती कामे सुचविणे. कुटुंबांच्या वार्षिक उत्पन्नाचे आवलोकन करून लाभार्थ्याचे प्राधान्य क्रम ठरवणे. २६२ अनुद्नेय कामांची माहिती या आधी सर्वाना नव्हती ती आता गावपातळीवरील सर्व नागरिकाना मिळेल.

82 of 87

परिणाम मिळवण्यासाठी माझी भूमिका ....� कृषी अधिकारी / शाखा अभियंता/ इतर यंत्रणा अधिकारी

१. शिवार फेरी करते वेळेस तांत्रिक सहाय्यक यांना तसेच संबंधित कार्मेचारी व ग्रामस्थ यांना मार्गदर्शन करणे तसेच प्रत्येक कुटुंब लखपती (समृद्ध) करता येईल या बाबत संपूर्ण मार्गदर्शन करणे. master circular मधील बाबींचे अवलोकन केल्यास मजुरांना त्यांचा अधिकार, machineries चा वापर, online पैसे transfer याबद्दल सखोल माहिती मिळेल.

२. मनारेगा मधील विविध स्थरावरील याशोगाथांची ग्राम सभेमध्ये सादरीकरण करणे

३.पाणलोट विकास करण्याबाबत मार्गदर्शन करणे . फक्त वैयक्तिक लाभ न देता समग्र नियोजन करणे या करीता पाणलोटविकास हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे.

83 of 87

परिणाम मिळवण्यासाठी माझी भूमिका ....� तांत्रिक सहाय्यक

१.सरपंच/ सचिवानी यांनी सुचविलेली कामे योग्यअसल्याबाबतची खात्री करणे याकरिता चालू कामावरील शिल्लक मनुष्य दिवस, shelf वरील उपलब्ध कामाचे मनुष्य दिवस, नवीन प्रस्तावित कामाचे मनुष्यादिवस याचे आवलोकन करून ग्राम्पान्च्यातीने सुचवलेल्या कामाची व्यवहार्यता तपासणे. ६०:४० ratio निहाय नियोजन केल्यास ग्राम पंचायत स्तरावर सुचविलेली कामे प्रशासकीय स्तरावर मान्य करणे सोयीचे होईल.

२.ग्राम पंचायत लेवल वरील शिवारफेरी करिता संपूर्ण प्रकारचे तांत्रिक सहाय्य करणे. पाणी foundation चे video यांचे अवलोकन केल्यास शिवारफेरी, पाणलोट नियोजन, वैयक्तिक व सार्वजनिक स्वरूपाची सर्व कामे कशी करावीत व काय काळजी घावी याची साखोल् माहिती मिळेल.

84 of 87

परिणाम मिळवण्यासाठी माझी भूमिका ....� वि.अ.पंचायत

१. सर्व सचिव व सरपंच यांची पंचायत समिती स्तरावर सभा घेऊन त्यांना लेबर बजेट व कृती आराखडा बाबत मार्गदर्शन व संबोधन करणे

४. सुचावालेली ६५% कामे हि NRM व कृषी संबंधित असतील याची खात्री करणे. असे केल्यास, मृदा व जलसंधारण करणे सोयीचे होईल. पाणी पातळी वाढल्यास व भूजल पुनर्भरण झाल्यास गावातील पाणीसाठा वाढेल व इतर पिके किंवा अधिक गुरांचे गोठे घेता येतील.

85 of 87

परिणाम मिळवण्यासाठी माझी भूमिका ....� स.का.अ.

१.naregalb.org या संकेत स्थळावरून सर्व ग्रामपंचायतीचे प्रपत्र संबंधित ग्रामसेवकांना देणे . त्यापूर्वी शिल्लक मनुष्यादिवस ग्राम पंचायत निहाय तयार करणे. शिल्लक व शिल्लक मनुष्य दिवसात कोणती कामे घेता येईल याची आपल्या स्तरावरून नियोजन करणे

२. सर्व ग्राम पंचायतीचा लेबर बजेट व कामांचा आराखडा नारेगा soft वर एन्ट्री करणे.

86 of 87

परिणाम मिळवण्यासाठी माझी भूमिका ....� तहसीलदार/गट विकासअधिकारी

१.तालुका कार्यक्रम अधिकारी यांनी यंत्रणा स्तरावरील आवश्यक ती सर्व कामे आराखड्यात समाविष्ट झाले याची खात्री करून घेणे. पंचायत समिती स्तरावर आयोजित सभेला साम्भोदित करणे व समृद्धी बजेट बद्दल माहिती देणे अपेक्षित आहे. अश्या वरिष्ठ अधिकार्यांनी social media चा योग्य वापर केल्यास समृद्धी बजेटची संकल्पना प्रभावी पने गाव पातळी वर रुजाविण्यास मदत होईल.

२.सहकार्यक्रम अधिकारी यांनी ग्रामपंचायत स्तरावरील सर्व कामे आराखड्यात समाविष्ट झाले याची खात्री करून घेणे.

३.गट विकास अधिकारी व तहसीलदार यांच्या संयुक्त सहीनिशी आराखडा पंचायत समिती मधील मासिक सभेमध्ये मांडून त्यांना मान्यता घेणे.

87 of 87

परिणाम मिळवण्यासाठी माझी भूमिका ....� जिल्हाधिकारी/मुख्य कार्यकारी अधिकारी

  • पंचायत समिती स्तरावरील मंजूर आराखडा जी.प. च्या GB च्या मिटिंग मध्ये मान्यता घेणे.
  • मासिक सभे मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हापरिषद येथील सर्व सदस्यांना समृद्ध बजेट ची संकल्पना सखोलपणे समजावून सांगावी असे केल्यास संबंधित सदस्यांच्या निर्वाचन क्षेत्रात सुद्धा समृध्द बजेट ची संकल्पना प्रभावी पने रुजेल.