1 of 17

सुक्ष्म अर्थशास्त्र

(Micro Economics)

प्रोफेसर दीपक एम. भारती

अर्थशास्त्र विभाग

कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, किल्ले धारूर

2 of 17

  • सुक्ष्म अर्थशास्त्रचे स्वरूप, व्याप्ती, महत्त्व आणि मर्यादा

(Meaning, Nature, Scope, Significance and Limitations of Micro Economics):-

  • आधुनिक अर्थशास्त्राचा प्रारंभ १७७६ साली ऑडम स्मिथ यांच्या “An inquiry into the nature and causes of wealth of Nation” या ग्रंथाच्या प्रकाशनापासून मानला जातो. स्मिथ यांनाच अर्थशास्त्राचे जनक असेही संबोधले जाते. ही वस्तुस्थिती मान्य करून स्मिथ यांच्या पूर्वी निसर्गवादी व व्यापारवादी आर्थिक विचारवंतानी अर्थशास्त्रीय विचार मांडले आहेत. एवढेच नाही तर
  • प्राचीन कौटिल्य (आर्य चाणक्य) यांनी ‘अर्थशास्त्र’ या शीर्षकाचा ग्रंथ लिहून त्या मध्ये आर्थिक विचारांची मांडणी केली.
  • मानवी गरजा अर्थशास्त्राच्या निर्मितीस कारणीभूत ठरली असे म्हणटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

3 of 17

  • पूर्वी अर्थशास्त्राची सरमिसळ झालेली होती.
  • तरीपण अर्थशास्त्र व राज्यशास्त्र यांचा एकत्र अभ्यास केला जात असे.

  • अर्थशास्त्रच्या व्याख्या :-
  • ऍडम स्मिथ :- “अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे.”

टिका – १) संपत्तीला अवास्तव महत्त्व दिले आहे.

२) स्वार्थी प्रवृतीला प्रोत्साहन देते.

२) डॉ. मार्शल :- यांनी Principles of Economics (1890) या ग्रंथात पुढील व्याख्या केली आहे.

“अर्थशास्त्र हे मानवाच्या सामान्य आर्थिक व्यवहाराचा अभ्यास करणारे शास्त्र आहे.”

टिका :– १) भौवतिक वस्तूवर भर दिलेला आहे.

२) मानवी जीवनाच्या आर्थिक बाजूचा अभ्यास करते.

३) हि व्याख्या कल्याणावर अधिक भर देते.

४) मानवाच्या वैयक्तिक व सामुहिक कल्याणात भेद नसते.

4 of 17

३) प्रा. पिगू :- “आर्थिक कल्याण हा अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे. आर्थिक कल्याण हा सामाजिक कल्याणाचा एक भाग आहे. ज्याचे पैशाच्या साह्याने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मापन करता येते.

टिका :– १) कल्याण ही संकल्पना सापेक्ष आहे. व्यक्तीपरत्वे कल्याणाची पातळी भिन्न असु शकते. २) पैशाच्या सहाय्याने कल्याणाचे मापन करण्यात आडचणी येतात.

३) मुद्रेचे मूल्य अस्थिर असते ते बदल्यास कल्याणाची पातळी बदलते.

४) रॉबिन्स यांची व्याख्या :- The Nature and significance of Economic Science (1932)

या ग्रंथात मांडली.

“अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधने यात मेळ

घालण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास म्हणजे

अर्थशास्त्र होय.”

5 of 17

यांच्या व्याख्येतील महत्त्वपूर्ण बाबी.

१) मानवी गरजा आनंत आसतात

२) गरजा सारख्या तीव्रतेच्या नसतात.

३) साधने मर्यादित आहे.

४) साधनाचा पर्यायी उपयोग.

५) प्रा.जे.के. मेहता यांची व्याख्या :- Studies in Economics Theory या ग्रंथात व्याख्या केली आहे.

“अर्थशास्त्र हे असे शास्त्र आहे की, जे मानवाच्या वर्तणुकीचा अभ्यास करते. मानवास इच्छाविरहीत अवस्थेप्रत पोहचण्याचे एक साधन म्हणजे अर्थशास्त्र होय.

6 of 17

  • अर्थशास्त्राची व्याप्ती (Scope Economics)

“प्रत्येक शास्त्राची विशिष्ट अशी व्याप्ती असते. व्याप्ती ही संकल्पना या अर्थाने घेतली जाते की त्या शास्त्राचा विस्तार किती आलेला आहे त्या शास्त्राच्या ज्ञानकक्षा म्हणजे व्याप्ती होय.”

  • अर्थशास्त्राच्या व्याप्तीचे घटक :-

१)उत्पादन :- उत्पादनाचे सिध्दांत, उत्पादानाचे घटक, उत्पादन निर्णय, उत्पादन किती व कसे करावे यांचा सामावेश होतो.

7 of 17

२) वितरण :- भूमी, श्रम, भांडवल व संयोजक यांचे मोबदले निश्चित करणे.

३) उपयोग :- उत्पादन घटक उत्पादन करतात व त्याबद्दल मोबदले प्राप्त करतात यातूनच त्यांना खरेदी शक्ती प्राप्त होत असते. उत्पन्नाचा वापर उपभोगासाठी केला जातो. अर्थशास्त्रात उपभोगा विषय बरेच सिध्दांत प्रचलित आहेत. या मध्ये उपयोगीतेचे सिध्दांत, मागणीचा नियम.

४) सार्वजनिक आय-व्यय :-

कर आकारणी, सार्वजनिक खर्च, सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक कर्ज, तुटीचे अर्थप्रबंधन, आर्थिक नियोजन या बाबीचा या विभागा मध्ये समावेश होतो.

५) आंतरराष्ट्रीय व्यापार :-

या विभागात आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिध्दांत, व्यापार लाभ, आंतरराष्ट्रीय व्यापारी संस्था इ. समावेश होतो.

8 of 17

  • सूक्ष्म अर्थशास्त्र (Micro Economics)

सनातनवादी आर्थिक विचारवंतानी सूक्ष्म अर्थशास्त्राचा वापर मोठ्या प्रमाणावर केला. ऍडम स्मिथ यांनी त्यांच्या राष्ट्राची संपत्ती या ग्रंथात सूक्ष्म पध्दतीचा अवलंब केलेला आहे. रिकार्डी, जे.बी.से. मिल, मार्शल, पिगू, रॅबिन्सन इ. विचारवंतानी सूक्ष्म अर्थशास्त्राचा अत्याधिक वापर केलेला आहे. रेगनर फ्रिच यांनी १९३३ मध्ये प्रथमतः Micro Economics असा शब्द प्रयोग केला होता असे मानले जाते.

सूक्ष्म अर्थशास्त्र आर्थिक घटकाच्या सर्वात छोट्‌या भागाचा अभ्यास करते. उदा. विशिष्ट उद्योगसंस्था, विशिष्ट उपभोग्त्याचा, अर्थव्यवस्थेच्या विशिष्ट भागाचा समावेश होतो.

  • सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या (Difinition)

१)प्रा.लर्नर :- सूक्ष्म अर्थशास्त्र व्यवस्थेकडे सूक्ष्मदर्शक यंत्रातून पाहते. अर्थव्यवस्थेतील विविध पेशी (संस्था) नीट कार्य करतात का याचे निरिक्षण सूक्ष्म अर्थशास्त्र करीत असते.

२)प्रा.के.इ. बोल्डिग :- सूक्ष्म अर्थशास्त्र हे विशिष्ट उद्योग संस्थेचा, विशिष्ट उपभोक्त्याचा, विशिष्ट वेतनदराचा, विशिष्ट किमतीचा अभ्यास करते.

9 of 17

  • सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती (Scope)

सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीत खालील मुद्द्याचा समावेश होतो.

१) उत्पादन उत्पादनाच्या संबधित सिध्दांताचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो.

२) उत्पादन तंत्राचे विश्‍लेषण सूक्ष्म अर्थशास्त्रात केले जाते.

३) किंमती निश्चिती हा विषय हा सूक्ष्म अर्थशास्त्राचा भाग होय.

४) वितरण हा सूक्ष्मअर्थशास्त्राचा महत्त्वाचा भाग आहे. या मध्ये खंड, वेतन, व्याज व नफा उत्पादन घटकाला देणे गरजेचे आहे.

५) बाजार संघटन हा सूक्ष्मअर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे. या मध्ये बाजार संघटनांचे विविध प्रकार येतात. उदा. पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, अल्पधिकार, द्रयाधिकार, क्रेताधिकार यांचे विवेचन केले जाते.

६) आर्थिक कल्याणाचे विवेचन सूक्ष्मअर्थशास्त्रात केले जाते.

७) उपभोक्त्याच्या वर्तणुकीचे विश्‍लेषण सूक्ष्मअर्थशास्त्रात केले जाते. उदा. समवृत्ती वकृ, समसीमांत उपयोगीता.

10 of 17

  • सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व (Importance)

१) किंमत यंत्रणेचे कार्य कसे चालते याचे विश्‍लेषण सूक्ष्म अर्थशास्त्रात केले जाते.

२) मुक्त अर्थव्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी सूक्ष्मविश्‍लेषण पध्दती उपयुक्त ठरते.

३) आर्थिक कल्याणाचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त आहे. उदा. कल्याणाचे निकष कोणते असावेत, व्यक्तिगत व सामाजिक कल्याण यांच्यात संबंध कसा असतो.

४) सरकारला मदत म्हणून

  1. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा व सूक्ष्म अर्थशास्त्राचा घनिष्ठ संबंध असल्यामुळे व्यापार लाभदायक आहे की नाही हे समजते.

11 of 17

  • सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मर्यादा (Limitation)

१) सूक्ष्म अर्थशास्त्र हे विशिष्ट घटकाचा अभ्यास करते.

२) सूक्ष्म अर्थशास्त्रातील अनेक सिध्दांत गृहीतावर अधारलेले असतात.

३) सूक्ष्म अर्थशास्त्रात पूर्ण रोजगारीचा सिध्दांत मांडलेला आहे. पण वास्तवात अशी परिस्थिती नसते.

  1. अर्थशास्त्रातील काही महत्वाचे विभाग सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अध्ययन क्षेत्रात येत नाहीत. उदा. व्यापारी चक्रे,

तेजी, मंदी.

५) सूक्ष्म अर्थशास्त्र वैयक्तिक पातळीवर अध्ययन करते.

६) सूक्ष्म अर्थशास्त्रास काही विषय अभ्यासण्यासाठी स्थूल अर्थशास्त्रावर विसंबून राहवे लागते.

12 of 17

  • नवीन कल्याणकारी अर्थशास्त्र संकल्पना (The Concepts of New welfare Economics)

प्रस्तावना :-

    • पिगू यांचे कल्याणाचे विश्‍लेषण उपयोगीतेवर अधारीत आहे.
    • उपयोगीता मापनक्षमआहे व उपयोगीतेचा तुलना करत येते असे गृहीत धरले व विश्लेषण केले.

परंतू गृहीतांच्या आधारे कल्याणाचे मापन करण्यात आडचणी येतात त्यामुळे यांच्यावर अक्षेप घेण्यात आले.

    •   नंतर पॅरोटो यांनी उपयोगीतेचे मापन करण्यासाठी क्रमवाचक उपयोगीता मापनाचा वापर केला. यांनी सामाजिक व कल्याणाचा संबंध उत्पादन व उपभोगाशी जोडला.
    • हे संपूर्ण विश्लेषण पिगू यांच्या कल्याणकारी अर्थशास्त्रापेक्षा वेगळे असल्यामूळे त्यास नविन कल्याणकारी अर्थशास्त्र म्हणतात.

13 of 17

  • पॅरोटो यांची कल्याणविषयक संकल्पना (Pareto’s Social Optimum)

उद्दिष्ठे :-

१) आर्थिक कल्याणाची संकल्पना स्पष्ट करणे.

२) धोरणे राबवितांना कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार घेताना कल्याणकारी अर्थशास्त्राचे महत्त्व वाढविणे.

३) आर्थिक कल्याणातून आदर्शवादी संकल्पनाचे महत्त्व कमी करणे.

  • व्याख्या -

महतम कल्याणाची स्थिती म्हणजे ज्या स्थितीत बदल करणे अशक्य असते तेथे सर्वांचे कल्याण स्थिर झालेले असते. या स्थितीत बदल केल्यास एकतर सर्वांच्या कल्याणात वाढ होते किंवा घट होते.

14 of 17

निकष व मापदंड -

१) जर एखादा सामाजिक बदल घडून आला तर सामाजिक कल्याणात तेव्हाच वाढ हेाते जेव्हा समाजातील किमान एका व्यक्तीच्या आर्थिक कल्याणात वाढ होत असतांना इतर कोणत्याही व्यक्तीच्या स्थिती बिघाड होत नाही.

२) तसेच सामाजिक कल्याणात तेव्हाच घट झालेली असे म्हटले जाते. जेव्हा समाजातील कोणत्याही व्यक्तीच्या स्थितीत सुधारणा न होता काही व्यक्तीच्या स्थिती बिघाड होतो.

३) पॅरोटो याचा कल्याणाचा मापदंड समाजातील व्यक्तीच्या स्थितीत एकाच दिशेत होणारा बदल सुधारणा किंवा बिघाड लक्षात घेतो. त्यामुळे या नियमास ऐक्यभाव नियमअसे म्हणतात.

आक्षेप –

१) पॅरोटो यांनी उपयोगीतेची आंतरव्यक्तिगत तुलना केलेली नाही.

२) हा कल्याणाचा मापदंड सर्वसंमतीचा नियमस्पष्ट करतो.

३) पॅरोटो यांनी स्वतः नौसिक निर्णयाचा आदर केलेला आहे.

४) हा मापदंड कल्याणाचा सर्वेतमबिंदू स्पष्ट करत नाही.

15 of 17

  • हिक्स व कॅल कॅल्डोर यांचे आर्थिक कल्याणाचे विश्‍लेषण (क्षतिपूरक तत्व)

(Hicks and Kaldor’s Analysis of Economics welfare)

हिक्स व कॅल्डोर यांनी पॅरोटो यांच्या कल्याणाच्या मापदंडामध्ये सुधारणा करण्याच्या हेतूने हे विवेचन मांडलेले आहे. त्यास क्षतिपूरक तत्व असे म्हणतात.

गृहिते :-

१)सर्व व्यक्तीचे समाधान वेगवेगळे असते.

२)उपभोक्त्याला पसंती स्थिर आहेत.

३)क्षतीपूर्ती प्रत्यक्षात दिली जात नाही.

४)उपयोगीतेची आंतरव्यक्तिगत तुलना करता येत नाही.

५)उपयोगीता मापनक्षमअसून त्यासाठी क्रमवाचक पध्दतीचा वापर केला जातो.

16 of 17

मापदंड / निकष :-

एखाद्या सामाजिक बदलाची अमलबजावणी केल्यामुळे समाजातील कोणत्याही व्यक्तिचे काहीही नुकसान होत नाही. अर्थशास्त्रज्ञानी केवळ इतके सिध्द करणे पुरेसे असते की, नुकसान झालेल्यांना क्षतीपूर्ती मिळते आणि समाज पूर्वीपेक्षा सद्यःस्थितीत अनुकूल परिस्थितीत आहे.

अपेक्षा :-

१)यांचे विवेचन दोन तसेच अनेक वस्तूंच्या बाबतीत गैरलागू ठरते.

२)के विवेचन वितरणास महत्त्व देत नाही.

३)कल्याणावर बाह्य घटकाचे अनुकूल व प्रतिकूल परिणामहोतात.

४)हे विवेचन नैतिक निर्णयापासून मुक्त राहू शकत नाही.

17 of 17

धन्यवाद ...