विद्याप्राधिकरण समता कक्ष अंतर्गत समता विषयक काम करण्यास इच्छुक व्यक्तीं करिता दिनांक 0६/0१/२०१७ पर्यंत नोंदणीची विशेष संधी (या पूर्वी लिंकवर फॉर्म भरला असल्यास पुन्हा भरू नये)
अनेक वर्षांपासून शंभर टक्के मुलांची पटनोंदणी शाळेत व्हावी, शाळेत शंभर टक्के मुलांची उपस्थिती रहावी, सर्व (100%) मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे आणि लिंगभेदाची दरी कमी व्हावी यासाठी शासन आणि समाज स्तरावर अनेक कार्यक्रम /उपक्रम घेण्यात आलेले आहेत. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम राज्यात १ एप्रिल २०१० पासून लागू झाला. राज्यातील 100% मुले शिकण्याच्या उद्देशाने राज्यशासनाने २२ जून २०१५ रोजी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम सुरु केला. या कार्यक्रमांतर्गत मागील वर्षभरात शिकण्याच्या व शिकविण्याच्या प्रक्रियेत बराच बदल झाला आहे. यंत्रणाही पूर्ण जोमाने कार्यान्वित झाली आहेत. त्याचा परिपाक म्हणून शाळा प्रगत झाल्या आहेत. राज्यात १,०७,००० शाळा त्यापैकी ११००० शाळांनी प्रगत झाल्याचे घोषित केले आहे. आजही समाजात दुर्बल घटक, वंचित घटक, दुर्गम भाग, गरीब, दिव्यांग या प्रवर्गातील मुले शिकू शकत नाही असा चुकीचा समज बर्याच लोकांमध्ये दिसून येतो. खर्या अर्थाने सर्व मुलांचा एकाच पातळीवर विचार केल्यास या सारख्या समस्या उद्भवणार नाही.
- राज्यातील सर्वात अडचणीत असलेल्या जिल्ह्या मध्ये समाजातील ८५ टक्के लोक मुलींना जन्म देतात, परंतु १५ टक्के लोकांना मुलींना जन्म देण्यास भीती वाटते (जनगणना २०११) ही परिस्थिती आपण बदलवू शकता असे आपणास वाटते काय ?
- आपल्या विचार व कृती मुळे बालविवाह,हुंडा पद्धती लवकर बंद होईल असे आपणास वाटते काय ?
- समाजात लिंग,धर्म,जात,समाज परस्परावलबन विषयक दृष्टीकोन विकसित करून समता आधारित समाजाची निर्मिती होऊ शकते असे आपणास वाटते काय?
- स्त्री –पुरुष ,तृतीय पंथी, दिव्यांग यांच्या मध्ये आशा,इच्छा,स्वप्न,स्वप्न साकार करण्याची प्रेरणा, हे समानतेचे आधार असू शकतात असे आपणास वाटते काय?
- प्रत्येकाला माणूस म्हणून सन्मानाने जगता येईल असा समाज निर्माण होऊ शकेल असे आपणास वाटते काय?
या विचारांना धरून काम करणाऱ्या व समतेवर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तींनी या लिंकवर आपले नाव नक्कीच नोंदवा.