शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका 
सराव प्रश्नपत्रिका - 1 
पेपर 1: गणित
(वेळ : ३0 मिनिटे ) इयत्ता ५ वी 
(प्रश्न - 25) एकूण गुण: 50
विभाग २ : गणित (25 प्रश्न; 50 गुण)
Sign in to Google to save your progress. Learn more
महत्वाच्या सूचना 
खालील सूचना वाचन करा. 
1) सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य असतील. एकही प्रश्न आपणास सोडता येणार नाही.
२) दिलेल्या प्रश्नाचे वाचन करा चारही पर्याय पहा व अचूक पर्यायाची निवड करा. 
३) आपणास दिलेल्या वेळेतच आपली प्रश्नपत्रिका सोडवून पूर्ण करा. 
४) सर्व प्रश्न सरावासाठी घेतलेले नमूना प्रश्न आहेत. केवळ आपला सराव व्हावा या उद्देशाने हे प्रश्न आहेत.
५) एखादा प्रश्न आपणास समजला नाही तर कृपया आपल्या पालकांची किंवा शिक्षकांची मदत घ्यावी. 
६) प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर शेवटी आपणास View Score बटण दिसेल त्यावरून आफणास निकाल पाहता येईल तसेच अचूक उत्तरे देखील पाहता येतील. 
आपले नाव *
मोबाईल नंबर *
आपला जिल्हा *
51. एका संख्येला 25 ने भागले असता भागाकार 13 येतो व बाकी 22 येते तर ती संख्या कोणती ? *
52. धनेशने 50 व 100 रुपयांच्या प्रत्येकी ४ नोटा बँकेत देऊन त्या रकमेच्या 10 च्या नोटा मागितल्या, तर त्याला 10 रुपयांच्या किती नोटा मिळतील ? *
53. 39 च्या सर्वांत मोठ्या विभाजकामध्ये 27 चा सर्वांत लहान विभाजक मिळवला असता येणाऱ्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज किती ?
*
54. 7/5 x 5/7+1 = ? (पाच छेद सात गुणिले पाच छेद सात अधिक एक) = ? *
55. 5656 ÷ 8 या उदाहरणात भाजक 1 ने कमी केला तर भागाकार कितीने वाढेल ? *
56. एक गाडी ताथी 80 किलोमीटर अंतर पार करते, तर पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? *
57. 12 मीटर, 3 मिलिमीटर दशांश अपूर्णांकात कसे लिहाल ? *
58. 2 दस्ता कागद +5 डझन कागद = किती कागद ?
*
59. 6/18(सहा छेद अठरा) या अपूर्णांकात 6/18 (सहा छेद अठरा) किती वेळा मिळवल्यास बेरीज 3 येईल ? *
60. जॉनने एक मोटरसायकल ₹ 20,000 ला खरेदी करून ₹25,000 ला विकली, तर या व्यवहारात त्याला किती रुपये नफा अथवा तोटा झाला ? *
61. शेजारील आकृती दुमडून घन बनवल्यास 5 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही ? *
Captionless Image
62. 6 सेमी रुंदी असलेल्या आयताची परिमिती 34 सेमी आहे. त्याच्या लांबीच्या दुपटीएवढी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती ? *
63. 48 मी लांबी व 12 मी रुंदी असलेल्या हॉलला 64 चौरसाकृती टाईल्स लागतात; तर प्रत्येक टाईलची परिमिती किती ? *
64. 2016 सालचा पहिला दिवस शुक्रवारी येतो तर 2017 सालातला मराठी भाषा दिन कोणत्या दिवशी येईल ? *
65. राहुलने ₹ 15,000, 3 वर्षांसाठी काही दराने सुभाषला वापरायला दिले. सुभाषने त्याला ₹ 4500 व्याज दिले, तर व्याजाचा दर द.सा.द.शे. किती असेल ?
*
66. 27 शतक × 3 दशक - 5 एकक = किती ? *
67. एका संख्येला 16 ने गुणण्याऐवजी 10 ने गुणले असता गुणाकार 30 ने कमी होतो तर ती संख्या कोणती ? *
68. एका दुकानदाराने 50 किग्रॅ ज्वारीपैकी 40 किग्रॅ 250 ग्रॅ ज्वारी विकली, तर त्याच्याकडे किती ज्वारी शिल्लक राहिली ? *
69. घनाच्या कडा या घनाच्या शिरोबिंदू व पृष्ठांच्या कितीने कमी अथवा जास्त आहेत ?
*
70. पुढे दिलेल्या पदावलीत चौकटींत क्रमाने कोणती योग्य चिन्हे येतील ?
48...8...6....2....5....5
*
71. एका बागेत एकूण 60 झाडे आहेत. त्यांपैकी 1/3 (१ छेद ३) झाडे आंब्याची, 1/2 (१ छेद २) झाडे नारळाची व उरलेली झाडे फणसाची आहेत, तर बागेत फणसाची किती झाडे आहेत ?
*
72. 18 × 4-6 [..?..] 70×2÷2-4. चौकोनाच्या जागी कोणते चिन्ह येईल ? *
73. 2016 साली नाताळची सुट्टी रविवारी आली तर 2017 साली महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी येईल ?
*
प्र. 74 व 75 सूचना : पुढील चित्ररूप माहितीच्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा :
(प्रमाण: 1= 35 विद्यार्थी)
74. तक्त्यातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती ? *
75. गणित आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही इंग्रजी आवडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे ? *
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This form was created inside of State Council of Educational Research and Training, Maharashtra, Pune.