उतारा काळजीपूर्वक वाचा व दिलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर निवडा
उतारा
परतताना सिकंदराची भेट एका साधूशी झाली. साधू एका खरखरीत गवती चटईवर बसून ऊन खात होता. सिकंदर त्याच्यासमोर उभा राहिला आणि त्याला वाटले की, साधू आता मला प्रणाम करील, पण त्याने असे काहीच केले नाही. त्याऐवजी त्याने म्हटले, "कृपा करून एका बाजूला उभे राहा. ऊन माझ्यापर्यंत येऊद्या."
सिकंदराने रागाने विचारले, "माहित आहे का मी कोण आहे ?"
साधूने काहीच उत्तर दिले नाही.
"मी एक सम्राट आहे - महान सिकंदर," त्याने म्हटले.
"सम्राट ! तू ! नाही, तू नाहीस," साधूने म्हटले.
"होय, मी आहे," सिकंदर म्हणाला. "मी अर्धे जग जिंकले आहे." त्यावर साधूने शांतपणे म्हटले, "सम्राट तुझ्यासारखे अस्वस्थपणे हिंडत नसतात. जा बाबा जा, लोकांच्या हृदयावर प्रेमाने विजय प्राप्त कर."
सिकंदर ने प्रणाम केला आणि तो मुकाट्याने निघून गेला.