अभिव्यक्ती संस्था आयोजित कार्यशाळा Abhivyakti Organised Workshop
नावनोंदणी -
Email address *
अभिव्यक्तिबद्दल
सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेत माध्यमांची भुमिका महत्वाची असते. हीच भुमिका अधिक बळकट करून सामाजिक परिवर्तनाला दिशा देण्यासाठी अभिव्यक्ति हि सामाजिक संस्था माध्यम व संवाद या क्षेत्रात गेल्या ३२ वर्षापासून कार्यरत आहे. लोकव्यवहारात माध्यमांचा वापर आणि माध्यम व्यवहारात लोकांचा सहभाग वाढावा या उद्देशाने लोकांच्या गरजांबद्दल संवेदनशील असणा-या माध्यमांना पुढे आणण्यासाठी व माध्यमांचा वापर वाढविण्यासाठी अभिव्यक्तीने नेहमीच पुढाकार घेतला आहे.
कार्यशाळेबद्दल
अभिव्यक्तिने आजवर विविध शैक्षणिक-सामाजिक संस्था, संघटना आणि स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांसोबत माध्यमांचे कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देवून त्यांना माध्यम साक्षर आणि चिकित्सक केलेले आहे. समाजासोबत काम करीत असताना कार्यकर्त्याला प्रशिक्षणातून शास्त्रशुद्ध माहिती मिळते, नवीन दिशा आणि ऊर्जा मिळते. आजपर्यंत अभिव्यक्तिने संवाद कौशल्य, नेतृत्व कौशल्य, लेखन कौशल्य, व्यक्तिमत्व विकास, सुजाण पालकत्व, लिंगभाव, दस्ताऐवजीकरण, फिल्म मेकिंग अशा विविध विषयावर यशस्वीपणे प्रशिक्षण घेतली आहेत. कार्यकर्त्ये त्यांचा कामात या प्रशिक्षणाचा उपयोग करत आहे हे आमचे यश आहे. या वर्षीही अभिव्यक्तीने सामाजिक संस्था- संघटनेच्या कार्यकर्त्यांसाठी संस्था बांधणी, अहवाल लेखन व दस्तऐवजीकरण आणि सुजाण प्रशिक्षणाच्या वाटेवर या तीन कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
संस्था बांधणी कार्यशाळा
दि.२७ ते ३० जुलै २०१९ या दरम्यान कार्यशाळा उत्साहात आणि कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागाने संपन्न झाली
सुजाण प्रशिक्षकाच्या वाटेवर कार्यशाळा
दि.२५ ते २९ सप्टेंबर २०१९ या दरम्यान कार्यशाळा उत्साहात आणि कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागाने संपन्न झाली
दस्तऐवजीकरण कार्यशाळा - कालावधी ४ दिवस दिनांक ४ ते ७ नोव्हेंबर २०१९ नावनोंदणीची अंतिम दिनांक २५ ऑक्टोबर २०१९
सामाजिक संस्था-संघटना आज समाज परिवर्तनासाठी कार्य करीत आहे स्थानिक पातळीवर केलेल्या परिवर्तनाच्या कार्यक्रमातून निर्माण होणारी माहिती आणि ज्ञान याची नोंद करण्याच्या कामाला फारसे महत्व दिले जात नाही किंवा त्याचा अभाव दिसतो. सामाजिक कार्याचे अहवाल लेखन करणे हे खूप कंटाळवाणे आहे अशी कार्यकर्त्यांची समजूत आहे. सामाजिक संस्थांनी केलेल्या कामाच्या नोंदी परिणामकारक आणि सृजनशील पद्धतीने करणे हे आज एक आव्हान झाले आहे. दस्तऐवजीकरण संकल्पना, त्याच्या विविध पद्धती आणि प्रकार काय आहेत आणि तळागाळातील संस्था-संघटना यांचे कार्यकर्ते यांचा दस्तऐवजीकरण प्रक्रियेत सक्रिय सहभाग वाढावा, सामाजिक भावना वृद्धिंगत व्हावी या गरजा ओळखून अभिव्यक्तिने दस्तऐवजीकरण कौशल्य या कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

या कार्यशाळेत कोण सहभागी होऊ शकतो ? - सामाजिक संस्था - संघटनेचे कार्यकर्ते

कार्यशाळॆची वैशिष्ट्ये -
प्रशिक्षणात सहभागी पद्धतीचा अवलंब
प्रात्यक्षिकातून शिकण्यावर भर
तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन

या कार्यशाळेतील प्रमुख मार्गदर्शक
हर्ष गुप्ता, एच जी फोटोग्राफी, मुंबई
नितीन परांजपे, अविनाश नेवे - अभिव्यक्ति संस्था, नाशिक
दस्तऐवजीकरण कार्यशाळा
Next
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy