२०२१ हरित मराठी मार्गदर्शक कार्यक्रम - व्यावसायिक/उमेदवार यांच्यासाठी
नमस्कार!
आपण पर्यावरण क्षेत्राशी निगडीत नोकरी/व्यवसाय करू इच्छित असाल; तर आपल्या प्रयत्नांना ‘अनुभवाची’ जोड द्या. आमच्या मार्गदर्शक कार्यक्रमाचा लाभ घ्या!
‘हरित मराठी’ मार्गदर्शक कार्यक्रम २०२१ मध्ये सहभागी होण्यासाठी खलील फॉर्म भरा.
आपण सबमिट केलेली सर्व माहिती गोपनीय राहील याची खात्री बाळगा.
कार्यक्रमाशी संबंधित खलील माहिती या पानावर देण्यात आली आहे, कृपया ती काळजीपूर्वक वाचा.
- उद्दीष्ट
- वेळापत्रक
- आवश्यकता
- प्रश्नावली
खलील फॉर्म मध्ये आपल्या विषयी सविस्तर आणि योग्य माहिती द्या. ही माहिती आपल्याला अपेक्षित मार्गदर्शन करू शकेल, असा अनुभवी मार्गदर्शक निवडण्याच्यासाठी आम्हाला उपयुक्त ठरेल.
योग्य मार्गदर्शक न मिळाल्यास, आपला अर्ज स्वीकारला जाणार नाही. मार्गदर्शक व्यक्तींसोबत बैठका आयोजित करण्यास पुढाकार घेण्याची जबाबदारी व्यावसायिक/उमेदवार यांची आहे, याची कृपया नोंद घ्या.
आपण हा फॉर्म सविस्तर भरण्यासाठी आपला अमूल्य वेळ दिलात, त्याबद्दल आम्ही आभारी आहोत.
फॉर्म भरताना काही अडचणी/प्रश्न आल्यास त्वरित आमच्याशी ई-मेल द्वारे संपर्क साधा, आम्ही लवकरात लवकर आपल्याला उत्तर पाठवण्याचा प्रयत्न करू.
नोंदणी करण्याची अंतिम मुदत: ३१ डिसेंबर २०२०