राज्य मराठी विकास संस्थेतील विविध पदांसाठी अर्ज
राज्य मराठी विकास संस्थेच्या विविध प्रकल्पांतील अधिकारी आणि कर्मचारी पदांसाठी जाहिरात

१) प्रकल्पाचे नाव - संगणक व मराठी
पदाचे नाव आणि संख्या :- संगणक अधिकारी - १
संगणकशास्त्र या विषयातील पदवी/पदव्युत्तर पदवी (B.C.S., M.C.S., M.C.A., B.E. इ.)
मराठी भाषेची उत्तम जाण, संगणकावर मराठीचा वापर करण्याचा अनुभव,
संगणकीय साधने (आज्ञावली) तयार करण्याचा/संपादित करण्याचा अनुभव
एकत्रित मासिक मानधन - रु.३०,०००/-

२) प्रकल्पाचे नाव - पुस्तकांचं गाव, भिलार, ता. महाबळेश्वर
पदाचे नाव आणि संख्या :-
२.१ प्रकल्प सह-व्यवस्थापक - १
एम. ए. (मराठी), पत्रकारिता/व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी,
सामाजिक कामाची आवड आणि अनुभव विशेषत्वाने विचारात घेतला जाईल.
एकत्रित मासिक मानधन - रु.३०,०००/-
२.२ सहल-पर्यटन संयोजक : - १
एम. ए. (मराठी), अन्य विषयसंबंधित पदविका/पदवी/परीक्षा उत्तीर्ण
सामाजिक कामाची आवड आणि अनुभव विशेषत्वाने विचारात घेतला जाईल.
एकत्रित मासिक मानधन - रु.२०,०००/-
२.३ सहायक ग्रंथपाल :-१
ग्रंथपालनशास्त्र विषयाची पदवी, ग्रंथपाल या पदाचा अनुभव
संगणकाचे ज्ञान
एकत्रित मासिक मानधन २०,०००/-

३) प्रकल्पाचे नाव - बृहन्महाराष्ट्र योजना
३.१ पदाचे नाव आणि संख्या :- बृहन्महाराष्ट्र अधिकारी - १
एम. ए. (मराठी), सेट/नेट परीक्षा उत्तीर्ण, संगणकाचे ज्ञान
मराठी व हिंदीखेरीज अन्य कोणतीही भारतीय भाषा जाणणारी/ बोलणारी व्यक्ती
एकत्रित मासिक मानधन - रु.३०,०००/-

४) पदाचे नाव आणि संख्या :- प्रशिक्षण सहायक - १
बी.ए./एम.ए. (मराठी), बी.एड., संगणकाचे ज्ञान, मराठी टंकलेखन
एकत्रित मासिक मानधन - रु.२०,०००/-

५) पदाचे नाव आणि संख्या :- आस्थापना सहायक - १
कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी, प्रशासकीय/व्यवस्थापन पदविका/पदवी
संगणकावर मराठीतून काम करण्याचा अनुभव, लेखाविभागाच्या दृष्टीने आवश्यक अर्हता - टॅली इ.
प्रशासकीय कामाचा प्रत्यक्ष अनुभव
एकत्रित मासिक मानधन - रु.२०,०००/-

६) पदाचे नाव आणि संख्या :- विभागीय समन्वयक - १२
६.०१) मुंबई, ६.०२) ठाणे-नवी मुंबई ६.०३) पुणे,
६.०४) सोलापूर-उस्मानाबाद-लातूर, ६.०५) औरंगाबाद-जालना-बीड, ६.०६) नांदेड-हिंगोली-परभणी,
६.०७) कोल्हापूर-सांगली-सातारा, ६.०८) रायगड-रत्नागिरी-सिधुदुर्ग, ६.०९) जळगाव-धुळे-नंदुरबार,
६.१०) नाशिक-अहमदनगर ६.११) नागपूर-गोंदिया-वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली
६.१२) अमरावती-अकोला-बुलडाणा-यवतमाळ-वाशीम
हे साधारण विभाग आहेत. यापैकी काही विभाग एकत्रित करणे किंवा वेगळे करणे याचा निर्णय आवश्यकतेनुसार संस्था घेऊ शकेल.
कोणत्याही शाखेचा पदवीधर, पदवीस्तरावर मराठी विषय असल्यास प्राधान्य,
संगणकावर मराठीतून काम करण्याचा अनुभव. जनसंपर्काची आवड असावी.
उमेदवार ज्या विभागात निवासी आहे, त्याच विभागात अर्ज करू शकेल. (आधारकार्ड आवश्यक)
शालेय -महाविद्यालयीन जीवनात साहित्यिक-सांस्कृतिक उपक्रमांत सक्रिय आणि सातत्यपूर्ण सहभाग असावा.
सामाजिक कामाची आवड आणि अनुभव विशेषत्वाने विचारात घेतला जाईल.
आपल्या विभागात सर्वत्र नियमित प्रवासाची तयारी असावी.
एकत्रित मासिक मानधन - रु.२०,०००/- (प्रवासखर्च अतिरिक्त)

७) पदाचे नाव आणि संख्या :- शिपाई - १
१० वी उत्तीर्ण
एकत्रित मासिक मानधन - रु.१०,०००/-

८) प्रकल्पाचे नाव - संस्थेचे मध्यवर्ती संदर्भ ग्रंथालय , बदलापूर
८.१) ग्रंथपाल : संख्या १
ग्रंथपालनशास्त्र विषयाची पदव्युत्तर पदवी, ग्रंथपाल या पदाचा अनुभव
संगणकाचे ज्ञान
एकत्रित मासिक मानधन ३०,०००/-

८.२) सहायक ग्रंथपाल : संख्या १
पदवीधर, ग्रंथपालन शास्त्र विषयाची पदविका/प्रमाणपत्र असल्यास विशेष गुण मिळतील. ग्रंथपाल या पदाचा किमान ३ वर्षे अनुभव
संगणकाचे ज्ञान
एकत्रित मासिक मानधन - रु.२०,०००/-

८.३) ग्रंथालय सहायक : संख्या २
१२ वी उत्तीर्ण, संगणकाचे ज्ञान, ग्रंथालयातील कामाचा, पुस्तकबांधणी इत्यादीचा अनुभव
एकत्रित मासिक मानधन - रु.१०,०००/-


अटी आणि शर्ती :
०१) ही सर्व पदे तात्पुरती आहेत. यापैकी कोणत्याही पदावर नियुक्ती झाल्यास ती कायमस्वरुपी असणार नाही.
०२) सदर पदावर होणारी नियुक्ती ११ महिन्यांच्या कालावधीसाठी, मानधन-तत्त्वावर करार-पद्धतीने होणार आहे.
०३) गुगल फॉर्मवर भरलेला अर्ज आणि संकेतस्थळावरून उतरवून घेतलेल्या नमुन्यात भरलेला अर्ज यांतील माहिती समान असायला हवी. अन्यथा आपला अर्ज बाद होऊ शकतो.
०४) आपण सदर पदासाठी पात्र आहोत, याची खात्री उमेदवाराने स्वत: करायची आहे. अपात्र उमेदवारांनी भरलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही आणि त्यापोटी भरलेले शुल्कही परत केले जाणार नाही.
०५) पीडीएफ धारिकेतील अर्ज राज्य मराठी विकास संस्था या नावाने काढलेल्या धनाकर्षासह दिलेल्या कालमर्यादेत संस्थेच्या ई-पत्त्यावर स्कॅन
करून पाठवायचा आहे. संगणकीय गुगल प्रत, धनाकर्ष व लिखित अर्ज संस्थेला प्राप्त झाल्याखेरीज आपला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. लेखी परीक्षा आणि मुलाखतीला आल्यावर प्रत्यक्ष अर्ज आणि धनाकर्ष सादर करणे बंधनकारक आहे. सादर न केल्यास लेखी परीक्षा आणि मुलाखतीला उपस्थित राहता येणार नाही.
०६) आलेल्या अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा होईल आणि त्यानंतर निवडक उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.
०७) परीक्षेसाठी अथवा मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना कोणताही प्रवासखर्च दिला जाणार नाही.
०८) कोणताही उमेदवार एकापेक्षा अधिक पदांसाठी आपल्या पात्रतेनुसार अर्ज करू शकतो पण त्यासाठी स्वतंत्र अर्ज आणि स्वतंत्र धनाकर्ष जोडणे आवश्यक आहे.
०९) खुल्या प्रवर्गातील उमेदवाराने रु.१५० तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराने रु.१०० चा धनाकर्ष जोडायचा आहे. धनाकर्ष मुंबई शाखेसाठी असावा.
१०) योग्य उमेदवाराच्या निवडीसाठी राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा आणि मुलाखत यात होणारा निर्णय अंतिम असेल आणि तो सर्व उमेदवारांना बंधनकारक असेल.
११) कोणत्याही पदावर झालेल्या निवडीनंतर आवश्यक तिथे प्रवास करण्याची उमेदवाराची तयारी असावी.
१२) यातील पुस्तकांचं गाव हा प्रकल्प भिलार, ता. महाबळेश्वर, जि. सातारा येथे असून त्या प्रकल्पांतर्गत निवड होणाऱ्या उमेदवारांची भिलार येथे स्वखर्चाने राहण्याची तयारी असावी.
१३) उर्वरित सर्व प्रकल्पांसाठी मुंबई हेच केंद्र असेल. मात्र संस्थेच्या आणि प्रकल्पाच्या गरजेनुसार अन्य कोणत्याही गावी जाऊन राहण्याची तयारी असावी.
१४) प्रत्येक उमेदवाराला संगणकावर मराठीतून काम करण्याची सवय असावी. त्याचीही प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाईल. त्यासाठी संगणकावर मराठी युनिकोडमध्ये इनस्क्रिप्ट कळफलक वापरून टंकन करता आले पाहिजे.
१५) उमेदवाराकडे स्वत:चा ई-पत्ता असावा. निवडीसाठी होणारी परीक्षा आणि मुलाखत यासंदर्भातील पत्रव्यवहार ई-पत्राद्वारेच केला जाईल. टपालाने पत्रव्यवहार केला जाणार नाही.
१६) उमेदवाराच्या वयाची कमाल वयोमर्यादा ४५ असेल.

ह्यासाठी काही सूचना -
०१. खाली दिलेला ऑनलाइन अर्ज मराठीत (युनिकोड-संकेतप्रणाली वापरून) भरायचा आहे. त्याचप्रमाणे संकेतस्थळावर असलेला पीडीएफ धारिकेतील अर्ज उतरवून घेऊन पूर्ण भरून सर्व आवश्यक कागदपत्रे आणि धनाकर्षासह रविवार, दि. २५ ऑगस्ट, २०१९ रोजी सकाळी १० वाजता फर्ग्युसन महाविद्यालय येथे हजर रहावे.

०२. सर्व अर्ज मराठीतच भरणे आवश्यक आहे.
०३. आपला अर्ज दिलेल्या मुदतीत म्हणजे दि. १७ ऑगस्ट, २०१९ पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.
०४. निर्धारित मुदतीत ऑनलाईन अर्ज भरलेल्या सर्व उमेदवारांनी लेखी परीक्षा आणि मुलाखतीसाठी रविवार, दि. २५ ऑगस्ट, २०१९ रोजी सकाळी १० वाजता स्वखर्चाने फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे उपस्थित राहावे. सदर लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास त्याच दिवशी दुपारनंतर सायंकाळी ७ वाजेपर्यंत मुलाखती होतील.

खाली प्रथम आपला इ-टपालाचा पत्ता नोंदवावा. ह्या पत्त्यावर आपल्याला आपण ऑनलाइन भरलेल्या अर्जाची पोच पाठवण्यात येईल

Email address *
कोणत्या पदासाठी अर्ज करत आहात? *
Next
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.