Saraswati Shinde Education Society’s D.D.Shinde Sarkar College, Kolhapur. COVID-19 Pandemic General Awareness Quiz Organized by Department of Political Science and History
२०१९ हे वर्ष संपून २०२० या नूतन वर्षाची सुरवात होते न होते तोच जगातील जवळ जवळ २०० देशांना आपल्या विळख्यात घेणार्या एका विषाणूचा फैलाव वाढू लागला.थोड्याच कालावधीमध्ये अतिशय वेगाने थैमान घालणारा हा विषाणू म्हणजे 'कोविड-१९'. या विषाणूच्या संसर्गाचा रुद्रावतार पाहून जागतिक आरोग्य संघटनेने या विषाणूने बाधित देशांमध्ये महामारी घोषित केली.आज या विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनातील सर्व अधिकारी, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, पोलीस,सफाई कामगार, अनेक संघटना व संस्था, सर्व नागरिक आपआपल्या परीने प्रयत्नशील आहेत. या अचानक उदभवलेल्या महामारीवर मात करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, व सामान्य नागरिकांमध्ये जाणीव-जागृती निर्माण होणे आवश्यक आहे. प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेच. तसेच आमच्या सरस्वती शिंदे एज्युकेशन सोसायटीच्या डी.डी.शिंदे सरकार महाविद्यालयानेही काही प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने या महाविद्यालयातील राज्यशास्त्र व इतिहास विभागांच्या वतीने वरील उलेखिलेल्या सर्व घटकांमध्ये कोविड-१९ म्हणजे काय? त्याचा फैलाव रोखण्यासाठीचे उपाय, त्यावरील उपचार, सरकारने उचललेली पावले इत्यादी बाबत जागृती निर्माणकरून त्यांच्यामध्ये सचेतना निर्माण करण्यासाठी एक प्रश्नावली तयार केली आहे. ती सोडवून आपण सर्वांनी या आमच्या प्रयत्नात आपला सहभाग नोंदवावा. तसेच ही माहीती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून कोविड-१९ विषयीची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल यासाठी सहकार्य करावे, ही नम्र विनंती. (खालील लिंकवर सदर प्रश्नावली उपलब्ध आहे). प्राचार्य, डॉ.पी.आर.शेवाळे समन्वयक डॉ.अमिता संजीव कणेगावकर (राज्यशास्त्र विभागप्रमुख ) ९७३०१९३८९३ डॉ.वैशाली अभिजित सारंग (इतिहास विभागप्रमुख ) ९९६०७२४२०३
Stay Home, Stay Safe. Co-operate Government to overcome COVID-19 Pandemic
सूचना:
१. सर्वप्रथम दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
२. आपले पूर्ण नाव, ई-मेल आय.डी., महाविद्यालयाचे/शाळेचे/संस्थेचे नाव, मोबाईल नं. इत्यादी माहीती अचूक भरा.
३. विचारलेल्या दहा प्रश्नांची उत्तरे द्या व सबमिट(submit) करा.
४. सहभागींना प्रमाणपत्र मिळेल.

Email *
Next
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy