व्यवस्था परिवर्तनाचा जाहीरनामा
अपारदर्शक कारभार, वाढती गुंडगिरी, भ्रष्टाचार या व्यवस्थेला पोखरणाऱ्या समस्यांनी आज सामान्य पुणेकर त्रस्त आहे. या समस्यांमुळे पुण्यातील नागरी प्रश्न सुटणं आज कठीण बनलं आहे. ही परिस्थिती बदलायची तर काही मूलभूत अशी पावले व्यवस्था परिवर्तनाच्या दिशेने उचलावी लागतील. त्या दृष्टीने हा नागरिकांतर्फे व्यवस्था परिवर्तनाचा जाहीरनामा बनवला आहे. पुणे महापालिकेचा कारभार पारदर्शक आणि लोकसहभाग असणारा व्हावा यासाठी हा जाहीरनामा बनवला आहे. परिवर्तनतर्फे नगरसेवकांचे प्रगतीपुस्तक बनवले जाते. त्यात या जाहीरनाम्याचे पालन केले आहे किंवा नाही याची नोंद घेतली जाणार आहे.


मी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीस उभा/उभी आहे. नगरसेवक/नगरसेविका म्हणून निवडून आल्यास,

1) महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत माझी उपस्थिती किमान ७५% असेल.

2) माझ्या प्रभागात मी दर ३ महिन्यांतून एकदा, मतदारांची प्रभागसभा घेईन.

3) मतदारांनी बनलेल्या प्रभागसभेची मंजुरी असल्याशिवाय मी प्रभागस्तरीय निधीचा वापर करणार नाही.

4) निवडणुकीच्या वेळेस ज्याप्रमाणे स्वतःच्या संपत्तीची, उत्पन्नाच्या स्रोतांची आणि दाखल गुन्ह्यांची माहिती जाहीर करावी लागते त्याप्रमाणे ही माहिती मी दर वर्षी प्रसिद्धीपत्रक देऊन जाहीर करेन.

5) माहिती अधिकाराच्या कलम ४ नुसार पालिकेच्या प्रत्येक कामाच्या जागी माहितीचे फलक लावणे बंधनकारक असते. असे फलक माझ्या प्रभागात न लावणाऱ्या ठेकेदार-कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले जावे यासाठी मी लेखी तक्रार करून प्रयत्नशील राहीन.

संपूर्ण नाव *
Your answer
दूरध्वनी क्रमांक *
Your answer
प्रभाग क्रमांक
Submit
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service