घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा - प्रवेश अर्ज
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १० सप्टेंबर २०२१ ते १९ सप्टेंबर २०२१ या कालावधीत ‘घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेचा विषय ‘उत्सव गणेशाचा, जागर मताधिकाराचा’हा होता.

या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध भागांतून एकूण ३६० स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत पुणे येथील रवींद्र भूजबळ यांना प्रथम पारितोषिक, कोल्हापूर येथील अक्षत पाटील यांना द्वितीय पारितोषिक, तर पुणे येथील रोहिदास तुपसौंदर यांना तृतीय पारितोषित प्राप्त झाले आहे. याशिवाय, अकरा स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत, त्यांची नावे पुढीलप्रमाणे : प्रवीण पाटील (जळगाव), आर्यन जोशी (भुसावळ), नेमाबाई शिंदे (पंढरपूर), संतोष माहिते (सांगली), रमेश धुमाळ (रायगड), वसंतराव देशमुख (बुलडाणा), नवनाथ इथापे (मुंबई), संतोष जोशी (जालना), सुनील तवर (धुळे), जयश्री साठे (लातुर), हनमंत भोसले (मुंबई).

सदर स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे २१ हजार रुपये, ११ हजार रुपये आणि ५ हजार रुपये; तसेच मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त अकरा विजेत्यांना प्रत्येकी एक हजार रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. सदर स्पर्धेच्या परीक्षणाचे काम व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर आणि मुक्त पत्रकार प्रथमेश राणे, आणि स्वीप कार्यक्रमाचे सल्लागार दिलीप शिंदे यांनी पाहिले.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy