मधु मक्षिका पालन प्रशिक्षण सूचना
सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनींनो मधमाशीपालन (मधुमक्षिका पालन) हा व्यवसाय शेतीला पूरक व्यवसाय म्हणून रुजावा तसेच ग्रामीण युवकांना व युवतींना रोजगार मिळावा तसेच विद्यार्थी , विद्यार्थिनी तसेच विस्तार कर्मचारी बंधू यांच्यामधील मधमाशीपालना संदर्भातील कौशल्य व ज्ञान वृद्धिंगत व्हावे यादृष्टीने नॅशनल हनी बोर्ड (एन. एच. बी ) पुरस्कृत मधमाशी पालन (मधुमक्षिका पालन) या विषयावर लवकरच कृषी विज्ञान केंद्र करडा जिल्हा वाशिम यांच्या वतीने ऑनलाइन तसेच ऑफलाइन प्रशिक्षणाचे आयोजन केले जाणार आहे. या कार्यक्रमाअंतर्गत एकूण पाच प्रशिक्षणे ऑफलाइन पद्धतीने प्रात्यक्षिकासह (प्रति प्रशिक्षण पंचवीस प्रशिक्षणार्थी निवडून) व एक ऑनलाईन प्रशिक्षण (पंचवीस प्रशिक्षणार्थी निवडून) आयोजित केले जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी ज्यांना लिहिता वाचता येते, ज्याच्या कडे मोबाईल आहे, ज्यांचे ईमेल अकाऊंट आहे, ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे व मधुमक्षिका पालन हा व्यवसाय करण्याची इच्छा आहे अशा इच्छुक उमेदवारांनी कृषी विज्ञान केंद्र करडा जिल्हा वाशिम यांच्याकडे खालील निर्देशित लिंक वर क्लिक करून अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचा आहे. या लिंक द्वारे या प्रशिक्षणासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 मार्च 2021 असून त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार होणार नाही याची नोंद घ्यावी. प्राप्त अर्जापैकी प्रशिक्षणासाठी निवडलेल्या प्रशिक्षणार्थींना व्हाट्सअप ग्रुप द्वारे/ ई-मेल द्वारे/ अथवा दूरध्वनी संदेशाद्वारे कळविले जाईल व निवडलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणाची लिंक पाठवल्या जाईल तसेच ऑफलाइन प्रशिक्षणा संदर्भात सुद्धा नंतर कळवले जाईल. तेव्हा इच्छुक उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक प्रमाणे उशिरात उशिरा दिनांक 25 मार्च 2021 पर्यंत अर्ज करावेत.या प्रशिक्षणा संदर्भात प्रशिक्षणार्थी निवड तसेच इतर बाबतीतील संपूर्ण अधिकार व वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम यांनी राखून ठेवले आहेत याची नोंद घ्यावी.

तरी इच्छुक उमेदवारांनी खालील अर्ज भरून ऑनलाईन अर्ज करावा
नाव *
लिंग *
मोबाईल नं *
पत्ता
जातीचा प्रवर्ग *
ई-मेल आय डी
आधार कार्ड नंबर *
प्रशिक्षणासाठी आपल्याकडे स्मार्ट फोन व झूम एप आहे काय?
Clear selection
Submit
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy