खाली दिलेला उतारा वाचा. व योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक निवडा
एव्हरेस्टवर चढाई
आपल्या शरीराचा तोल सांभाळत तेनसिंह आणि हिलरी काळजीपूर्वक एव्हरेस्टच्या शिखराची चढाई करत होते. ते थकलेले होते. परंतु ते आशा न सोडता धैर्याने पुढे जात होते. बर्फात पाय ठेवण्यासाठी तेनसिंहने बर्फ किती खोलवर आहे हे शोधण्याकरिता खड्डा केला. चढाई करताना त्यांना 12 मीटर उंच सुळका दिसला.
अत्यंत कठिण परिस्थितीत, काळजीपूर्वक त्यांनी सुळका सर केला. अखेर त्यांचा संघर्ष संपला. ते एव्हरेस्टच्या शिखरावर होते. एव्हरेस्ट हे जगातील सर्वांत उंच शिखर आहे. तेनसिंह आणि हिलरीने उत्साहाने एकमेकांकडे पाहिले. त्यांची हृदये आनंदाने ओसंडत होती.