प्र.1. सुहास सकाळी 9 वाजता ऑफिसला निघाला तेव्हा सूर्य त्याच्यासमोर होता. नंतर तो उजवीकडे काटकोनात वळला. पुन्हा उजवीकडे काटकोनात वळला तर आता तोंड कोणत्या दिशेला असेल ?
*प्र.2. पुष्पा पूर्वेकडे तोंड करुन उभी आहे ती दोन वेळा काटकोनात डावीकडे वळली व देवळात गेली तर देवळाचे प्रवेशद्वार कोणत्या दिशेला आहे ?
*प्र.3. अमोलचे घर शाळेच्या पूर्वेकडे आहे. शाळेतून घरी जायला तो पुढील मार्गाचा अवलंब करतो. अमोलची ही माहिती वापरुन पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. अमोल शाळेतून घरी जाताना किती वेळा दक्षिण दिशेला वळतो ?
*प्र.4. मिहिर पूर्वेकडे तोंड करुन उभा आहे. तो त्याच्या डाव्या बाजूने काटकोनात दोन वेळा फिरला तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला येईल ?
*प्र.5. अमिता सायकलीने दोन किमी पूर्वेकडे गेली प्रत उजव्या बाजूस वळून 3 किमी अंतर जाऊन परत उजव्या बाजूस वळून 4 किमी जाऊन मंदीरात शिरली तर मंदीराचे प्रवेशद्वार कोणत्या दिशेला असेल ?
*प्र.6. 'क' या ठिकाणापासून बाणाच्या दिशेने 'ग' या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी किती वेळा डावीकडे वळावे लागेल?
*प्र.7. बँकेच्या पूर्वेस 4 किमी अंतरावर शाळा आहे. शाळेच्या उत्तरेस 6 किमी अंतरावर बाग आहे. बागेच्या पश्चिमेस 4 किमी अंतरावर व्यायामशाळा आहे. तर व्यायामशाळा व बँक यांमधील अंतर किती ?
*प्र. 8. संदीप, तनय, प्रियांका, अनुया, मंदार, काही पायऱ्यांवर उभे आहेत. प्रियांका व मंदार यांच्या मधल्या पायरीवर संदीप आहे. तनय अनुयाच्या वर सर्वात वरच्या पायरीवर उभा आहे. अनुया आणि मंदार लगतच्या पायऱ्यांवर उभे नाहीत तर मध्यभागी असेल्या पायरीवर कोण उभे आहेत ?
*प्र.9. संपत पश्चिमेला 16 किमी गेला नंतर तो उत्तरेला 13.5 किमी गेला त्यानंतर पूवेला 8.5 किमी गेला. नंतर दक्षिणेला 13.5 किमी जाऊन थांबला, तर तो मूळ ठिकाणापासून किती दूर गेला ?
*प्र.10. अ, ब, क, ड, इ, फ, ग ही गावे खाली दिल्याप्रमाणे वसलेली आहेत. 'अ' हे 'ब' च्या दक्षिणेस 3 किमी आहे 'क' हे 'अ' च्या पश्चिमेस 3 किमी आहे. 'ड' हे 'क' च्या उत्तरेस 6 किमी आहे. 'इ' हे 'ड' च्या पश्चिचमेला 6 किमी आहे. 'ड' हे 'फ' च्या दक्षिणेला 3 किमी आहे. 'ग' हे 'ब' च्या पश्चिमेला 5 किमी आहे. तर 'फ' हे 'क' पासून किती दूर व कोणत्या दिशेला आहे ?
*