अलीकडेच माझ्या आईचे एक काका आम्हाला भेटायला आले. ते एक निवृत्त कर्नल आहेत आणि काहीसे निसर्गवादी आहेत. ते आणि मी पक्षांबद्दल बोलत होतो आणि त्यांनी मला एक विलक्षण गोष्ट सांगितली. कोलकात्यामध्ये त्यांच्या बागेत एक कुरण असून त्याच्या एका बाजूस उंच झाडे आहेत. या झाडांच्या सावलीमध्ये ना गवत उगवणार, ना फुले. म्हणून काकांनी ती तोडून टाकायचे ठरवले. यापैकी एका झाडावर एका कावळ्याच्या जोडीने घरटे बांधले होते. ते कुणालाच माहीत नव्हते. जेव्हा फांद्या जमीनीवर कोसळल्या तेव्हा घरट्याचे आणि अंड्याचे तुकडे तुकडे झाले. आपल्या हानीबद्दल आक्रोश करण्यात समाधान न मानता बाबा आणि आई कावळ्यांनी सूड घोषित केला. त्यानंतर आठवड्याच्या आठवडे जेव्हा जेव्हा कुणीही बागेत दिसायचे तेव्हा तेव्हा कावळे चोचीने आणि पंज्यांनी हल्ला चढवायचे. छोट्या काळ्या लढाऊ विमानां प्रमाणे ते झेप घ्यायचे आणि कधीकधी रक्तही काढायचे ! 1. निसर्गवादी असल्याकारणाने निवेदकाचे काका... *