Personal Online Counseling साठी रजिस्टर करा !
'आपलं मानसशास्र' या मानसशास्त्रीय विचारमंचाची ही अधिकृत सर्व्हिस असून यामध्ये दैनंदिन जीवन समाधानकारकपणे जगता न येणाऱ्या व्यक्तींना कॉउन्सिलिंग मार्फत योग्य दिशा देऊन त्यांना त्यांचे आयुष्य समाधानकारकपणे जगता यावे, हा या सर्व्हिसचा मुख्य हेतू आहे.
समाजात स्वतंत्रपणे किंवा बंधिस्तपणे वावरताना असंख्य मानसिक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते आणि ही एक स्वाभाविक आणि नैसर्गिक अशी प्रक्रियाच आहे. जोपर्यंत त्या समस्येची तिव्रता ही सौम्य स्वरुपाची आहे तोपर्यंतच ! परंतु यापैकी बहुतेक व्यक्तींना समस्यांना सामोरे जाताना निश्चित असा मार्ग सापडत नाही, त्यामुळे ते अशा समस्येच्या खोलवर आणखीन भरकटतात आणि नव्याने पसरलेल्या या मानसिक जखमेला दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतात. यातील तर बहुतेकांना ही समस्या दुर्लक्ष करताच येत नाही. दुर्लक्ष होवो अथवा न होवो, तरी ही समस्या त्यांचे दैनंदिन जीवन हळुहळु उध्वस्त करीत असते. मग कामात लक्ष न लागणे, एकाकी वाटणे, भावनांचा गोंधळ होणे, जवळच्या मित्रांचा दुरावा, भ्रम होणे, भूक न लागणे, चिडचिड होणे, आत्महत्या सारख्या विचारांचा स्पर्श होणे, विचित्र स्वप्ने पडने, रात्री दचकून जागे होणे, किंबहुना रात्री झोपच न लागने इ. अशा लक्षणांनी त्याचे दैनंदिन जीवन पार उध्वस्त होते.
अशा सर्वांसाठी ही Online सुविधा आपण उपलब्ध करून देत आहोत.
या सर्व्हिस विषयी थोडक्यात माहिती :-
१. ही सर्व्हिस पूर्णपणे online म्हणजेच फोनवर घेतली जाईल.
२. यामध्ये एकूण ३-४ सेशन असतील. आणि त्यात काही ठराविक दिवसांचे अंतर असेल. (नेमकं काय असेल, ही माहिती संपर्क केल्यावर मिळेल)
३. कॉउन्सिलिंगच्या या संपूर्ण प्रक्रियेत आम्ही कोणत्याही औषधांचा सल्ला देत नाही. आमचा संपूर्ण भर हा कॉउन्सिलिंग, मेडिटेशन आणि सायकोथेरेपीवरच असतो-असणार.
४. समस्येचे मूळ कारण शोधून पुढील ९० दिवसांची उपचाराची दिशा ठरवली जाते.
५. दिलेले कार्य सातत्याने, प्रामाणिकपणे करूनही गुण न आल्यास भरलेल्या रकमेची ९१ व्या दिवशी परतफेड केली जाते.
एकूण शुल्क :- ९५० रु / मात्र. (एकदाच भरायचे आहे)
टीप - सेशन सुरू होण्याअगोदर आपल्याला शुल्क online रीतीने पाठवायचे आहे. त्याशिवाय सेशन सुरू करता येणार नाही.
'आपलं मानसशास्त्र' च्या या अभिनव सुविधेत आपलं मनःपूर्वक स्वागत. कृपया खाली दिलेला फॉर्म काळजीपूर्वक भरा !