राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS) नमुना सराव पेपर 1 इयत्ता नववी 
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे  *
प्र. 1-6) खालील संवाद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे दया.

वडील : चल पायल, आपण नदीकिनारी फिरायला जाऊ या.

पायल : हो बाबा, आज छान वारा सुटलाय.

वडील : तुला जमिनीवर पडलेली ही सर्व पाने दिसताहेत काय ? मी तुझ्या वयाचा होतो, तेव्हा छंद म्हणून पाने आणि फुले पुस्तकात ठेवत असे.

पायल : हा कसला छंद आहे ?

वडील : अगं, मी पाने आणि फुले जुन्या वर्तमानपत्रात काळजीपूर्वक पसरवून ठेवत असे.

पायल : पण तुम्ही ते कसे ठेवत होता ?

वडील : मी वर्तमानपत्रावर जड पुस्तके ठेवत असे. पाने दाबली गेल्यानंतर आणि सुकल्यानंतर मी ती रंगीत कागदावर चिकटवत असे.

पायल : बाबा! ते कागद अजूनही तुमच्याकडे आहेत काय ? मला ते बघायचे आहेत.

वडील : हो! आहेत ना! पण या सुटीत तू तुझी स्वतःची चिकटवही का नाही तयार करत ?

पायल : हं...! कल्पना चांगली आहे. मी आवडणारी फुले गोळा करेन आणि ज्यामध्ये ती ठेवेन, त्या प्रत्येक पानावर तारखेसह नाव लिहीन..

वडील : लक्षात ठेव. फुले आणि पाने गोळा करणे निरुपयोगी काम नाही. तुला वेगवेगळ्या झाडांविषयी बरेच काही शिकता येईल. तसेच या छंदामुळे तू निसर्गाच्या जवळही जाशील.

पायल : मला खात्री आहे, की निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याने मलाही खूप आनंद मिळेल.

प्र. 1) लहान असताना वडिलांना काय गोळा करण्याचा छंद होता ?

*
2 points

प्र. 2 ) वडील वर्तमानपत्रावर जड पुस्तके का ठेवत होते ?

*
2 points

प्र. 3) वरील संवादानुसार वडिलांच्या मते चिकटवही म्हणजे काय ?

*
2 points
प्र. 4) चिकटवही बनविण्यासाठी सर्वांत आधी काय करायला हवे ?
*
2 points

प्र. 5) खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर नाही ?

*
2 points
प्र. 6) वडिलांनी फिरायला जाताना पायलला काय दाखविले ?
*
2 points
प्र. 7-12) खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे दया.

जगभरात वाहतुकीच्या साधनांमध्ये सायकल किंवा बायसिकल सगळ्यात स्वस्त आणि सर्वत्र उपलब्ध असणारे साधन आहे. 'बायसिकल' हा शब्द, इंग्रजीच्या 'बाय' म्हणजेच 'दोन' आणि ग्रीक शब्द 'कुकलोस' म्हणजे 'चाक' या शब्दांपासून बनलेला आहे.

सर्वांत आधी सायकल लाकडापासून तयार करण्यात आली होती आणि त्यात पॅडल नव्हते. कालांतराने लोखंडी सायकली तयार झाल्या. त्यात चेन आणि टायर नव्हते. १८६० मध्ये दोन फ्रेंच अभियंत्यांनी पुढे मोठे चाक आणि पॅडल, त्याला मागे लहान चाक लावून दोन्ही चाके जोडली. उंच आसन आणि चाकांचे असमान वजन या त्रुटींमुळे या सायकली चालविणे त्रासदायक होते. पुढील चाकाचा व्यास कमी करून आणि सीट मागे करून या अडचणीवर तोडगा काढण्यात आला. आजच्या काळात मागील आणि पुढील चाके गिअरने जोडलेली असतात.

आजकाल बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या सायकली उपलब्ध आहेत. शर्यतीच्या सायकलींना अनेक गिअर असतात आणि त्या खूप महाग असतात. मनोरंजनासाठी देखील सायकली असतात. प्रामुख्याने त्या सर्कशीत वापरल्या जातात. व्यायामासाठी आणि डोंगराळ भागात चालविण्यासाठी वेगळ्या प्रकारच्याही सायकली असतात. सायकल चालविण्याचा आनंद वेगळाच असतो. त्यामुळे प्रदूषणही होत नाही. त्यासाठी कोणत्याही प्रकारचे इंधन लागत नाही. सायकल चालविण्यासाठी कोणत्याही परवान्याची गरज नसते.

भारतातील ग्रामीण भागात सायकल हे वाहतुकीचे महत्त्वाचे साधन आहे कारण, शेतातून आणि जंगलातून सायकल सुलभतेने चालवता येते. शहरातही वाहनांची गर्दी टाळण्यासाठी बरेच जण सायकलीचा अधिक वापर करू लागले आहेत. आपणही कारच्या ऐवजी सायकल वापराला प्रोत्साहन दिले पाहिजे. सायकलस्वारांसाठी स्वतंत्र मार्गिका तयार केल्या जाव्यात आणि निःशुल्क सायकल स्टॅन्डची सोय असावी. सायकल खरेदीसाठी बँकांनी कमी व्याजदराने कर्ज दिले पाहिजे. म्हैसूरसारख्या शहरात सरकारने व्यापक प्रमाणात ‘शेअर्ड सायकल' ही योजना सुरू केली आहे. यात काही तासांसाठी किंवा काही दिवसांसाठी सायकल भाड्याने मिळते.

प्र. 7) खालीलपैकी सर्वांत जुनी सायकल कोणती ?
*
2 points

प्र. 8) दुसरा परिच्छेद कशाविषयी आहे ?

*
2 points

प्र. 9) शर्यतीची सायकल ही साध्या सायकलीपेक्षा कशी वेगळी आहे ?

*
2 points

प्र. 10) सायकल कारपेक्षा चांगली असते, कारण........

*
2 points

प्र. 11 ) ग्रामीण आणि शहरी भागात सायकलीचा समान फायदा कोणता ?

*
2 points

प्र. 12) फ्रेंच अभियंत्यांनी तयार केलेल्या सायकलींमध्ये कोणती त्रुटी होती ?

*
2 points

प्र. 13-18) खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे दया.

आपले ऊर्जा स्रोत

पृथ्वीसाठी प्रमुख ऊर्जास्रोत सूर्य आहे. सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचल्याने हवा, जमीन आणि समुद्राला उष्णता मिळते. दुसऱ्या शब्दात म्हटले तर सूर्यामुळे पृथ्वी तापते. परंतु ही उष्णता सगळीकडे समप्रमाणात नसते. पृथ्वीच्या विविध भागात सूर्यप्रकाश आणि त्याचा कालावधी वेगवेगळा असतो.

पृथ्वीला संपूर्ण ऊर्जा प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे सूर्याकडून मिळते. ही ऊर्जा आपल्यापर्यंत प्रकाश आणि उष्णतेच्या स्वरूपात पोहोचते. चंद्राकडून मिळणारा प्रकाश देखील सूर्याचाच असतो. चंद्र एका मोठ्या आरशासारखा असून तो सूर्याची किरणे पृथ्वीकडे परावर्तित करतो.

आपल्याला विदयुत ऊर्जा देखील अप्रत्यक्षपणे सूर्याकडूनच मिळते. कशी ? आपण विदयुत ऊर्जा तयार करण्यासाठी खूप उंचावरून पडणाऱ्या जलशक्तीचा वापर करतो. हे पाणी पावसामुळे मिळते. आपल्याला माहिती आहे, की सूर्यामुळे जमिनीवरील पाणी तापते. हे पाणी वाफ होऊन वर जाते आणि पावसाच्या रूपात खाली पडते.

कोळशामुळे आपल्याला मिळणारा प्रकाश आणि औष्णिक ऊर्जा अप्रत्यक्षपणे सूर्याकडूनच मिळते. आपल्याला माहिती आहे, की सर्व वनस्पती, झाडे सूर्यप्रकाशामुळे वाढतात. वनस्पती आणि वृक्ष खडकांखाली शेकडो वर्षांपर्यंत दाबले जाऊन कोळसा तयार होतो म्हणूनच सूर्याशिवाय पृथ्वीवर जीवन अशक्य आहे.

प्र. 13) पृथ्वीला सूर्याची ऊर्जा कशी मिळते ?

*
2 points

प्र. 14) आकाशात वाफ थंड होते, तेव्हा ती कशाच्या रूपात खाली पडते ?

*
2 points

प्र. 15) खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही.

*
2 points

प्र. 16) डोंगरावरून पडणाऱ्या जलशक्तीपासून आपल्याला काय मिळते ?

*
2 points

प्र. 17) उताऱ्यात म्हटल्याप्रमाणे, सूर्य नसल्यास काय होईल ?

*
2 points
प्र. 18) वनस्पती आणि वृक्ष शेकडो वर्षांपर्यंत खडकांखाली----------------- 'कोळसा तयार होतो ?
*
2 points
प्र. 19-25) खालील जाहिरात वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे दया.

प्र. 19) ग्रीष्मोत्सव काय आहे ?

*
2 points

प्र. 20) खालीलपैकी कुणासाठी बसची सोय नाही ?

*
2 points

प्र. 21 ) ग्रीष्मोत्सवात मुलांना काय करता येईल ?

*
2 points

प्र. 22 ) ग्रीष्मोत्सवात कोणाला भाग घेता येईल ?

*
2 points

प्र. 23) ग्रीष्मोत्सवातील कोणता कार्यक्रम 5 ते 8 वयोगटातील मुलांसाठी खुला आहे ?

*
2 points

प्र. 24) सादरीकरणाची कला म्हणजे काय ?

*
2 points

प्र. 25) मिश्र कलांमध्ये कोणता प्रकार येतो ?

*
2 points
Next
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.