प्र.13 ते प्र.15 साठी सूचन- खालील उतारा वाचा व प्रश्नांची उत्तरे द्या.
भीमाशंकर अभयारण्य म्हणजे किर्र झाडंझुडपं आणि वेली यांचं साम्राज्य. येथे अनेक वेली आणि वनस्पतीत औषधी गुणधर्म आहेत. झाडावर काळतोंडी वानरे धुडगूस घालत असतात. दुर्र. दुर्र.. करणारा शेकरूही येथे नजरेस पडतो. त्याला जायंट स्विरल असेही म्हणतात. राज्यप्राणी म्हणून त्याचाच खास मान आहे. बिबळे, वाघ, ससे, सांबरे, भेकरे, उदमांजरे या प्राण्यांचा वावर आपणास पाहायला मिळतो. रानडुकरे, तरस, खवलेमांजर इत्यादी प्राणीही येथे मोठ्या प्रमाणात आढळतात.