“रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र”- इच्छुक विद्यार्थी/ उमेदवारांनी तसेच उद्योग,
उद्योग समूह , MSME, आस्थापना व नियोक्त्यांनी भरावयाचा फॉर्म
“
रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र” या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी महाराष्ट्रभर एकाच दिवशी 800+ रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात येत आहेत.
राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य व आवडीनुसार विविध उद्योग व आस्थापनांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या रोजगार मेळाव्यांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या रोजगार इच्छुक युवक-युवतींनी
तसेच उद्योग,
उद्योग समूह , MSME, आस्थापना व नियोक्त्यांनी खालील नोंदणी अर्जामध्ये आवश्यक प्राथमिक माहिती भरावी. प्राप्त माहितीनुसार उपलब्ध रोजगार संधी, संबंधित कंपनी तसेच रोजगार मेळाव्याचे ठिकाण याबाबत पुढील माहिती संबंधित यंत्रणेमार्फत कळविण्यात येईल.