कंबर बांधून ऊठ घाव झेलाया महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया। महाराष्ट्र मंदिरापुढती। पाजळे याशीची ज्योती सुवर्ण धरा खालती। निल अंबर भरले वरती गड पुढे पोवाडे गाती। भूषवी तिला महारथी ही मायभूमि धीरांची। शासनकर्त्या वीरांची घामाची आणि श्रमाची खुरप्याची आणि दोरीची तो अरबी सागर लागे जयाचे पाया महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया।। संतांची शाहीरांची। त्यागाच्या तलवारीची स्मरून धुरंधर आता त्या शिवराया महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया।। पहा पर्व पातले आजचे । संयुक्त महाराष्ट्राचे साकार स्वप्न करण्याचे। करी कंकण बांधून साचे पर्वत उलथून यत्नाचे। सांधू या खंड की त्याचे या सत्यास्तव मैदानि शंख फुंकाया महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया।।। वरील कवितेच्या आधारे दिलेल्या सुचनेनुसार कृती करा: महाराष्ट्राची सांस्कृतिक वैशिष्ट्ये कोणती? *