मूर्ती संकल्पना स्पर्धा

चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ स्थापना : १९२० ( रजिस्ट्रेशन नं : ७१६५/ ७९ मुंबई )
Email address *
मूर्ती संकल्पना स्पर्धा
महाराष्ट्राच्या मुर्तीकारांसाठी सुवर्णसंधीतुमच्या संकल्पनेतून साकार करा "चिंचपोकळीचा चिंतामणी"
चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे यंदाचे वर्ष २०१९ हे शतक महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करीत आहे. या निमित्ताने मंडळाच्या वतीने महाराष्ट्रातील मुर्तीकरांसाठी चिंतामणी २०१९ ही स्पर्धा येत्या ६ एप्रिल २०१९ गुढीपाडवा मराठी नववर्ष दिनी होणार आहे या स्पर्धेत भाग घेऊन मुर्तीकरांसाठी तुमच्या संकल्पनेतून शाडूच्या मातीचा "चिंचपोकळीचा चिंतामणी" साकारायचा आहे. पहिल्या १०० स्पर्धकांना प्राधान्य देण्यात येईल
स्पर्धकांनी स्पर्धा अर्ज मंडळाचे मुख्य कार्यालय अ/३ प्रोग्रेसिव्ह, दत्ताराम लाड मार्ग,चिंचपोकळी येथून घेऊन जावे अथवा अधिक माहिती करिता श्री.अतुल घाग यांच्याशी ९९६९५२२३२३ व मानदसचिव श्री.वासुदेव सावंत यांच्याशी ८३६९३५५८६७ या क्रमांकावर संपर्क साधावा
स्पर्धेची पारितोषिके

* प्रथम क्रमांक रोख रुपये ५००००/- व सन्मानचिन्ह
मूर्तिकार कै.दिनानाथ वेलिंग यांच्या स्मरणार्थ

* द्वितीय क्रमांक रोख रुपये ४००००/- व सन्माचिन्ह
मूर्तिकार कै.श्याम सारंग यांच्या स्मरणार्थ

*तृतीय क्रमांक रोख रुपये ३००००/- व सन्मानचिन्ह
मूर्तिकार कै. विजय खातू यांच्या स्मरणार्थ

उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक रोख रुपये १००००/-

उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक रोख रुपये ७५००/-

स्पर्धेचे नियम व व अटी :
१) मूर्तीची उंची आसनापासून कमीत कमी १५ इंच व जास्तीत जास्त १८ इंच असावी. त्याहून अधिक उंची असल्यास स्पर्धेस ग्राह्य धरली जाणार नाही.
२) मूर्तीला प्रभावळ नसली तरी चालेल.
३) मूर्तीची रंगसंगती कोणत्याही प्रकारची असली तरी चालेल. (उदा. मोनोक्रोमॅटिक, अक्रोमॅटिक, कलर्ड)
४) मूर्ती शाडूच्या मातीची असावी.
५) मूर्तीची संकल्पना नवीन असावी. त्यांना प्राधान्य दिले जाईल.
६) साच्यामधल्या मूर्तीला जास्त महत्व दिले जाणार नाही.
७) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
८) स्पर्धेमध्ये काही बदल झाल्यास त्याचे सर्वाधिकार मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडे असतील.
९) मूर्तीकाराने यासंदर्भात नोंदणी कार्यालयात करावी किंवा नमूद फोनवर किंवा वेब फॉर्म भरावा.
१०) दि. २ एप्रिल २०१९ ते ३ एप्रिल २०१९ या दिवशी मूर्ती कार्यालयात सुपूर्द करावी.
११) दि. ६ व ७ एप्रिल २०१९ रोजी प्रदर्शन भरवण्यात येईल.
१२) मूर्ती सोबत प्रवेश अर्ज आणणे आवश्यक आहे.
१३) प्रदर्शनात मांडण्यात येणाऱ्या गणेश मूर्तीची विक्री झाल्यास ६०% रक्कम त्या मूर्तिकारास देण्यात येईल.
१४) प्रदर्शनासाठी मूर्ती निवडण्याचा अधिकार मंडळाकडे राहील.
१५) स्पर्धेचा निकाल ६ एप्री रोजी सायंकाळी ६ वाजता घोषित करण्यात येईल.
१६) प्रदर्शन दि. ६ व ७ रोजी सकाळी १० ते रात्री. ८ वाजेपर्यंत रसिकांना खुले राहील.
१७) पारितोषिक विजेत्या पहिल्या ३ व २ उत्तेजनार्थ मूर्ती वर्षभर मंडळाच्या ताब्यात राहतील.
संपूर्ण नाव *
Your answer
पत्ता *
Your answer
मोबाईल क्र. *
Your answer
A copy of your responses will be emailed to the address you provided.
Submit
Never submit passwords through Google Forms.
reCAPTCHA
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service