डॉ.सरोजिनी बाबर जन्मशताब्दीनिमित्त... ‘लोकसाहित्य सादरीकरण’ स्पर्धा
लोकसाहित्याच्या अभ्यासक सरोजिनी बाबर यांच्या जन्मदिनाला यंदा शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. १९६१ ते १९९३ एवढा प्रदीर्घ काळ त्या महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीच्या अध्यक्ष होत्या, अध्यक्ष असताना तब्बल ३२ वर्ष त्यांनी लोकसाहित्याचे संकलन-संपादन केले. लोकसाहित्यासाठी अवघे आयुष्य समर्पित करणाऱ्या मोजक्या लोकांपैकी त्या एक होत. त्यांच्या याच स्मृतींना उजाळा देण्यासाठी राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीनेे महाराष्ट्रभरात ‘लोकसाहित्य सादरीकरण’ अशा स्वरूपाची शालेय आणि खुल्या स्तरावरील स्पर्धा घेण्यात येत आहे.
महत्वाचे-

अ.सदरील स्पर्धा डिसेंबर २०१९ पासून सर्व जिल्हा केंद्रांवर सुरू होत आहेत.
आ.स्पर्धेच्या नियम, अटी आणि अधिक माहितीसाठी www.rmvs.in या संकेतस्थळाला आवर्जून भेट द्या.

नियम आणि अटी

१. ही स्पर्धा शालेय आणि खुल्या या दोन गटांसाठी असेल.( ८ वी ते १० वी शालेय गट तसेच त्यावरील खुला गट)स्पर्धेसाठी
कलाकारांचा गट असणे आवश्यक, कलाकारांच्या संख्येची मर्यादा नाही.
२. प्राथमिक फेरीपासून असलेले कलाकारच शेवटपर्यंत असावेत, मध्येच कलाकार बदलता येणार नाहीत.
३. या स्पर्धेमध्ये लोकसाहित्याच्या सादरीकरणासोबतच त्याचे अर्थासह निवेदन करणे बंधनकारक असेल.
४. या स्पर्धेची प्राथमिक फेरी जिल्हास्तरीय असेल
५. प्राथमिक फेरीत प्रथम आलेला गट राज्यस्तरिय अंतिम फेरीस पात्र असेल
६. राज्यस्तरीय अंतिम फेरीतून अंतिम तीन प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच उत्तेजनार्थ विजेते गट निवडले जातील
७. जिल्हास्तरीय विजेत्यांना पुस्तक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम म्हणून पारितोषिक देण्यात येईल.
८. राज्यस्तरीय अंतिम पाच गटांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तक आणि रोख रक्कम देण्यात येईल.
९. स्पर्धकांसाठी परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
१०. इ. १० वी च्या पुढील सर्व इयत्तेतील विद्यार्थी हे खुल्या गटात गृहीत धरले जातील.
११. शालेय गटाने शाळा प्रशासनाचे पत्र प्राथमिक फेरीतच संस्थेच्या विभागीय समन्वयकांकडे जमा करणे बंधनकारक आहे. सदरील
पत्रावर सर्व कलाकारांची नावे आणि इयत्ता असणे आवश्यक.
१२. अर्जामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे सर्व कलाकारांची विचारलेली सर्व माहिती भरणे बंधनकारक आहे. (उदा. प्रत्येकाचा संपर्क क्रमांक,
प्रत्येकाचा ई-पत्ता, प्रत्येकाचा पत्ता) माहिती अपूर्ण असल्यास अर्ज स्विकारला जाणार नाही.
१३. निवेदन-निरूपण या प्रकारामध्ये निवडलेल्या लोकसाहित्यप्रकाराचा अर्थ उलगडून दाखवणे/सांगणे अभिप्रेत आहे.
१४. लावणी आणि पोवाडा या साहित्यप्रकारांची स्वतंत्र स्पर्धा लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मार्च २०२०
मध्ये घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकसाहित्य सादरीकरण स्पर्धेत हे दोन कलाप्रकार अभिप्रेत नाहीत, याची नोंद घ्यावी.
१५. सदरील स्पर्धेसाठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ नोव्हेंबर २०१९ असून त्यानंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
१६. कलाकारांनी निवडलेला कलाप्रकार फक्त ७ मिनिटांमध्येच सादर करणे बंधनकारक आहे. वेळेची मर्यादा (७ मिनिटे जिल्हा स्तर
आणि राज्य स्तर)
१७. कलाकारांनी सदरील स्पर्धेत फक्त एकच कलाप्रकार एकदाच सादर करावा, दोन किंवा अधिक कलाप्रकार सादर करण्याची परवानगी
नाही तसेच निवडलेला कलाप्रकार एकदाच सादर करणे बंधनकारक.
Email address *
केवळ ७ मिनिटांमध्ये कलाप्रकार सादर करणे बंधनकारक *
कोणत्या गटासाठी अर्ज भरत आहात? *
कलापथक/समूह/शाळा/महाविद्यालय आणि प्रमुखाचे नाव *
कलापथक/समूह/शाळा/महाविद्यालय पत्ता *
कलापथक/समूह/शाळा/महाविद्यालय ई-पत्ता *
कलापथक/समूह/शाळा/महाविद्यालय संपर्क क्रमांक *
कलाकारांची नावे *
कलाकारांचे पत्ते *
कलाकारांचे ई-पत्ते *
कलाकारांचे संपर्क क्रमांक *
कलापथक/समूह/शाळा/महाविद्यालयने निवडलेला कला प्रकार (लावणी आणि पोवाडा वगळून) *
Next
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy