Maharashtra High School & Jr. College, Kolhapur
प्रिय माजी विद्यार्थी मित्रहो,
आपणांस कळविणेस अत्यंत आनंद होत आहे की आपल्या श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींग हाऊस, कोल्हापूर या मातृसंस्थेला १ जुलै २०२० साली १०० वर्षे पूर्ण होत आहेत. हे शतकमहोत्सवी वर्ष १ जुलै, २०१९ पासून सुरु झाले आहे. या शतकमहोत्सवी वर्षात आपण विविध उपक्रम आयोजित करत आहोत. आम्ही खास आपल्या सर्वांसाठी या शतकमहोत्सवी वर्षात माजी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा आयोजित करू इच्छितो. यानिमित्ताने सर्व माजी विद्यार्थ्यांना आपल्या शाळेला व शाळेतील बालपणीच्या मित्रांना भेटण्याची संधी आम्ही उपलब्ध करून देत आहोत. गेल्या ५९ वर्षातील सर्व माजी विद्यार्थ्यांची माहिती यामाध्यमातून संकलित करण्याच्या हेतूने शाळेच्यावतीने एक फॉर्म तयार केला आहे. कृपया आपण खालील लिंकवर जाऊन क्लिक करून आपली माहिती भरून सहकार्य करावे ही विनंती.
आपल्या शाळेच्या जुन्या आठवणीतील संकलित वा उपलब्ध फोटो, व्हिडिओ बघण्यासाठी आपण एक साईट तयार केलेली आहे. http://psmb.ampapp.in याद्वारे आपण आपली नोंदणी करून व्यक्तिगत लॉगीन तयार करू शकता.
तसेच शतकमहोत्सवी वर्षात विविध संकल्प निर्धारित केलेले आहेत. त्यामध्ये आपल्या महाराष्ट्र हायस्कूलची इमारत नवीन बांधण्याचा निर्णय झाला असून निधी संकलनाचे काम सुरु करण्यात आले आहे. त्याकरिता आपल्या मातृसंस्थेला सढळहस्ते आर्थिक मदत करण्याचीही संधी आपण उपलब्ध केलेली आहे. तसेच संस्थेची शतक महोत्सवी स्मरणिका तयार करण्यात येणार आहे. त्यामध्ये आपली स्वतंत्र जाहिरातसुद्धा तुम्ही देऊ शकता.
टीप
१) निधी चेकने किंवा D.D. ने ‘श्री. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस, कोल्हापूर’ या नावाने काढू शकता.
२) आयकर सवलत u/s 80 G नुसार मिळेल.
३) संस्थेच्या खाते क्रमांकावर ऑनलाईन डोनेशनही स्वीकारले जाईल. ती सुविधा http://psmb.ampapp.in या साईटवर दिलेली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
9823640342 , 0231 2626982 , 9923499599
धन्यवाद!
आपले,
श्री. ए.एस.रामाणे,
प्राचार्य, महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूर
Next
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy