टिळकनगर शाळा, डोंबिवली - आवर्तन २

टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना सप्रेम नमस्कार,

२०१७ साली आपल्या शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आपण १९६५ पासून ते २०१७ पर्यंतच्या सर्व बॅच मधील माजी विद्यार्थ्यांना एकत्र बोलवून "आवर्तन - १" हा सोहळा दिमाखात पार पाडला होता. या कार्यक्रमात जवळजवळ १२०० माजी विद्यार्थी उपस्थित होते. त्याशिवाय अनेक माजी शिक्षक आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रम फार छान आणि उत्तम पार पडला. याचे सर्व श्रेय हे आपल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचेच आहे, यात शंका नाही.

आता आपल्या शाळेची दुसऱ्या इमारतीचे बांधकामही पूर्ण झाले असून, त्यानिमित्ताने आपण येत्या ५ जानेवारी २०२० , रविवार रोजी "आवर्तन - २" च्या निमित्ताने पुन्हा एकदा माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेत आहोत.

खालील लिंक मध्ये आपण आपली माहिती भरावी. कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये आपण मदत करू इच्छित असाल तर तसेही नमूद करावे, जेणेकरून आपल्याला निरोपाची व्यवस्था करता येईल.

अधिक माहितीसाठी शाळेच्या कार्यलयात अथवा खालील क्रमांकांवर संपर्क साधावा

आपला विश्वासू

---
तुमचे संपूर्ण नाव - (विवाहित विद्यार्थिनींनी आधीचे आणि नंतरचे दोन्ही नावे आणि आडनावे लिहिली तरी चालतील ) *
Next
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy