व्हिडीओ ५ – मीना आणि सुनीलची गोष्ट – नक्की काय चुकले? - चर्चेसाठी प्रश्न
Sign in to Google to save your progress. Learn more
१. सुनीलला मीनाचे तिच्या शाळेतील मैत्रिणींना भेटणे आवडायचे नाही असे का? *
0 points
२. कोणत्याही इतर पुरुषाशी - अगदी दुकानदार, भाजीवाला यांच्याशी देखील मीनाने अधिक बोललेले सुनीलला  खपत नसे. असे का? *
0 points
३. सुनीलच्या वागण्याचा मीना विरोध का करत नव्हती? *
0 points
४. सुनील मीनाशी वाईट का वागायचा? *
0 points
५. सुनीलला मीनाने विणकाम केलेले का आवडत नव्हते? *
0 points
६. स्वतःच्या घरातील व्यक्तींचे वर्तन पाहून सुनील चे काय मत झाले होते? *
0 points
७. सुनील मीनाच्या इच्छांचा आदर का करत नव्हता? *
0 points
८. खालील गोष्टी या मूल्यांशी संबंधित आहेत, इच्छेशी संबंधित आहेत की कौशल्यांशी हे सांगा. का? *
0 points
मूल्य
इच्छा
कौशल्य
पुरुष हे स्त्रियांपेक्षा श्रेष्ठ असतात असे वाटणे
पैशांचा हिशोब नीट न ठेवता येणे
आपले म्हणणे दुसर्यांपर्यंत नीट न पोहोचवता येणे
स्त्रियांनी स्वतःचे पैसे स्वतः कमावणे चूक आहे असे वाटणे
स्त्रियांना घराबाहेर जाऊन नोकरी करावीशी न वाटणे
पुरुषाला घरकाम आपणहून करावेसे न वाटणे
बायकोची चूक झाली तर तिला शिक्षा करण्याचा अधिकार पुरुषाला आहे
९. मूल्य, इच्छा आणि कौशल्य यांपैकी कशासंबंधीचा प्रश्न सोडविणे जास्त सोपे आहे असे तुम्हाला वाटते? का? *
१०. “स्त्रीचे वागणे खटकले तर तिला मारण्यात, तिला शिवीगाळ करण्यात, तिचा अपमान करण्यात काहीच गैर नाही” हे तुम्हाला पटते का? तुम्हाला याबद्दल काय वाटते? *
११. “आयुष्यात भाऊ, वडील, नवरा किंवा मुलगा अशा कोणत्यातरी पुरुषाचा आधार लागतोच” या विधानाबद्दल तुम्हाला काय वाटते? *
१२. “नवऱ्याला लैंगिक सुख जेव्हा हवे तेव्हा त्याला ते मिळालेच पाहिजे, बायकोने त्याला विरोध करू नये” या विधानाशी तुम्ही सहमत आहेत का?   *
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This form was created inside of ILS Law College. Report Abuse