हवामानामुळे आपल्या अन्नाच्या सवयी, कपडे आणि उद्योग यात बदल होतो. आपण हवामानाप्रमाणे कपडे घालतो. हिवाळ्यात आपण गरम लोकरीचे कपडे वापरतो. आपल्याला खेळायला आवडते आणि आपण बाहेर उन्हात बसतो. विजेच्या हिटरने किंवा धगधगता विस्तव ठेवून बसायच्या खोल्या गरम केल्या जातात. आपण गरम पाण्याने आंघोळ करतो. उन्हाळ्यात आपण मऊ किंवा फिक्या रंगाचे सुती कपडे वापरतो आणि झाडाच्या सावलीत किंवा घरात पंख्याखाली बसणे पसंत करतो. उन्हाळ्यात आपण लवकर थकतो. पावसाळा आपली गरमीपासून सुटका करतो. पावसाळ्यात चिकचिक वाटते आणि घामही खूप येत असतो.
धुक्यामुळे आणि वादळी हवामानामुळे त्रास होऊ शकतो आणि काही वेळा अपघातही होतात. रस्त्यावर वाहने चालवणे, खेळणे आणि बाहेर पडणेही कठीण होते. धुक्यामुळे पुढचे खूपच अस्पष्ट दिसते. अशा वेळी विमाने उशिरा पोहचतात आणि काही वेळा विमानोड्डाण रद्दही केले जाते. आपले रंगरूप, ज्या घरात आपण राहतो त्या घराचा प्रकार आणि आपण जे अन्न खातो, ते सर्व काही हवामान ठरवते. डोंगराळ भागातील लोक जास्त उजळ असतात, कारण तेथील हवा एवढी गरम नसते, गरम हवेच्या ठिकाणी राहणारे लोक सावळे असतात. समुद्रकिनारी राहणारे लोक मासे खातात.