खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्नक्रमांक ३१ ते ३४ ची उत्तरे पर्यायातून निवडा.
आजच्या काळात सामाजिक व आर्थिक विकासाचे साधन म्हणून शिक्षणाकडे पाहिले जाते. व्यक्ती व समाजात परिवर्तन घडवणारेही ते एक साधन मानले जाते. बर्दान्ड रसेलनाही असेच वाटते होते की, शिक्षणाने व्यक्ती बदलली की समाजही बदलेल. प्रारब्धवादी समाजव्यवस्थेला परिवर्तन कधीही मान्य नसते. स्थितीशिलता ही तिची आदिप्रेरणा असते. आधुनिक काळातील गतिमानता या स्थितीशिलतेला हादरा देते. गतिमानता हे आधुनिक काळाचे मानचिन्ह आहे. त्याचा परिणाम शिक्षणासारख्या एका महत्त्वाच्या घटकावरही झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे सामाजिक जाणिवा निर्माण करण्याचे साधन मानले.
शिक्षण हे माणसाला विचार देते. त्याच्या बुद्धीची जोपासना करते. त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देते. अस्तित्वाची जाणीव ही मानवी जीवनातील मूलभूत जाणीव आहे. डॉ. बाबासाहेब, तिचे महत्त्व पटवून देताना म्हणतात की, उपासमारीने शरीराचे पोषण कमी झाल्यास माणूस बलहीन होऊन अल्पायुषी होतो. तसेच शिक्षणाच्या अभावी तो निर्बुद्ध राहिल्यास जीवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो.