ब्लॉग माझा 2017 स्पर्धेसाठी प्रवेशिका
नमस्कार ब्लॉगर्स,

मराठी ब्लॉगिंगचं क्षितीज आता विस्तारत आहे. मराठी ब्लॉगर्सही आता विविध विषयांना धीटपणे भिडताना दिसतात. फक्त स्फूट लेखनच नाही, तर कविता, फोटो, कथा असेही प्रकार हाताळले जात आहेत. अशाच मराठी ब्लॉग आणि ब्लॉगर्सचं कौतुक ‘ब्लॉग माझा’ या मराठीतल्या एकमेव ब्लॉगिंग स्पर्धेच्या रुपाने ‘एबीपी माझा’ दरवर्षी करतं.

यंदाही एबीपी माझातर्फे ‘ब्लॉग माझा’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

तेव्हा मंडळी, तुमच्यात दडलेल्या लेखक/लेखिकेला केवळ डायरी, फेसबुक किंवा ट्विटर पुरतेच मर्यादित ठेवू नका. या स्पर्धेत भाग घ्या. ब्लॉगवर नियमित लिहित असाल तर ठिकच, नाही तर ब्लॉग अपडेट करा. ब्लॉग नसेल तर या स्पर्धेच्या निमित्तानं सुरु करा.

काय म्हणालात? बक्षिसांचं काय? अहो, बक्षीसं आहेतंच की!

पहिल्या तीन जणांना विशेष पारितोषिकं आणि उर्वरीत पाच जणांचा उत्तेजनार्थ गौरव केला जाईल. आता कोणती बक्षीसं आहेत, ते गुपित राहू द्या की! शिवाय, तुमच्या निवडलेल्या ब्लॉगला ‘एबीपी माझा’च्या वेबसाईटवर प्रसिद्धी दिली जाईल आणि ‘एबीपी माझा’च्या ‘डिजिटल महाराष्ट्र’ या खास कार्यक्रमात ब्लॉग माझा स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येईल आणि याच कार्यक्रमात विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

…..तेव्हा मित्र-मैत्रिणींनो येऊ द्या तुमच्यातल्या लेखक-लेखिकेला जगासमोर!

नाव *
ब्लॉगचं नाव *
ब्लॉगची लिंक *
पत्ता *
व्यवसाय *
संपर्क क्र. *
स्पर्धेचं स्वरुप आणि नियम (T&C):
· ब्लॉग मराठीतच आणि युनिकोड फॉन्टमध्ये लिहिलेला हवा.

· ब्लॉग ओपन असावा. ब्लॉग पासवर्ड प्रोटेक्टेड नसावा.

· 18 वर्षांपुढील कुणीही या स्पर्धेत सहभागी होऊ शकतं.

· स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवताना तुम्ही फक्त तुमच्या ब्लॉगची लिंक पाठवणं अपेक्षित आहे. तसेच तुमच्या ब्लॉगवरील मजकूर अद्ययावत असायला हवा. म्हणजे तुमचा ब्लॉग अपडेट नसेल तर ती प्रवेशिका ग्राह्य होणार नाही.

· ब्लॉगमधला कंटेंट स्वत:चाच असावा. जर अन्य स्त्रोतांकडून माहिती घेतली असेल, तर त्यांचा नाममिर्देश करावा. ब्लॉग व त्यातील मजकूर आपलाच असल्याचे सिद्ध करणे, ही स्पर्धकाची जबाबदारी आहे. तुमच्या ब्लॉगद्वारे बौद्धिक संपदा अधिकार, कॉपीराईट कायदा यांचा भंग झाल्यास, उचलेगिरी आढळल्यास त्या ब्लॉगरचा स्पर्धेतला सहभाग व पारितोषिक मिळाल्यास तेही रद्द करण्यात येईल.

· या स्पर्धेसाठी कोणतंही शुल्क नाही.

· एकावेळी एका स्पर्धकाला फक्त एकच ब्लॉग पाठवता येईल.

· स्पर्धेचा निकाल विजेत्यांनाच फक्त ई-मेलद्वारे निकाल कळवला जाईल.

· यानंतर ‘एबीपी माझा’च्या डिजिटल महाराष्ट्र या खास कार्यक्रमात ब्लॉग माझा स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येईल आणि याच कार्यक्रमात विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

· सर्वोत्तम ब्लॉग निवडण्याचे अधिकार पूर्णत: परिक्षक आणि स्पर्धा संयोजकांकडे असतील. त्याबद्दल कोणतंही स्पष्टीकरण देण्यास परिक्षक, संयोजक, ‘एबीपी माझा’ हे बांधील नसतील. तुमच्या एन्ट्रीज या तुम्हाला अटी मान्य असल्याच्या निदर्शक असतील.

· स्पर्धेचं आयोजन, नियमावली, अटी, बक्षीसं यासंदर्भात कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय बदल करण्याचे अधिकार ‘एबीपी माझा’कडे असतील.

Submit
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Additional Terms