खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्यावर आधारित प्रश्नांची योग्य उत्तरे निवडा. ___________________________________ ५ नोव्हेंबर , १ ९ ७ ९ रोजी दिल्लीच्या राजपथावर एक भयचकित करणारे नाट्य घडले. तलवारी उपसून युद्धाच्या आरोळ्या देत एक चिडलेला जमाव चालून येत होता. जमावाला रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांचे एक पथक किरण बेदींच्या नेतृत्वाखाली निघाले होते. मोर्चातून पुढे धावणाऱ्यांना थोपवण्यासाठी किरण बेदी जोरजोरात ओरडत होत्या. मोर्चाने उलट पोलीस पथकावरच हल्ला केला. पथकातले इतर पोलीस घाईने माघार घेऊ लागले , तेव्हा किरण बेदी स्वतःच लाठीहल्ला करत समुदायावर तुटून पडल्या. त्यावेळी त्यांच्या डोक्यावर फक्त हेल्मेट होते आणि. हातात पोलिसांची नेहमीची लाठी. त्यावेळी त्यांच्यावर सतत प्रहार होत होते , तरीही त्यांनी असामान्य धैर्य दाखवले आणि न थांबता सतत त्या हल्ला करत राहिल्या. त्यांचे ते विलक्षण शौर्य आणि निर्धार पाहून जमावातील निदर्शकांचा आवेश ओसरला. तेवढ्यात त्यांच्या मदतीला त्यांचे पोलीस पथक आले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. ___________________________________ प्र.1. दिल्ली पोलिसांचे एक पथक कोणाच्या नेतृत्वाखाली निघाले होते ? *