खालील परिच्छेद वाचा आणि त्या खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
कडूनिंब हा छोटी चमकदार पाने असलेला एक उंच, सदाहरित वृक्ष आहे. याचे खोड सरळ उभे असते.
याची साल टणक, खरखरीत व खवलेदार असते. हे वृक्ष वसंत क्रतूत छोट्या पांढर्या फुलांनी फुलते. याची पूर्ण
पानगळती एकाच वेळी होत नसल्यामुळे हे झाड कधीही उघडे पडत नाही. संपूर्ण भारतभर हे झाड आढळते.
कडुनिंबाचे संस्कृत नाव 'अरिष्ट' असे आहे, ज्याचा अर्थ आजारातून मुक्त करणारा असा होतो. चमत्कारी वृक्ष”
या लोकप्रिय नावाने ते ओळखले जाते आहे. कडुनिंबाचा प्रत्येक भाग हा औषधांमध्ये उपयोगात आणला जातो.
कडुनिंबाच्या तेलाला मार्गोसा तेल असे म्हटले जाते, जे त्याच्या बियांपासून मिळवले जाते व कुष्ठरोग व
त्वचारोगांच्या उपचारात वापरले जाते. त्याची पाने कांजण्यांच्या उपचारांसाठी वापरली जातात. कडुनिंबाचा चहा
डोकेदुखी आणि तापापासून आराम मिळविण्यासाठी घेतला जातो. त्याच्या फुलाचा वापर आतड्याचे विकार बरे
करण्यासाठी होतो. कडुनिंबाची साल व डिंक सुद्धा मौल्यवान औषधी आहेत.
भारतातील लोक कडुनिंबाच्या काड्यांचा वापर दात घासण्यासाठी करतात. कडुनिंबाच्या वाळलेल्या
पानाचा वापर कप्पे व कपाटात झुरळे व किड्यांना दूर ठेवण्यासाठी करतात. कडुनिंबाचा वापर भाज्या व ऊसासाठी
खत म्हणून केला जातो.
काही लोक कडुनिंबाला पवित्र मानतात आणि त्याच्या पानांचा घराच्या प्रवेशद्वाराला दुष्ट शक्तींना
दूर ठेवण्यासाठी करतात. नवजात बालकांना आरोग्यासाठी व रोगांपासून दूर ठेवण्यासाठी कडुनिंबाच्या पानांवर
झोपवतात. कडुनिंब हा जगभरातील लोकांसाठी अद्भुत वृक्ष आहे, यात काही संशय नाही.