1) विनोद पूर्वेकडे तोंड करून उभा असताना सरळ पुढे दहा मीटर चालत जाऊन डावीकडे सात मीटर अंतर चालत गेल्यानंतर उजवीकडे तीन मीटर चालून डावीकडे पाच मीटर अंतर चालल्यानंतर उभा राहिला तर त्याच्या मागील बाजू कोणती ?
2) समीर दक्षिणेकडे तोंड करून उभा असताना त्याच्या मागील बाजूच्या विरुद्ध बाजूच्या दोन्ही उपदिशांची नावे काय ?
3) राम वायव्य कडे तोंड करून उभा असताना त्याच्या पाठीमागच्या बाजूच्या लगतच्या उजव्या बाजूकडील मुख्य बाजूची विरुद्ध बाजू कोणती ?
4) सक्षम हा ईशान्य बाजूकडे पाठ करून उभा आहे त्याच्या पुढील बाजूच्या लगतच्या डाव्या मुख्य बाजूची विरुद्ध बाजू सक्षम च्या कोणत्या हातावर राहील ?
5) समीर दक्षिणेकडे चालत जाताना उजवीकडे वळून दहा मीटर अंतरावर थांबून डावीकडे 45 अंश फिरून उभा असताना त्याच्या पाठीमागील बाजू कोणती ?
6) रोहन रोहितला म्हणाला, तुझ्या आईची सासू ही माझी आजी आहे तर रोहनचे वडिल रोहितच्या आजोबाचा कोण ?
7) शिवाजी वायव्य कडे जाताना डावीकडे 90 अंश वळून पुढे वीस मीटर चालत गेला पुन्हा 90 अंशात डावीकडे वळून दहा मीटर अंतर चालत गेला तेव्हा त्याच्या डावीकडील मुख्य बाजूची विरुद्ध बाजू कोणती ?
8) घड्याळात सहा वाजून पंधरा मिनिटे झाले असताना घड्याळातील तास काटा दक्षिण दिशा दर्शवतो तर दोन्ही काट्यामधील दिशा कोणती ?
9) घड्याळात पावणेसहा वाजले असताना मिनिट काटा पूर्व दिशा दर्शवित असेल तर त्याच घड्याळातील तास काटा दर्शवत असलेल्या दिशेची विरुद्ध दिशा कोणती ?
10) जर ईशान्य दिशा दक्षिण दिशा दर्शवीत असेल तर वायव्य दिशा कोणती दिशा दर्शवेल ?