डोळसपणे पाहिल्यास सर्प हे शत्रू नसून मित्र असतात. भारतात मोठ्या प्रमाणात भात, गहू, ऊस यांची शेती केली जाते. या पिकांचे उंदीर, ससे अतिशय नुकसान करतात. त्यांना परस्पर नष्ट करण्यास साप अत्यंत उपयुक्त असतात. उंदीर, ससे यांच्यामार्फत अक्षरशः लक्षावधी टन धान्य नष्ट केले जाते. साप डूक धरतो, पुरातन वास्तूत वास्तव्य करून असतो. अमावास्या, पौर्णिमेला हमखास दंश करतो. या समजुती अत्यंत घातक असतात. त्यासाठी योग्य शिक्षण देणे एक उपाय आहे.