आदिवासी कलाकार एकत्रीकरण बैठक
|| आदिवासी कलाकार एकत्रीकरण बैठक ||

दिनांक : १ डिसेंबर, शुक्रवार (सकाळी १० ते संध्याकाळी ५)
ठिकाण : पूज्य आचार्य भिसे विद्यालय कासा, सभागृह,
कासा, तालुका डहाणू, जिल्हा पालघर

अपेक्षित सहभागी
१) आदिवासी हस्तकला कलाकार (चित्रकार, मुखवटे निर्माते, लाकडी आणि बांबू च्या वस्तू, खेळणे, शोभेच्या वस्तू तसेच इत्तर कलाकृती बनविणारे किंवा या विषयी आवड असलेले)
२) आदिवासी समाजाच्या पारंपरिक ज्ञान, संस्कृती आणि बौद्धिक संपदा या बद्दल आवड असलेले
३) आदिवासी समाजाची स्वावलंबी अर्थव्यवस्था सशक्तीकरणासाठी प्रयत्नशील असलेले
४) सदर विषयाला धरून सकारात्मक मार्गदर्शन/अनुभव सांगणारे, नवीन शिकणायसाठी उत्सुक असलेले

चर्चेचे विषय:
- कलाकारांना सध्याची आव्हाने/अडचणी/कमतरता त्यांचे मूळ आणि यावर उपाय योजना (तात्पुरता आणि कायमस्वरूपी)
- एकत्रीकरणाची गरज, पद्धती, उपक्रम कसे असावेत आणि त्यात कलाकारांची भूमिका
- आर्थिक स्वावलंबनासाठी पर्यायी व्यवस्था, संधी, त्यासाठी लागणारी तयारी
- बौद्धिक संपदा कायदा, शहरात परस्पर बिगर आदिवासींकडून होणारा आदिवासी कलांचा व्यवसाय आणि त्यावर उपाय
- अपेक्षपार्ह (कपडे, अस्वच्छ भिंती इत्यादी वर आदिवासी देवतांची) केले जाणारे चित्रीकरण यावर आपली भूमिका
- नेदरलँड येथील कंपनीने नोंदविलेले वारली डिझाईन चे ट्रेडमार्क आणि त्या संबधी आयुश चा बौद्धिक संपदा कायदा अंतर्गत कायदेशीर लढा
- भविष्यात अशा प्रकारची येणारी अशी दृश्य अदृश्य आव्हाने आणि त्यासाठी आपली तयारी

सहभाग घेण्यासाठी येथे नोंदणी करावी : www.gtogether.adiyuva.in
आपल्या परिचयाचे कुणी येत असल्यास त्यांच्या वतीने फॉर्म भरावा

सूचना -
ज्या कलाकारांना हँडीक्राफ्ट (हस्तशिल्प विकास आयुक्तालय) खात्याचे ओळखपत्र बनवायचे असल्यास २ पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, रेशन कार्ड, जातीचा दाखला आणि एक नमुना कलाकृती आणावी, सदर कार्यालयात एकत्रित अर्ज सादर करण्यात येतील

आदिवासी समाज हिताचे उपक्रम अधिक प्रभावी करण्यासाठी आपल्या सूचना आणि अभिप्रायांचे स्वागत आहे

आयुश । आदिवासी युवा शक्ती
www.adiyuva.in | ayush@adiyuva.in | 0 9246 361 249
सहभाग घेण्यासाठी पुढिल पानावर फॉर्म भरावा
Next
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy