JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
ऑनलाईन टेस्ट - इयत्ता : पाचवी, विषय : परिसर अभ्यास भाग १, घटक : संसर्गजन्य रोग आणि प्रतिबंध
निर्मिती : चंद्रकांत जगन्नाथ माने. शिक्षक.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाताडवाडी, ता. वाळवा, जि. सांगली.
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
विद्यार्थ्याचे नाव
*
Your answer
प्रश्न १. गटातील वेगळा पर्याय निवडा.
*
1 point
गोवर - रुबेला
स्वाईन फ्ल्यू
कोविड १९
दंतक्षय
प्रश्न २. ••••• छातीच्या व घशाच्या रोगांचा प्रसार होतो.
*
1 point
हवेमार्फत
पाण्यामार्फत
अन्नपदार्थांमार्फत
कीटकांमार्फत
प्रश्न ३. चुकीचे विधान ओळखा.
*
1 point
आतड्यांच्या रोगांचे जंतू, तसेच काविळीचे जंतू रोग्याच्या विष्ठेमध्ये असतात.
कावीळ झालेल्या रोग्याची विष्ठा पाण्यात मिसळली, की काविळीचे रोगजंतू पाण्यात शिरकाव करतात.
काविळीच्या रोगजंतूंनी दूषित झालेले पाणी प्यायल्यामुळे हे रोगजंतू पाणी पिणाऱ्याच्या आतड्यात जातात आणि काविळीच्या रोगाची लागण होते.
पाणवठ्यावर अंघोळ करणे, कपडे धुणे, जनावरे धुणे, नदीकाठी किंवा जलस्रोतांकाठी शौचास बसणे अशा गोष्टींमुळे रोगप्रसार होईलच असे नाही.
प्रश्न ४. चुकीचे विधान ओळखा.
*
1 point
अन्नपदार्थांवाटे रोगप्रसार होतो यालाच अन्नातून विषबाधा असे म्हणतात.
अन्नाद्वारे होणाऱ्या रोगप्रसारास प्रतिबंध होण्यासाठी अन्न नेहमी झाकून ठेवणे महत्त्वाचे असते.
आतड्याचा रोग झालेल्या रोगग्रताने शौचानंतर हात स्वच्छ न धुता खाद्यपदार्थ हाताळल्यास त्याच्या हाताला चिकटलेले रोगजंतू अन्नपदार्थांत जातात.
उघड्यावरील जेवणाची पंगत अन्नपदार्थांमार्फत रोगप्रसार होण्यास कधीच कारणीभूत ठरत नाही.
प्रश्न ५. बरोबर विधान ओळखा.
*
1 point
डास, पिसवांसारख्या कीटकांमुळे रोगप्रसार होत नाही.
नायटा, खरूज हे त्वचारोग आहेत.
त्वचारोग झालेल्या व्यक्तीच्या त्वचेशी स्पर्श झाला, तर त्वचारोग होऊ शकत नाही.
त्वचारोग झालेल्या व्यक्तीचे कपडे वापरल्याने त्वचारोग होत नाही.
प्रश्न ६. चुकीचे विधान ओळखा.
*
1 point
एका ठिकाणच्या अनेक लोकांना एकाच वेळी एखादा संसर्गजन्य रोग झाला, तर या 'रोगाची साथ' आली आहे असे म्हणतात.
हवा, पाणी, अन्न व कीटक ही रोगप्रसाराची माध्यमे आहेत.
रोगप्रसार करणाऱ्या कीटकांची पैदास वाढू दिली तर रोगप्रसार टाळता येतो.
रोगाची साथ टाळण्यासाठी स्वच्छतेच्या सवयी लावून घेणे महत्त्वाचे असते.
प्रश्न ७. रोग होऊ नये म्हणून केलेल्या उपायांना ••••• म्हणतात.
*
1 point
रोगनिवारण
रोगप्रतिबंध
रोगप्रसार
रोगसंसर्ग
प्रश्न ८. अयोग्य जोडी ओळखा.
*
1 point
गावांतील पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक स्रोतांचे निर्जंतुकीकरण करणे. - ऑक्सिजनीकरण करावे.
गॅस्ट्रो किंवा काविळीसारख्या रोगांची साथ पसरली. - पाणी उकळून थंड करून प्यावे.
साचलेल्या पाण्यावर डासांची पैदास होऊ न देणे. - पाणी साचू न देणे, कीटकनाशके फवारणे.
हवेतून पसरणाऱ्या रोगांचा प्रसार टाळणे. - खोकताना, शिंकताना तोंडावर, रुमाल धरावा. नाक व तोंड झाकले जाईल असा मास्क वापरावा.
प्रश्न ९. चुकीचे विधान ओळखा.
*
1 point
आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीमुळे बहुसंख्यवेळा शरीरात रोगजंतू शिरल्यावरही रोग होत नाही.
लसीकरण हा रोगप्रतिबंधाचा एक उत्कृष्ट उपाय आहे.
लसीकरणामुळे शरीरात सर्व रोगांविरुद्ध रोगप्रतिकारक क्षमता विकसित होते.
स्वच्छता, संतुलित आहार आणि लसीकरण हे रोगप्रतिबंधाचे मुख्य आधार आहेत.
प्रश्न १०. योग्य विधान ओळखा.
*
1 point
मूल जन्माला आल्याबरोबर लगेच त्याला क्षयप्रतिबंधक लस टोचण्यात येते.
मूल दीड महिन्यांचे झाले, की घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात आणि पोलिओ प्रतिबंधक लसींचे पाच डोस एक - एक महिन्याच्या अंतराने त्याला देण्यात येतात.
घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात प्रतिबंधक लसीस द्विगुणी या नावाने ओळखले जाते. ती टोचली जाते.
पोलिओ प्रतिबंधक लस टोचण्यात येते.
प्रश्न ११. साथीच्या व संसर्गजन्य रोगांस आळा बसावा, म्हणून राष्ट्रीय स्तरावर ••••• कार्यक्रम हाती घेतले जातात.
*
1 point
आरोग्य आणि शिक्षण
आरोग्य आणि बालकल्याण
कृषी आणि आरोग्य
आरोग्य आणि समाजकल्याण
प्रश्न १२. नागरिकांना सार्वजनिक आरोग्य सेवा सुविधा मिळण्यासाठी गावोगावी ••••• स्थापना करण्यात आली आहे.
*
1 point
प्राथमिक विद्यालयांची
प्राथमिक आरोग्य केंद्रांची
पशुवैद्यकीय दवाखान्यांची
शिधा वाटप केंद्रांची
प्रश्न १३. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास आता कायद्याने मनाई केली आहे कारण •••••
*
1 point
लोकांना सवय लागावी.
रोगप्रसार होऊ नये.
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखता यावी.
सार्वजनिक ठिकाणांची निगा राखणे सोईचे व्हावे.
प्रश्न १४. चुकीचे विधान ओळखा.
*
1 point
देवाचा कोप, भूतबाधा, जादूटोणा यांमुळे रोगबाधा होत नाही.
सगळेच सूक्ष्मजीव रोगांस कारणीभूत ठरतात.
आंबोळी, इडली, डोशासाठी भिजवलेले पीठ सूक्ष्मजीवांमुळेच आंबते.
सूक्ष्मजीव हे एक प्रकारचे सजीव आहेत.
प्रश्न १५. दिलेल्या पर्यायांतील योग्य कृती कोणती?
*
1 point
देवीच्या प्रकोपामुळे नायटा उठला समजून विद्या त्वचारोग तज्ञांकडे न जाता देवीचा अंगारा कपाळाला लावते.
वारंवार पोटदुखी होतेय म्हणून शरदच्या आईने तिच्यावरून दहीभात उतरवून तो रस्त्याच्या कडेला ठेवला.
मानसीला भूतबाधा झाल्याने ती वेड्यासारखी करते असे तिच्या आईला भोंदू बाबाने सांगितलेले न ऐकता मानसीच्या वडीलांनी तिला मानसोपचार तज्ञांना दाखवून त्यांच्याकडून योग्य ते उपचार घेतले.
मोहनला अंधश्रद्धा निर्मूलन कायदा माहिती असूनही तो जादूटोणा, भूतबाधा अशा अंधश्रद्धा पसरवणाऱ्या भोंदू बाबाला सहकार्य करून लोकांची आर्थिक फसवणूक करतो.
Submit
Page 1 of 1
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report