फरसू पाय ओढत पायरीवर येऊन बसला. आपली खरबरीत बोटं त्याने गुळगुळीत पायरीवरून फिरवली. मग दोन्ही पाय मुडपून गुडघ्यावर हात ठेवून तो आभाळाकडे बघत बसला. 'उठा जरा, आत जाऊन बसा," सुनेचा आवाज आला. दरवाजाच्या चौकटीला धरून फरसू उठला. त्याच्या पायांची हार्ड कडकडली. आतल्या खोलीत येऊन तो गुबगुबीत खुर्चीवर बसला. ह्या खुर्चीवर त्याला अवघडल्यासारखं वाटायचं. पाय वर घेऊन बसले. तरी सून डाफरायची. असं बसणं त्याला कधी ठाऊक नव्हतं. जुन्या घराच्या पायरीवर ऐसपैस बसायची त्याची तेवढीच जुनी सवय. दारातच चिंचेचं पुराणं झाड होते. मडक्यातल्या पाण्यासारखा गारवा घरभर भरून राहायचा. आईच्या पदरासारखी चिंचेची सावली घरावर असायची. मंगलोरी कौलांच्या नळ्यांतून फुंकर मारावी तसं वारं घुमायचं. फरसू पायरीवर बसायचा. वरून भिरभिरत येणारी फुलपाखरी पानं, झाडावर चढणार्या खारी पाहणं हा त्याचा फावल्या वेळचा उद्योग होता. रात्री जेवणखाण आटोपल्यावर तो आणि आबू उशिरापर्यंत चिंचेच्या मुळांवर बसायचे. पानांतून पाझरणारं चांदणं अंगावर घेत त्यांच्या गप्पा चालायच्या.. गुरंढोरं, वाडी, गावकीतली प्रकरण.. असे अनेक विषय. कधीमधी इनूस मास्तर यायचे. पेपरात येणाऱ्या बातम्या ते सांगायचे. अमेरिकेत की कुठे घडणारी ती नवलं फरसू व आबू मोठ्या नवलाईने ऐकायचे. वरील उतारा वाचा व दिलेल्या कृती करा: खालील ओळीतील संकल्पना स्पष्ट करा मड क्याच्या पाण्यातील गारवा *