नवोदय सराव परीक्षा पेपर क्रमांक - 21 (विषय - मराठी)
निर्मिती
www.hasatkhelatshikshan.in 
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
प्र.1 ते प्र. 5 साठी सूचना-खालील उतारा वाचा व  प्रश्नांची उत्तरे द्या.
फेब्रुवारीच्या पहिल्या दिवसापासून एका बेकरीवाल्यानं एका शेतकऱ्याकडं रोज एक किलो लोण्याचा रतीब लावला. महिन्याच्या शेवटच्या दिवशी बेकरीवाल्याने लोण्याचे वजन करून बघितले तर लोणी कमी भरले. संतापून त्यानं शेतकऱ्याला कोर्टात खेचले. न्यायाधीशांनी शेतकऱ्याला विचारलं, “तू लोण्याचं वजन कसं करतोस ?" शेतकऱ्यानं उत्तर दिले, "साहेब मी तर अडाणी आहे, माझ्याजवळ मोजायला योग्य माप नाही, पण माझ्याकडे एक तराजू आहे." न्यायाधीशांनी विचारले, "मग तू लोण्याचं वजन कसं करतोस ?" शेतकऱ्याने उत्तर दिले, “साहेब, या बेकरीवाल्याकडून मी एक किलो पाव विकत घेतो 
मी तो पाव तराजूत ठेवतो आणि तेवढ्याच वजनाचे लोणी देतो. यात जर माझा दोष आढळला तर मी शिक्षा भोगायला तयार आहे."

1) लोण्याचे वजन कशामुळे कमी भरले ? *
2 points
2) एक किलो वजन म्हणून शेतकरी तराजूमध्ये कशाचा वापर करी ? *
2 points
3) खालीलपैकी कोणाचे वर्तन तुम्हास चुकीचे वाटते ? *
2 points
4) या कथेच्या शीर्षकासाठी कोणती म्हण योग्य ठरेल ? *
2 points
5) बेकरीवाल्याला एकूण महिनाभरात किती किलो तूप मिळाले? *
2 points
प्र.6 ते प्र.10 साठी सूचना-खालील उतारा वाचा व  प्रश्नांची उत्तरे द्या.
पृथ्वीवरील सुमारे एक अष्टमांश भूभाग वाळवंटाचा आहे. ज्या प्रदेशात वर्षात सरासरी 250 मि.मी. पेक्षा कमी पाऊस पडतो, अशा प्रदेशाला 'वाळवंट' म्हटले जाते. दिवसभर प्रखर सूर्य आणि रात्री थंड हवा असते. कधीकधी पहाटे दंव तयार होते. हा प्रदेश वाळू व खडकाचा असतो. चिलीतील आटाकामा वाळवंटात धूप, वालुधन्वे सरकून इमारती गाडल्या जाण्याचे प्रकार सतत घडतात.
दिवसा झोपून रात्री शिकारीसाठी, अन्नासाठी येथील प्राणी बाहेर पडतात. उन्हाळाभर झोपून राहणे किंवा सुप्तावस्थेत जाणे, हे सजीवांचे वैशिष्ट्य आहे. झाडांची पाने गळतात; फक्त मुळे, खोडे किंवा बिया राहतात. कॅगस रेंट, जर्बिल हे प्राणी कमी पाण्यावर जगतात. बेडूक, कासव पोटात पाणी साठवतात. उंट मदारीत पाणी साठवतात किंवा मिळाल्यावर पितात. निवडुंग पावसानंतर फुगतो व नंतर सुकतो. त्याच्या पानाचे काट्यात रूपांतर झालेले दिसते. त्यामुळे पाणी कमी उडून जाते व प्राण्यांना खाणे अवघड होते. वाळवंट असले तरी तिथे जीवसृष्टी आहेच.

6) पृथ्वीवर वाळवंटी भाग किती टक्के आहे ? *
2 points
7) वाळवंटातील प्राणी शिकारीसाठी, अन्नासाठी रात्रीच्या वेळीच का बाहेर पडतात ? *
2 points
8) उन्हाळ्यात वाळवंटी प्रदेशातील वनस्पतींचा कोणता भाग पाहावयास मिळत नाही ?. *
2 points
9) खालीलपैकी कोणता प्राणी कमी पाण्यावर जगू शकणार नाही? *
2 points
10) वाळवंटी भागात काटेरी वनस्पती आढळतात. कारण.......... *
2 points
प्र.11 ते प्र.15 साठी सूचना-खालील उतारा वाचा व प्रश्नांची उत्तरे द्या.
पारा हा असा एकच धातू आहे की नेहमीच्या अवस्थेत तो द्रवरूपातच असतो. वीज व उष्णता यांचा उत्तम वाहक असून पाण्यापेक्षा 13.6 पटीने तो जड आहे. पाऱ्याचा उत्कलनबिंदू 350° से. असून 390° से. ला तो गोठतो. लाल रंगाच्या सिनाबर नावाच्या दगडाच्या मिश्रणात तो नेहमी आढळून येतो. पाऱ्याच्या अंगी अनेक औषधी गुण आहेत. विविध प्रकार रंग, औषधे, कॉस्टीक सोडा, क्लोरिन, विजेची यंत्रसामग्री वगैरे अनेक प्रकारांमध्ये पाऱ्याचा उपयोग करण्यात येतो.
11)  पारा नेहमी कोणत्या रूपात असतो? *
2 points
12) पाण्यापेक्षा पारा किती पट जड आहे ? *
2 points
13) पारा किती अंश तापमानाला गोठतो? *
2 points
14) पाऱ्याचा उपयोग कशासाठी केला जात नाही ? *
2 points
15) पारा कशामध्ये आढळून येतो ?
*
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.